Saturday 14 September 2024

 🇮🇳 *हिंदुस्तानी (भारतीय नाही) राहुल गांधी पासुन प्रधानमंत्री - नरेंद्र मोदी ह्यांचे गणपती पुजनास सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ह्यांच कडे जाणे ते नागपुरच्या जिला न्यायालयात बसलेला गणपती बनाम संविधान संस्कृती विरूद्ध संस्कृती संविधान संघर्ष !*

     *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'** नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२३


      प्रजासत्ताक भारत देशामध्ये सद्या चर्चेचे दोन प्रमुख विषय आहेत. एक - *राहुल गांधी* ह्या कांग्रेस राजकुमाराचे *"अमेरिका प्रवास वक्तव्य"* आणि दुसरे - प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* ह्यांचे सरन्यायाधीश *धनंजय चंद्रचूड* ह्यांच्या सरकारी बंगल्यावर *"गणेश पुजा"* करण्यास जाणे. राज्य निहाय निवडणूक विषय सोडला तर ! बलात्कार - अत्याचार - भ्रष्टाचार ही काय विषय आहेत ? आणि सरन्यायाधीश *धनंजय चंद्रचूड* ह्यांच्या पावलावर पाऊल (परंपरा) ठेवुन नागपुरातील जिल्हा न्यायालयात *"गणपती"* चे विराजमान होणे. आणि मग मधल्या सुट्टीत त वकिल वर्गाकडून *"गणपती प्रसाद वितरण."* नागपूर जिला न्यायाधीश (PDJ) ह्यांची अनुमती आहे / होती, ह्या विवादात पुढे बघु यां. आणि हा विषय सहज घ्यावा किंवा कसे ? हा ज्याचा त्याचा बुध्दीचा निकष आहे. *राहुल गांधी* ह्या बालकांवर चर्चा करण्यापुर्वी ७ में १९९७ रोजी *"सर्वोच्च न्यायालयाच्या"* (पुर्ण खंडपीठाने) दिलेल्या *"Restatement of values of judicial life"* संदर्भातील दोन मुख्य मुद्दे देत आहे. *"(6) A judge should practice a degree of aloofness consistent with the dignity of his office. (16) Every judge must at all times be conscious that he is under the public gaze and there should be no act or commission by him which is unbecoming of the high office he occupies and the public esteem in which that office is held."* ही दोन संदर्भ व्याख्या समस्त न्यायाधीश महोदयांनी आम जनतेला दिल्यास फार बरे होईल !

        इंग्रज शासन काळात (गुलामी) सन १९१९ मध्ये इंग्रजांनी *"ब्राह्मण वर्गाला न्यायाधीश बनण्यास बंदी"* आणलेली होती. आणि ब्राह्मण वर्गाचे १००% नियंत्रण हे २.५% ह्या प्रमाणात आणल्याचा इतिहास आहे. ह्याशिवाय इंग्रजांनी *"संपत्ती अधिकार कायदा आणला / देवदासी प्रथा बंद / शुद्रांचा अधिकार कायदा १७९५ / नवविवाहिता शुध्दीकरण प्रथा बंदी / चरक प्रथा (शुद्र बळी) बंदी / गंगादान प्रथा (शुद्राचा मुलगा दान) / खुर्ची अधिकार प्रथा (शुद्रांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नव्हता) बंद / शिक्षणाचा अधिकार / शासकीय नोकरीचा अधिकार दिला आहे.* "मनुस्मृती" ह्या ग्रंथामध्ये (८/२१-२२) मध्ये म्हटले आहे की, *"ब्राह्मण हा जरी अयोग्य असला तरी त्याला न्यायाधीश बनविले पाहिजे. अन्यथा राज्यावर संकट ओढवु शकते."* अजुन बरेच काही आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश *रंजन गोगोई* ह्यांच्या अध्यक्षतेखाली न्यायाधीश *शरदचंद्र बोबडे / अशोक भुषण / धनंजय चंद्रचूड / एस. अब्दुल नज़ीर* ह्यांच्या खंडपीठाने दिनांक ९ नोव्हेंबर २०१९ रोजी *"रामजन्मभूमी प्रकरण"* संदर्भातील दिलेल्या निर्णयात *"Prima facie "* काय आहे ? हे समजल्यावर *"ब्राह्मण मातेच्या गर्भातील सहज मेरीट"* सहजपणे लक्षात येते. आणि आताचे सरन्यायाधीश *धनंजय चंद्रचूड* ह्यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या सर्व निर्णयाची समिक्षा करणे फार गरजेचे आहे. सदर निर्णयात *"Operation Part"* काय आहे ? हा प्रश्न आहे. प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* ह्यांनी तर देशाला, *"सत्य समजण्यास"* मैलाचा दगड टाकलेला आहे. *"भांडवलशाही पहाट""* जन्माला घातली आहे. न्यायाधीश नियुक्तीमध्ये *"कोलोजीयम सिस्टीम"* नसती तर, ही विद्वत तमाम न्यायाधीश मंडळी *"चपराशी स्पर्धा परीक्षा"* पास झाले असते किंवा कसे ? हा संशोधनाचा विषय आहे. कारण *"मेरीट"* संदर्भ हा फक्त आणि फक्त मागासवर्गीय लोकांनाच लागु आहे. *"सर्वोच्च न्यायालय ही भारतीय संविधानाची कस्टोडियन / वॉच डॉग आहे."*  काय सर्वोच्च न्यायालय हे दायित्व प्रामाणिकपणे पार पाडित आहे काय ? मग उच्च न्यायालय / जिल्हा न्यायालय ह्यांच्या कडुन काय अपेक्षा करावी ?

