✍️ *९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष-पदाची पुरुष मक्तेदारी आणि स्त्रीवादी भावनांचे ब्राह्मणी लाचारीपण ?*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही ९७ झालेली आहेत. आणि केवल ५ महिलांना अध्यक्ष पदाचा मान मिळाला, असे गणितीय भाषा चर्चा (?) खुप सुरु झाली. यंदाचे नवी दिल्ली राजधानी येथे होणा-या फार मोठ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदांची माळ *डॉ तारा भवाळकर* ह्या महिला विभुतीच्या गळ्यात पडल्यामुळे त्या निश्चितच ६ व्या महिला संमेलनाध्यक्ष होणार आहेत. सदर अध्यक्ष पदावरून बोलतांना डॉ भवाळकर ह्या भाषणात *"कोणते तीर मारणार आहेत ???"* हे बघु यां. कारण आजपर्यंतच्या सर्व ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या *"भाषणाचे तीर"* आम्ही ऐकत आलेलो आहोत. मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व अध्यक्षपदाच्या *"मेरिट"* ह्या विषयावर चर्चा व्हायला हवी. ह्या तमाम मराठी साहित्य संमेलनात *"ब्राह्मण (?) मक्तेदारी"* नसती तर, साहित्यातील *"आंबेडकरी साहित्य / बौध्द साहित्य / विद्रोही साहित्य / आदिवासी साहित्य / व-हाडी साहित्य / दलित साहित्य / संत साहित्य / झाडीबोली साहित्य"* असे विविध साहित्य प्रकार जन्माला आले असते काय ? हा संशोधनाचा विषय आहे. तसे बघितले तर मानसी प्रकृतीत *"सकारात्मक / नकारात्मक"* ही दोन परस्पर विरोधी भाव (?) स्वभावतः दिसून येतात. आणि ह्यात *"ब्राह्मण स्त्रीवादी भाव साहित्य"* ही उसळी होणे आणि ९८ : ६ हे समिकरण काय -आणि कसे परिणाम करणारं आहे ? हे भविष्यात दिसणार आहे. प्रश्न आता *"स्त्रीवादी ब्राह्मणी भाव साहित्यातील आंबेडकरी / बौध्द / दलित / आदिवासी / व-हाडी / झाडीबोली साहित्य प्रकारातील स्त्री अस्तित्वाचाही आहे."* अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा *प्रा. उषा तांबे* ह्यांनी *"पुर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य (?) संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नेहमी होत असत. उमेदवार ह्याचे नाव कोणीतरी सुचवित असे. उमेदवाराला केवळ ना हरकत प्रमाणपत्र हे द्यावे लागत असे. पुढे निवडणूक न घेता हे पद सन्मानाने दिले जावे, असा ठराव झाला. तेव्हा पहिला मान अरुणा ढेरे ह्यांना मिळाला"* अशी छान (?) प्रतिक्रिया व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे सन १८४८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष *न्या. महादेव गोविंद रानडे* हे होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी सन १९६१ ला ग्वाल्हेर (म.प्र.) मराठी संमेलनाच्या अध्यक्षा *कुसुमावती देशपांडे* ह्या होत्या. एकंदरीत ह्या मराठी साहित्यातील *"ब्राह्मणी एकाधिकार पुरुष परंपरा"* ही नेटाने छान सुरु आहे. आता ह्या मराठी साहित्य संमेलन विवादात *"ब्राह्मणी महिला शक्तीचा"* प्रवेश झालेला आहे, असे म्हणायला हरकत नसावी..
