Friday 11 May 2018

Is a International gathering or Conference , it will organize by Govt. Of Maharashtra...?

✍ *सामाजिक न्याय विभागातर्फे नागपुरात आयोजित आंतरराष्ट्रिय परिषद की मेळावा ?*
          *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
          मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

         सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य ह्यांनी स्वपुढाकार घेवुन बाबासाहेब डॉ. आंबेडकर आणि भ. गौतम बुध्द जयंतीच्या निमित्ताने आतंरराष्ट्रीय शांती आणि समता परिषद *"( International Peace and Equality Conference)"* ह्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, हा खरे तर स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. भले ही इथे राजनितिक भाव असेल ! परंतु ह्या उपक्रमात शासकिय आयोजक वर्गाकडुन झालेले गंभिर दोष हे मात्र वैचारिक दिवाळपण सांगणारे आहेत. आणि ह्या वैचारिक दिवाळपणात जर बगैर शासकिय मंडळीचा सहभाग असेल तर, मग मात्र अशा बिन-अकलवादी, अनुभव नसलेल्यांची सोबत ह्या नियोजित आंतरराष्ट्रिय परिषदेचा दर्जा खालावण्यास निश्चित कारणीभुत ठरणार आहे. आणि ती मंडळी स्वत:ला आंबेडकरी म्हणवुन घेत असतील तर, मात्र त्यांच्या बुध्दीची (?) किव करावी लागेल...! आता नियोजित परिषदेतील झालेल्या चुका विषयी बोलु या...!
      सदर नियोजित आंतरराष्ट्रिय परिषदेतील सर्वात मोठी आणि भयानक चुक म्हणजे *"थिम टायटल"* आणि दुसरे म्हणजे संपूर्ण जगभरातील संशोधक - मान्यवर - विद्वानाकडुन संशोधन पेपर न मागविणे...! तसेच सब-थीमचा ही अभाव...!!! ह्याशिवाय ज्या विषयावर नियोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सखोल चर्चा करणे अभिप्रेत आहे, सदर विषयाला नसणारा आंतरराष्ट्रिय दर्जा स्पर्श...! आणि संशोधकांनी पेपर सादरीकरण केल्यानंतर उपस्थितांना वाटणा-या शंका निरसरण एवं प्रश्न, त्याची उत्तरे सत्राचा व्यवस्था अभाव. इतकेच काय डाकुमेंटेशनचे अभावीकरण...! कुठल्याही राष्ट्रिय - आंतरराष्ट्रिय परिषदेतील सामाजिक - राष्ट्रिय विषयावर झालेल्या त्या संशोधनात्मक चर्चेचे डाकुमेंटेशन करुन, सदर डाकुमेंटेशन प्रकाशित करणे आणि शासनाला कळविणे हे ही गरजेचे असते. कारण सदर डाकुमेंटेशन द्वारा शासनाला सामाजिक - राष्ट्रिय दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या शासन योजना तयार करण्याला मदत होणारी असते. आणि सदर आंतरराष्ट्रिय परिषद शासनाकडुनचं आयोजित केलेली असल्याने उपरोक्त जबाबदारी ही जास्तचं अशी वाढणारी आहे. *"कारण कोणतीही आंतरराष्ट्रिय परिषद ही केवळ देशी-विदेशी लोकांना बोलावण्याचा जमघट नाही. तर ती पॉलिसी मेकिंग आणि अप्लाईंग प्रोसीजर आहे."* एकंदरीत बघता सदर बाबींचा अभाव असल्याने नियोजित समारोहाला "आंतरराष्ट्रिय परिषद" न म्हणता *"आंतरराष्ट्रिय मेळावा"* म्हणने जास्त संयुक्तिक होईल...!