       जुनागड (गुजरात) सम्राट अशोक कालिन शिलालेखात *"यौधेम गणस्य जय |"* असल्याचे म्हटले जाते. *"यौधेम"* हा शब्द *"योध्दा"* शब्द संदर्भात प्रयोग होत असुन *"यौधेम हा प्राचिन उग्र वादी बौध्द संघ होता"* तसेच *"आदि शंकराचार्य ह्यांचे बौध्द भिक्खु असणे"* ह्या विषयावर चर्चा पुन्हा कधी तरी करू या ! किंवा *"गाय"* ह्या प्राण्याला ब्राह्मण मंडळी *"यज्ञामध्ये बळी देवुन गोमांस सेवन"* (मनुस्मृती ५/३५ - जो मांस सेवन करणार नाही, तो २१ वेळा पशु योनीत जन्म घेईल) संदर्भात ही डॉ बाबासाहेब आंबेडकर हयांचे शब्द असे होते की, *"प्राचिन काळी हिंदु धर्मात यज्ञ विधीमध्ये गाईचा बळी दिल्याने स्वर्ग प्राप्ती होते, असे ब्राह्मण म्हणत असत. माझा त्यांना उघड सवाल आहे की, अशा रितीने जितक्या कालावधीत स्वर्ग प्राप्ती होत असेल तर, त्यापेक्षा लवकर आपल्या वडिलांचा बळी दिल्याने स्वर्ग प्राप्ती होईल."* (रंगुन, ब्रम्हदेश ४ डिसेंबर १९५४) येथे प्रश्न आहे की, *"ब्राह्मण वर्गानी गोमाता म्हणने"* हे झालेले परिवर्तन कसे काय ? तसाच विवादाचा विषय *"शिवलिंग"* सुध्दा आहे.  कारण ब-याच उत्खननात आणि मंदिरात *"शिवलिंगावर बुध्द विराजीत आहे."* ह्या संदर्भात प्राचिन पाली ग्रंथात *"शिव"* शब्द संदर्भात एक गाथा ही आहे, *"महारसो युगम्भीरयो, जयरामुच्छु निवारण | अरियो अट्ठांगिको मग्गो, दुखपसमनो सिवो ||"* (अर्थात - विपुल रस ज्यामध्ये आहे, जे गंभिर आणि जन्म मृत्यू चे निवारण करणारे, आर्य अष्टांगिक मार्गावरुन सर्व दु:खाचे शमन करणारे मंगलमय शिव आहेत. येथे शिव शब्द बुद्ध सुचक आहे‌) आणि *"शिव"* ह्यांचा संदर्भ हा *"गणपती"* सोबत जुळलेला आहे.