मराठी भाषा - साहित्य - लिपी हिचा *"उगम - विकास"* संदर्भात बरीच विवाद आहेत. काही ब्राह्मणी साहित्यिक - विचारवंत ह्यांचे लिखाण हे एकांगी स्वरूपाचे दिसून येते. तेव्हा *"मराठी भाषा - साहित्याचा खरा उद्गाता कोण ?"* हा प्रश्न आहे. *"प्राचीन भारताचा इतिहास"* हा असत्यधारेचा इतिहास आहे. *"सरस्वती"* ही विद्येची देवी. पण तिचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान काय ? हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. *आंबेडकरी - बौद्ध साहित्यिकांनी - विचारवंतानी* ह्या विषयावर खुप फारसे संशोधन केले आहे, असे ही दिसुन येत नाही. मी खुप मोठा साहित्यिक/ समिक्षक आहे, असा माझा मुळींच दावा नाही. मी केवळ अभ्यासक आहे. कुठेतरी ह्या विवादीत विषयाला न्याय मिळावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. प्राचिन भारताचा इतिहास हा *"सिंधु घाटी सभ्यता"* पासुन पुढे *"गोतम बुध्द काळापर्यंत"* चालत जातो. हा इतिहास शिलालेख / ताम्रपट इत्यादीतुन दिसुन येतो. *"सिंधु घाटी लिपी"* ही अद्यापही वाचली गेली नाही. इसा पुर्व सातव्या - सहाव्या शतकातील *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ही पुढे वाचली गेली असल्यामुळे प्राचिन भारताचा बोध होतो. गोतम बुध्द काळात *"पाली प्राकृत भाषा"* ही बोली भाषा होती. पुढे पाली भाषेवर संस्कार झाल्यावर *"संस्कृत भाषा"* ही उदयाला आली. परंतु प्राचिन संस्कृत ही *"हिब्रू संस्कृत भाषा"* होती. आताची संस्कृत ही तर *"क्लासिकल संस्कृत भाषा"* आहे. *बोधिसत्व अश्वघोष* (इ. पु. १५०) ह्यांनी *"बुद्धचरित्रम् / सौदरानंदम् / सारिपत्तप्रकरण / वज्रसुची"* सारख्या रचना लिहिलेल्या आहेत. ते *"बौध्द दार्शनिक / नाटककार / कवि / संगितकार / कुशल वक्ता"* असल्याची अनुभूती सहज होवून जाते. अश्वघोषाचे साहित्य हे *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / दर्शनशास्त्र / नैतिकवाद"* ह्यांची अनुभुती देवुन जातो. परंतु नंतर झालेला *"कालिदास"* ह्यांच्या जन्म - मृत्यु संदर्भात कुठेही प्रमाण दिसुन येत नाही. परंतु कालिदास ह्यांनी *"मेघदुतम् / कुमारसंभवम् / ऋतुसहांर / रंघुवंशम् / शाकुंतलम्"* सह एकुण ४० रचना लिहिलेल्या आहेत, हे सांगितले जाते. परंतु कालिदास ह्यांची रचना *"भोगवाद"* हा सांगुन जातो. दुसरे म्हणजे *"हिब्रू संस्कृत"* भाषेतील *"आद्य कवि"* हे आचार्य अश्वघोष असतांना *कालिदास* ह्यांच्या नावाचा फार उदोउदो केला जातो. *"हिब्रू संस्कृत"* नंतर *"अपभ्रंश भाषा - साहित्याचा उदय"* होतो. आणि कालिदास ह्यांच्या लिखाणात *"अपभ्रंश भाषेचा प्रभाव"* दिसून येतो. महत्वाचे म्हणजे *"हिब्रू संस्कृत"* भाषेची लिपी ही *"ब्राम्ही"* तर *"क्लासिकल संस्कृत"* भाषेची लिपी ही *"देवनागरी"* आहे, हे समजून घेणे फार गरजेचे आहे.
