Wednesday 20 March 2024

✍️ *इतिहासाच्या जाड भिंती...!!!*

      *डॉ मिलिंद जीवने 'शाक्य'* नागपूर १७

      मो.‌न.‌ ९३७०९८४१३८


प्राचिन भारताच्या इतिहास असणा-या

बुध्द संस्कृतीमध्ये मी डोकावत असतांना

नालंदा तक्षशीला विक्रमशीला समान

प्राचिन बौध्द विद्यापीठ असोत वा

विदर्भातील मनसर - पवनी क्षेत्राचा

प्राचिन बौध्द इतिहासाचा वारसा असो

तेथिल इतिहासाच्या जाड भिंतीनी

मला अक्षरशः प्रेमात पाडले

आणि माझ्या ह्या जीवन वाटा 

त्या प्राचिन इतिहासाकडे जात असतांना

इतिहासाच्या जाड भिंतीवर बसुन

माझ्या मनातील ह्या भाव कल्पना

शब्दांमध्ये प्रसव घेत होत्या 

आणि शब्दांचे हे प्राचिन चित्र शिल्प

डोळ्यांमध्ये साठवले जात असतांनाच

तिला प्रेमिका स्वरुपात बघतांना

माझ्या मनातील‌ चेतना जागृत झाल्यात

आणि बुध्दाच्या असणा-या स्मित हास्याने

माझ्या ह्या हृदय मनाला पाझर फुटला

दोन्ही हातांनी बुध्दाला वंदन करतांना

आपोआप दोन्ही डोळे बंद केल्यावर

बुध्द संस्कृतीची ती प्राचिन ओळख

एखाद्या सुंदर शांती चल चित्राप्रमाणे 

ती माझ्या समोर चालत आली

आणि सुंदर अशा बुध्द वनात फिरतांना 

मग ती माझ्या सोबत बोलत होती

आम्ही प्राचिन बुध्द इतिहासात 

पुर्णतः रममाण झाल्यावर

मी आजचा बुध्द इतिहास शोधत होतो

प्रेम मैत्री बंधुता करुणेचा भारत...!!!

**************************

नागपूर, दिनांक २०/०३/२०२४

 https://youtu.be/lt6dr4uhvtk?si=sDbVuGO4MopZMt_C

No comments:

Post a Comment