          *"Innocent law, no excuse"* हे विधान सरन्यायाधीश *धनंजय यशवंत चंद्रचूड* ह्यांना तंतोतंत लागू आहे. प्रधानमंत्री *नरेंद्र दा. मोदी* ह्यांनी आपल्या *"गुजराती पॅटर्न"* द्वारा, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ह्यांची गोची केली आहे. *"खाजगी / घरगुती कार्यक्रमात"* प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांचे जाणे ? हा देशात काळा इतिहास लिहिला गेला आहे. आणि *"No excuse in Judiciary"*  हे एक सत्य विधान आहे.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड असो की *"सर्वोच्च न्यायालय / उच्च न्यायालय / जिल्हा न्यायालय"* ह्या सर्वांना हे विधान बंधनकारक आहे. आणि म्हणुन *"विघ्नहर्ता गणपती हा न्यायाधीश वर्गाला विघ्नकारक झाला आहे."* मग ह्यातुन नागपूरच्या जिल्हा न्यायालयातील *"मुख्य न्यायाधीश "* हे तरी सुटणार कसे ??? आता कांग्रेस राजकुमार / लोकसभा विरोधी पक्षनेता *राहुल गांधी* ह्यांच्या बद्दल बोलु या ! *राहुल गांधी* हा आपल्या भाषणात *"भारत संविधान"* दाखवित असतो. परंतु त्या ना-लायक नेत्याला *"भारतीय संविधान आर्टिकल १"* अजुन कळलेले दिसत नाही.  संविधानात स्पष्ट लिहिलेले आहे की, *"India, that is Bharat"* तरी ही *"राहुल बाळ"* हा *"हिंदुस्थान"* (हिनदु + स्थान  / हिन + दु + स्थान / हिन = निच, दु = प्रजा, स्थान = देश / हिंदुस्थान = निच लोकांचा देश) म्हणुन, आपल्या देशाला शिवी देत आहे. *"राहुल गांधी हा निच असेल वा त्याचा परिवार ही निच असेल"* हा राहुल गांधी ह्यांचा व्यक्तिगत विषय आहे. आणि म्हणूनच *"राहुल गांधी हा देशाचा प्रधानमंत्री बनण्यास लायक नाही"* हे सत्य आहे. मागासवर्गीय *सिताराम केसरी / कर्पुरी ठाकुर* सारख्या मोठ्या नेत्यांना *"वर्ग आचं"* भोगावी लागलेली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यास ७५ वर्षाच्या वर कालखंड लोटलेला आहे. परंतु प्राचीन भारताचा महान *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांची जयंती ही देशभर *"शासन स्तरावर साजरी"* केली जात नाही वा त्या दिवशी *"सरकारी अवकाश"* ही घोषित नाही. माझी संघटना  *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* द्वारे ह्या संदर्भात शासनाला निवेदने दिली आहेत. कृतीशीलता शुण्य !!! मात्र *"अशोक चिन्ह"* ही भारताची *"राजमुद्रा"* आहे. ह्याला काय म्हणावे ? *"भारत राष्ट्रवाद भावना / मंत्रालय / संचालनालय"* ही नाहीं !!!

       *"भारत विदेश नीति"* संदर्भात बाबासाहेब डॉ. आंबेडकर ह्यांचे कथन आहे, *"अधिकार रूढ पक्षाशी वा अधिकाऱावरील गृहस्थांशी माझे मतभेद असले तरी त्याकरीता देशाची नाचक्की कधीही करणार नाही. समोरासमोर मी मंत्र्यांशी किंवा सरकार पक्षीय सभासदांशी दोन हात करील. पण परकिया देखत किंवा परदेशात त्यांचा मानभंग करणार नाही."* (न्युयॉर्क ३१ में १९५२) बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांच्या जीवन संघर्ष हा समस्त राष्ट्राला परिचीत आहे.  परंतु त्यांनी द्वेष भावना जोपासली नाही. *"बुध्दाच्या प्रेम - मैत्री - करुणा भावनेचा"* स्वीकार केला. *"राष्ट्र प्रथम, राष्ट्र नंतर ही"* हा विचार दिला. परंतु प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* असो की विरोधी पक्षनेता *राहुल गांधी* ह्यांनी विदेशात, भारताची गरिमा खालावली आहे. पक्ष नेते ही विदेशात एकमेकांची लक्तरे वेशीवर टांगतांना दिसतात. म्हणुन म्हणावे लागते की, *"हमाम हम सभी नंगे है."* कांग्रेस पितामह *मोहनदास गांधी* / संघवादी नायक *के. सुदर्शन* / प्राचिन भारताचे विचारविद *भर्तृहरी* ह्या मान्यवरांनी *"भारतीय राजनीतीला वेश्यालय"* ही उपमा दिली आहे. अर्थात त्यांच्या शब्दात नेते ही *"वेश्या"* आहेत. जसा *"तृतीयपंथी वर्ग"* आहे. तसाचं राजनीतिमध्ये *"वेश्या वर्ग."* तेव्हा ह्यांच्याकडुन *"विकास भारत"* अपेक्षा करणे मुर्खपणा आहे. ही राजकीय मंडळी *"भांडवलशाही व्यवस्था बेडवर झोपणारी"* एक जमात आहे, असे ही म्हणता येईल. ह्या मानसिकतेतुन न्यायव्यवस्था / कार्यकारी व्यवस्था वा अन्य कोणत्याही व्यवस्था ही परे आहेत काय ? हा संशोधनाचा एक विषय आहे. *"गुलाम भारत हा २६ जानेवारी १९५०"* ला प्रजासत्ताक देश झाला. अर्थात भारतात *"संविधान संस्कृती"* ची पहाट झाली. आणि *"संस्कृती संविधान"* हिचे मढे जमिनीत पुरले गेले. परंतु राजनीतीच्या ह्या *"वेश्या वर्गाने"* भांडवलशाही ला जन्माला घातले. *"विद्वत वर्ग"* हा झोपी गेलेला आहे. परंतु *संत कबिर दास* हे बुध्द मार्गावर जातांना *"प्रेम - मैत्री"* वर लिहुन जातात. *"पोथी पढि पाढे जग मुआ, पंंडित भया न कोई | ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय ||*

      जय भीम....!!!


*****************************

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

नागपूर, दिनांक १३ सप्टेंबर २०२४

No comments:

Post a Comment