*"अपभ्रंश भाषा - साहित्य"* संदर्भात चर्चा करतांना *"वल्लभी दर्शन (इसवी ५५०) / सिध्द सराहपाद (इसवी ७६९) / उद्दोत्तर सुरी (इसवी ७७९) / देवेन (इसवी ९३४) / आणि शेवटचा अपभ्रंश भाषा कवि रूईथु (इसवी १४००)"* ह्यांचा उल्लेख करता येईल. त्यांनंतर *"आदि हिंदी भाषा - साहित्य"* हिचा उदय होतो. *"सामान्यतः पालि प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदी होय."* इसवी १२ व्या शतकातील *अब्दुल रहमान* (अद्दाहमान) हे आदि हिंदीचे पहिले कवि आहेत. त्यांनी *"संदेश रासक"* नामक काव्य संग्रह लिहिला आहे. ह्याशिवाय *"शालिभद्र सुरी (११८४) /अमिर खुसरो (१२५३ - १३२५) / हंसाउली (१३७०) / संत कबिर (१३९९ - १५१२) / रामानंद (१४५०) / कालामितुल (१५८०) / नाभादास (१५८५) / बनारसीदास (१६०१) / गुरु अर्जुन देव (१६०४) / गोस्वामी तुलसीदास (१५३२ - १६२३) / जटमल (१६२३) / आचार्य केशव दास (१६३४)"* ह्यांचा उल्लेख करता येईल. त्यानंतर इसवी १६४५ हा कालखंड *"उर्दू भाषा - साहित्याचा"* दिसुन येतो. इसवी ११०० हा कालखंड *"देवनागरी लिपी प्रथम प्रारुप स्वरुप"* मानला जातो. परंतु देवनागरी लिपीचा प्रारंभ इसवी १७९६ पासुन दिसुन येतो. आदि हिंदी भाषा आदि कवि *अद्दाहमान* आणि *संत कबीर* ह्या दोघांनीही त्यांची जाती *"कोली तसेच जुलाह"* ही सांगितली आहे. आधी ते दोघेही कवि हे *"कोली जातीचे"* आणि मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर *"जुलाह"* जातीचे झालेले दिसुन येतात. कोली आणि जुलाह ह्या जातीचा व्यवसाय *"विणकाम"* आहे. कोली ही जाती *"कोलीय"* वंशासोबत सलग्न असुन सिध्दार्थ ह्यांची पत्नी यशोधरा ही *"कोलीय"* होती. आणि त्यांचा व्यवसाय हा विणकाम होता, असा प्राचीन इतिहास आहे.
*"आधुनिक हिन्दी भाषा - साहित्य"* हे १८ व्या शतकात उदयास आले. साहित्यिक *गार्सा तासी* (१८३९) यांना आधुनिक हिंदी भाषेतील पहिला इतिहासकार मानले जाते. त्यांनंतर *"उदत मार्तंड (१८२६) / ओम जय जगदीश (१८३७) / शिव सिंह सरोज (१८८३) /राजा शिवप्रसाद (१८६८) / अयोध्या प्रसाद खत्री (१८७७)"* अशी लांब यादी आहे. १ में १९५० ला *"हिन्दी राजभाषा हिन्दी साहित्य संमेलन "* स्थापना केली जाते. त्यापुर्वी इसवी १८८१ लाख *"उत्तर प्रदेश हिन्दी प्रयाग"* आणि १८९३ ला *"काशीनगरी प्रचारीनी सभा"* हिची स्थापना केली गेली. *"ऋगवेद ग्रंथाची"* प्रमाणित प्रत *"युनोस्को"* लाख सन १४६२ साली पाठविण्यात आली. *आदि शंकराचार्य* ह्यांचा जन्म इसवी ८५० साली झालेला असुन त्यांना *"प्रच्छन्न बौध्द"* ही म्हटले जाते. *महायान बौध्द संप्रदाय"* ह्या पासुन *"वज्रयान संप्रदाय"* आणि वज्रयान संप्रदाय पासुन *"तंत्रज्ञान संप्रदाय "* उदयास आला. वज्रयान संप्रदाय आणि तंत्रयान संप्रदाय ह्यांनी *"शैव पंथ / वैष्णव पंथ / शाक्त पंथ"* ह्यांना जन्माला घातले. पुढे आदि शंकराचार्य ह्यांनी समस्त बौध्द विहारावर आपले अधिपत्य केले. आता आपण *"मराठी भाषा - साहित्य "* ह्या विषयाकडे वळु या. मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी ७०५ वर्षांचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे सापडलेला आहे. दुसरा शिलालेख इसवी १०१२ हा रायगड जिला अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी आढळला आहे. तिसरा शिलालेख हा सोलापूर जिल्ह्यांतील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडलेला आहे. चवथा शिलालेख इसवी १०३९ साली कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडलेला आहे. ह्या शिलालेख संदर्भात चर्चा पुन्हा कधी तरी करु या. मराठी भाषातज्ज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"समंत सिध्दांता"* नुसार मराठीचे मुळ *"तामिळ भाषेतून"* मानलेले आहे. *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी सदर विधानाची पुष्टी केली आहे. *दुर्गा भागवत* हिने राजाराम शास्त्री ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी भाषा मानलेली आहे. परंतु संस्कृत भाषा कोणती ? *"हिब्रू संस्कृत वा क्लासिकल संस्कृत."