✍️ *माईसाहेब (सविता) आंबेडकर ह्यांच्या जीवनावरील हरिदास बेलेकर लिखित चित्रण म्हणजे एक गंभीर विवादीत आवाहन !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
*मावळत्या सुर्याची सावली माईसाहेब* (डॉ सविता भीमराव आंबेडकर) पुस्तक लेखक आयु. *हरिदास बेलेकर* हे दहा - बारा दिवसांपुर्वी आंबेडकरी कार्यकर्ता राजकुमार वंजारी ह्यांच्या समवेत मला भेटायला आले. तेव्हा बेलेकर जी ह्यांनी माईसाहेबांच्या जीवनावरील पुस्तक मला भेट दिले होते. सदर पुस्तकाचे शिर्षक बघताचं त्वरीतचं मी हरीदास बेलेकर ह्यांना *माईसाहेब* ह्या बाबासाहेबांच्या जीवनातील खुप विवादीत पात्र असल्याचे बोलतांना *सोहनलाल शास्त्री* ह्यांनी लिहिलेल्या *"बाबासाहेब डॉ आंबेडकर के संपर्क में (२५) पच्चीस वर्ष"* ह्या पुस्तकाचा संदर्भ दिला. ह्यासोबतचं माईसाहेब डॉ सविता आंबेडकर ह्यांनी लिहिलेले *"डॉ आंबेडकरांच्या सहवासात"* ही पुस्तक वाचल्याचेही सांगितले होते. हरिदास बेलेकर ह्यांनी लिहिलेले पुस्तक वाचल्यावर संपूर्ण पुस्तक हे तर मला माईसाहेब लिखित पुस्तकांच्या अवती भवतीचं फिरतांना दिसुन आले. सदर पुस्तकातील संदर्भ ग्रंथामध्ये *सोहनलाल शास्त्री* लिखित पुस्तकाचा संदर्भ दिसुन आलेला नाही. अर्थातचं बेलेकर ह्यांनी सोहनलाल शास्त्री लिखित पुस्तक वाचलेले दिसुन येत नाही. जर बेलकर ह्यांनी सोहनलाल शास्त्री लिखित पुस्तकाचे वाचन केले असते तर, कदाचीत पुस्तकातील संदर्भ आणि भाषा ही वेगळी दिसुन आली असती. कारण सोहनलाल शास्त्री ह्यांचा बाबासाहेब ह्यांच्या सोबत केवळ घनिष्ट संबंधचं नव्हते तर, त्यांना बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्रालय विभागात *"द्विभाषी"* म्हणुन नियुक्त केले होते. तसेच ते बाबासाहेब ह्यांच्या बंगल्यामध्ये कर्मचारी आऊट हाऊसमध्ये राहातं होते. ह्यासोबतचं बाबासाहेब ह्यांच्या तब्येतीची काळजी आणि सेवा ते स्वतः आणि काही मंडळी ही करीत होती. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांच्यासोबत त्यांचे समस्त आयुष्य खर्ची झाल्याचा दिर्घ अनुभवांवर सोहनलाल शास्त्री ह्यांनी बाबासाहेब जीवन कार्य आणि माईसाहेब ह्यांच्या संदर्भात पुस्तक लिहिलेले आहे. सदर पुस्तकाचे पहिले संस्करण हे सन १९७५, दुसरे संस्करण १९८५ आणि तिसरे संस्करण १९९१ ला झालेले आहे. माईसाहेब आंबेडकर ह्यांनी सोहनलाल शास्त्री ह्यांच्या त्या पुस्तकाच्या उत्तरादाखल सन १९९० ला *"डॉ. आंबेडकरांच्या सहवासात"* हे पुस्तक लिहिलेले होते. परंतु सोहनलाल शास्त्री ह्यांनी दिलेल्या संदर्भाला उत्तर देण्यास माईसाहेब ह्या सफल झालेल्या दिसुन आलेल्या नाहीत. केवळ माईसाहेब ह्यांनी लग्नापूर्वी लिहिलेले पत्र हे संदर्भ दिले. काही संदर्भ लग्नानंतरची ही आहेत. ह्या विषयावर पुढे चर्चा करणार आहोत. परंतु *प्रसेनजीत गायकवाड* सारख्या अभ्यासु व्यक्तीने सदर पुस्तकाची प्रस्तावन लिहितांना *"माईसाहेबावरील विटाळ त्यांच्या हयातीत जाऊ शकले नाही. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर झाल्याचा संदर्भ"* हा तर मनाला वेदना देणारा वाटला. कुठे तरी अशा *"विवादीत विषयावर"* संशोधनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे.