     सदर नियोजित आंतरराष्ट्रिय परिषदेचे नाव हे "International Peace and Equality Conference" असे घोषित केलेले आहे. ह्या नावातचं खुप अशी गंभिर चुक आहे. कारण हेचं नाव तर सदर परिषदेची "थीम" आहे. आणि सदर परिषदेचे नामकरण हे *"World Peace and Equality International Conference" किंवा "International Conference for Peace and Equality"* असे असते तर अजुन ते जास्त संयुक्तिक असे झाले असते. तसेच सदर थिमच्या अनुषंगाने सब-थीम देणे ही गरजेचे होते. परंतु नाचेवाद आणि खुरापत करणारी हिन - दीन - दलित सोबती असल्यास, अशी महाचुक होणे काही नविन नाही ! तेव्हा पुढे भविष्यात होणा-या कोणत्याही परिषदेत पुढे ही काळजी घेणे गरजेचे आहे. ह्याशिवाय भाषण वेळेचे सीमा बंधन पालन महत्त्वाचे आहे. उदघाटक आणि अध्यक्षांना १५ - २० मिनिटाचा अवधी तर अन्य वक्त्यांना केवळ १० मिनिटे बोलण्याचा अवधी बाबतची सुचना देणे फार गरजेचे आहे. नाही तर त्यांचा ४५ - ६० मिनिटाचा विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पाठ सवय ही जाता जात नाही. आणि एक महत्वाचा विषय म्हणजे सदर परिषदेत ठेवल्या जाणा-या छत्रपती शिवाजी महाराज आणि म. ज्योतीबा फुले ह्यांचा फोटो. निश्चितच सदर दोन्ही महामानव आम्हाला आदर्श आहेत. परंतु सदर दोन्ही मान्यवरांचे फोटो ठेवण्याची इथे औचित्यता नाही. भगवान बुध्दाची मुर्ती आणि प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा फोटोचं सदर परिषदेत विचार पीठावर ठेवणे हे औचित्याचे असणार आहे.
      सदर नियोजित आंतरराष्ट्रिय शांती आणि समता परिषदेत सहभागी होणा-या प्रमुख अतिथी वर्गाचा दर्जा ही अजिबात साजेसा असा दिसत नाही. दुस-या भाषेत सांगावयाचे झाले तर सदर निमंत्रित मान्यवर नैतिकतेच्या कसोटीवर सदर पदाला पात्र आहेत असे म्हणता येणार नाही. जसे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ह्यांना आंतरराष्ट्रिय परिषदेचे अध्यक्षपद देणे. नितीन गडकरी ह्यांचे बीज भाषण. आंतरराष्ट्रिय परिषदेत बीज भाषण काय प्रकार आहे...? निश्चितचं देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी जी, ही मान्यवर राजकारण आणि सत्तेतील मोठी मान्यवर आहेत. *परंतु धर्म मुल्याच्या संदर्भाने सदर मंडळी शंकराचार्य वा अन्य प्रमुख संत ह्यांच्या पेक्षा मोठी नाहीत. आणि सदर मान्यवर ही त्यांना आपला आदर्श मानतात. सन्मान ही देतात. असा भाव आमच्या आयोजक महिमांना कां जोपासता आला नाही...?* ही एक शोकांतिका म्हणावी लागेल...! आणि नागपुर शहरात सदर आंतरराष्ट्रिय परिषद होत असल्याने आणि सदर मान्यवर मंडळी ही नागपुरचीच असल्याने , तसेच वरिष्ठ मंत्री असल्याने, पर्यायाने ती मान्यवर नेते शासनाचा भाग असल्याने त्यांना सदर परिषदेचे "स्वागताध्यक्ष" केले असते तर आणि त्यांच्या हाताने उपस्थित विदेशी पाहुण्यांचा सत्कार केला गेला असता तर, सदर नियोजित परिषदेला अजुन एक लौकिक प्राप्त झाला असता. दुसरी गोष्ट ही की, सदर मंत्रीगण भाजपा शी संबधित असल्याने त्यांना विरोध होता कामा नये. ह्यापुर्वी काँग्रेस शासित मंत्री वर्गाला विरोध केला गेला नाही तर भाजपा शासित मंत्री वर्गाला विरोध करणे, हे नैतिकतेला धरुन म्हणता येणार नाही. तसेच मा. राजकुमार बडोले साहेब सदर परिषदेचे "प्रमुख निमंत्रक" म्हणुन राहणे हे अधिक सोईस्कर झाले असते. *उदघाटक म्हणुन कोणत्याही बौध्द देशातील राजघराण्याच्या मान्यवराचे असणे आणि सदर नियोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष हे जर जागतिक दर्जाचे बौध्द भिख्खु वा कुणा विद्वानाला बोलावले गेले असते तर, सदर परिषदेची गरिमा अजुन मोठी झालेली असती.