Wednesday 25 April 2018

My Marathi Poem..... Dr. Milind Jiwane 'Shakya'

🌓 *भीमाची ती काळी रात्र ....!*
         *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
         मो.न. ९३७०९८४१३८

प्रकाश देण्या मोम राब राब जळले
भीमाची ती काळी रात्र आज मी स्मरले...

पाशवी काळाने ह्या मानवा रे छळले
ब्रम्हाचे लावारीश मनगटा बसले
कुत्र्यांचे रानटी जिवन सुखी भरले
आम्हा माणसा जन्म अवदशा ठरले...

भीमाच्या क्रांतीचे हे नव वारे दटले
संविधान वादाचे अस्त्र आता पेटले
खुल्या मनाचे ते वादळ तुफान सुटले
हिन कुत्र्यांचे कळप मराया टेकले...

अंतर्युध्द मनाचे हे स्मशान उठले
पेशवाई तोफेचे अरे गोळे संपले
उद्याच्या भारत शांतीचे नारे चेतले
बुध्द शरण भावाचे हे मंत्र गुंजले...

* * * * * * * * * * * * * * * * * *
     (भारत राष्ट्रवाद समर्थक)

No comments:

Post a Comment