* येथे हा विषय *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भात असावा, हे म्हणता येईल. तर *प्रा. हरी नरके"* हे *"मराठी भाषा ही इसवी सनाच्या पुर्वीपासून अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासून शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासुन कालांतराने मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती मानलेली आहे."* हरी नरके ह्यांचा हा अफलातून जावई शोध दिसुन येतो. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट प्रकार दिसुन येतात. महत्वाचे म्हणजे मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी *"दोन हजार वर्षांचा इतिहास"* असणे गरजेचे असल्यामुळे *"सातवाहन बौध्द काळातील नाणेघाट शिलालेख"* हा आधार घ्यावा लागला, हे समजून घेणे गरजेचे आहे.
मराठी साहित्यातील *"अग्रणी कवि"* असलेले शिंपी जातीचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते २/१२/१२९६) / नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०) महार जातीचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ही मान्यवर असतांना *"ब्राह्मणी व्यवस्थेने"* इसवी १२ व्या शतकातील *मुकुंदराज* तसेच *संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदोउदो करुन, *संत नामदेव महाराज / संत जनाबाई / संत चोखामेळा महाराज* ह्यांच्यावर अन्याय केलेला आहे. त्यांनंतर सोनार जातीचे *नरहरी सोनार* / चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा*'/ ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* / वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०११६०८ ते १९/०३/१६५०) ही सर्व संत मंडळी पंढरीचे *"विठोबा / बुद्ध "* ह्यांना शरण गेल्यामुळे त्यांना दुर्लक्षीत करण्यात आले. ब्राम्हण धर्माचे *संत रामदास स्वामी* (१६०६ ते १६८२) ह्यांचा फार उदोउदो करण्यात आला. तर रामदास स्वामी ह्यांचे दुरचे नातेवाईक असलेले *एकनाथ महाराज* (१५३३ ते १५९९) हे बुध्दाला शरण गेल्यामुळे त्यांना दुर्लक्षीत केल्याचा इतिहास आहे. *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांनी *संत तुकाराम महाराज* ह्यांना आपले गुरु मानले असतांना *संत रामदास स्वामी* ह्यांचा नावे खोटा इतिहास रचला गेला. मराठी साहित्याची लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. आणि तमाम भाषेची जननी ही *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) तर भाषा ही *"पाली प्राकृत भाषा"* आहे. अर्थात मराठी साहित्यावर असलेला *"ब्राह्मणी एकाधिकार"* हा कुठेतरी आपल्याला तोडावा लागणार आहे. तसेच *"ब्राह्मणी महिला साहित्यिक"* वर्गाचे अधिपत्यही आमच्या ह्या *"महिला साहित्यिक वर्गाकडून"* संपविणे हे फार गरजेचे आहे. प्रश्न हा की, *"आम्ही मराठी भाषा - साहित्य ह्यावर अधिपत्य करण्यास कधी मार्गक्रमण करणार ?"* मराठी भाषा - साहित्य क्रांतीच्या अपेक्षेत !!!
----------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक १५ फेब्रुवारी २०२५
No comments:
Post a Comment