👌 *बुद्ध निसर्ग !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
माझ्या बगिच्यातील
दिसणारे निसर्ग हिरवेपण
विविध रंगी फुलांचे फुलणे
मोगरा फुलांचा दरवळणारा सुगंध
गुलाब फुलांची मोहकता
आंबा चिकु जांभुळ सिताफळ
करवंद फळ झाडांचा सहवास
विविध रंगी फुलपाखरे बागडणे
कोयल पोपट बगळा हे पक्षी
तर कधी लव्ह बर्ड समान लहान पक्षी
ह्यांचे माझ्या बगिच्यातील वावर
भुंग्याचे मधुर गुंजन
फुलांसोबत जुडणारे त्यांचे प्रेम नाते
गुलमोहर फुलांची अंगणातील चादर
माझ्याकरीता बिछावलेली दिसते
माझ्या बगिच्यातील बुध्दाला
सकाळी उठल्यावर असणारे नमन
दिवसाला शांती अहसास करते
मग सुर्याच्या प्रात: किरणांचे
हळुच आगमण झालेले असते
कुठेही तिरस्कार भावना दिसत नाही
शुध्द हवेची झुळुकही असते
प्रेममय वातावरण असते
त्या समस्त फुल फळ झाडांना
मग पाण्याचा आहार देत असतांना
तर कधी त्यांना न्हावु घातल्यावर
निसर्ग हिरवेपण अजुन खुलुन दिसते
माझा रोजचा व्यायाम दिनचर्या
मला नविन उर्जा देत असते
तेव्हा निसर्गाचे हे आपलेपण
मला प्रेमाची अनुभुती करतो
तो मला राजा न वाटता
निसर्ग परी राणी असा बोध होतो
अलग जीवन अहसास असतो
प्रात: काळचा हा रोजचा अनुभव
मला नविन प्रेरणा देत देतो
माझ्यात करुणा जागवत असतो
बुध्द निसर्ग हे मला सांगत असतो !
बुध्द निसर्ग हे मला सांगत असतो!!
बुध्द निसर्ग हे मला सांगत असतो !!!
*************************
नागपूर दिनांक १ फेब्रुवारी २०२५
No comments:
Post a Comment