* तसेच अन्य देशी विदेशी मोठी मान्यवर ही 'प्रमुख अतिथी' तसेच विशेष अतिथी म्हणुन असते तर, परिषदेचा लौकिक वाढला असता. सदर परिषदेत खा. डॉ. नरेंद्र जाधव ह्यांचे विशेष व्याख्यान हा काय प्रकार आहे...? कोणत्याही परिषदेत उदघाटन सत्र, प्रथम सत्र, द्वितिय सत्र, तृतीय सत्र, समारोप सत्र हा क्रम असतो. तसेच समारोपीय सत्रात "ठराव वाचन आणि मान्यता" हा एक महत्वपुर्ण भाग असतो. सदर महत्वपुर्ण भाग हा सदर नियोजित परिषदेत दिसुन आलेला नाही. कारण कोणत्याही परिषदेत पारित झालेले ठराव हे सामाजिक - धार्मिक - मानवी - राष्ट्रिय मुल्यांचे भाव जोपासणारे असतात. शासन सुद्धा सदर ठरावाची दखल घेत असते. समारोपीय सत्रात ही उदघाटन सत्रा प्रमाणेचं देशी - विदेशी पाहुण्यांना प्राधान्य असणे हा तर सदर परिषदेचा दर्जा आणि गरिमा वाढविणारी आहे.
     मित्रांनो, सदर परिषदेच्या सत्रातील चुकांच्या संदर्भानेही अजुन बरेच लिहिता येईल. कोणत्याही आंतरराष्ट्रिय परिषदेचे आयोजन करणे, हा इतका सहज भाव नाही. जवळपास एक वर्षभर त्याचे दुरगामी प्लँनिग, विषयवार सुक्ष्म अभ्यास आणि नियोजित प्रमुख अतिथी वर्गांची कार्य पार्श्वभूमी आदींची माहिती घेणे, संशोधन पेपर मागविणे, डाकुमेंटेशन तयार करणे आदी ब-याच प्रकारच्या प्रक्रियेतुन जावे लागत असते. आज काल जिकडे तिकडे भरणा-या परिषदा ह्या तर परिषदा नसुन फक्त आणि फक्त मेळावे आहेत. मध्यंतरी पुणे येथे *"भारतीय बौद्ध महासभा"* ह्या संघटनेच्या एका गटाने घेतलेली आंतरराष्ट्रिय परिषद ही एक अशीचं बिन-अकलवादी आयोजक - पदाधिका-यांनी आयोजित केलेली परिषद होती. अलीकडे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे आयोजित *"आंतरराष्ट्रिय बुध्दीस्ट सेंटर"* च्या उदघाटन समारोहाची पुर्णत: वाट लागली. सदर बांधलेल्या इमारतीचा नकाशा हा मनपाच्या नगर रचना विभागाकडून मंजुरचं करुन घेण्यात आला नाही. जर ह्या दोषी प्रकरणात आमचे आंबेडकरी म्हणवणारी अधिकारी सहभागी असतील तर, त्यांच्या बुध्दीची कीवचं करावी लागेल...! तसे बघता आंबेडकरी समाजात आता नव्याने समोर समोर नाचणा-या नाच्यांची फौज तयार झालेली दिसुन येते. आणि कदाचित भविष्यात ह्या दीन - हिन - दलित नाचांच्या उपद्रवातुन आंबेडकरी चक्र हे उलट तर फिरणार नाही नां...? ही भयान भीति आता वाटु लागलेली आहे...!!!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* अध्यक्ष, जागतिक बौद्ध परिषद २००६
* स्वागताध्यक्ष, विश्व बौध्दमय आंतरराष्ट्रिय परिषद २०१३, २०१४ , २०१५
* आयोजक, जागतिक बौद्ध स्त्री परिषद २०१५
* अध्यक्ष, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रिय बुध्दीस्ट मिशन
* मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

No comments:

Post a Comment