डॉ. माईसाहेब आंबेडकर लिखित *"डॉ आंबेडकरांच्या सहवासात"* पुस्तक शिर्षकात *"बाबासाहेब"* असा सन्मानित शब्दप्रयोग न करणे / एकेरी भाषेचा केलेला प्रयोग खुप वेदना करुन जातो. दुसरा विवादीत विषय माईसाहेब ह्यांनी स्वतःची तुलना *"यशोधरा"* सोबत केलेली आहे. माईसाहेब ह्यांच्या चारित्र्यात *"यशोधरा"* हा तर खुप दुरचा विषय आहे, *"रमाई"* ह्यांच्या निष्ठा - त्याग - प्रेमाच्या अर्ध्या भागात ही त्या बसणा-या नाहीत. *"यशोधरा आणि रमाई"* ह्यांच्या मोठेपणा ह्या विषयावर पुन्हा कधी तरी चर्चा करु. *"बाबासाहेब - माईसाहेब ह्यांच्या पहिल्या भेटीचा"* प्रसंगचं खुप विवादीत आहे. *माईसाहेबांनी* बाबासाहेब ह्यांचे मित्र *डॉ. राव* ह्यांच्या घरी भेट झाल्याचा संदर्भ दिला आहे. तर *सोहनलाल शास्त्री* ह्यांच्या पुस्तकात *डी. पी. जाधव* (नंतर ते चित्रे ह्यांचे जावई झाले ) / *चित्रे / डॉ. मालवणकर / डॉ शारदा कबीर* ह्या चांडाल चौकडी द्वारा बाबासाहेब ह्यांची फसवणूक करुन *संबंध जोडण्यात"* आल्याचा संदर्भ दिला आहे. मालवणकर हे मुंबई येथिल नामांकीत डॉक्टर नसल्याचा ही उल्लेख आहे. सोहनलाल शास्त्री ह्यांच्या लिखीत पुस्तकात *"डॉ. मालवणकर - शारदा कबीर"* ह्यांच्या घनिष्ट मैत्रीचा संदर्भ ही आहे. *हकिम हाजिक हकिम सिराउद्दीन* ह्यांनी बाबासाहेब ह्यांच्या स्वास्थाचे परिक्षण केले होते. आणि सल्ला दिला होता की, *"आपके दात बहुत मजबुत है. उसे मत उखाडीये."* परंतु डॉ मालवणकर टीम द्वारा बाबासाहेब ह्यांचे *"दात उपडण्यात"* आले होते. सदर पुस्तकात *वैद्द सुंधवा* ह्यांनी मधुमेह व्याधीत बाबासाहेबांना दुसरे लग्न करावे, असा दिलेला प्रस्ताव नाकारल्याचा ही संदर्भ आहे. एक नामांकित *कॅम्युनिस्ट नेता* ह्यांची डिव्होर्सी असलेली पत्नी द्वारा बाबासाहेब ह्यांना *"सामाजिक संबंध"* ठेवण्याचा दिलेला प्रस्ताव नाकारल्याचा ही संदर्भ आहे. बाबासाहेब ह्यांचे ब्राह्मण शिक्षक *प्रा. पी. वी. काणे*(भारत रत्न) ह्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहुन *शारदा कबीर* ह्या उचित स्त्री नसल्याचा / त्यापेक्षा एखादी *"वेशा योग्य स्त्री"* होईल, हा संदर्भ दिला आहे. *दादासाहेब गायकवाड* ह्यांनी तर बाबासाहेबांना त्यांची साळी *शांताबाई* हिला सेवा करण्यास बोलल्याचा संदर्भ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश *कपुर* ह्यांनी तर बाबासाहेब ह्यांना लग्न करण्यात फसवणुक झाल्याचा ही संदर्भ आहे. *वैद्य चतुरसेन* (ब्राह्मण) हे बाबासाहेब ह्यांच्या सोबत आरोग्य विषयी चर्चा होत असतांना माईसाहेब ह्यांच्या हिन व्यवहाराचा संदर्भ आहे. तेव्हा वैद्य चतुरसेन ह्यांचे बोल ही समजुन घेणे गरजेचे आहे. *बाबासाहेब - माईसाहेब ह्यांच्या झटपटीचा* ही उल्लेख आहे. माईसाहेब ह्यांनी सन १९४८ मध्ये बाबासाहेब ह्यांना *मका कणीस* खावु घातल्यानंतर रात्रभर झालेल्या प्राणांतिक वेदनां झाल्यानंतर सोहनलाल शास्त्री ह्यांनी बाबासाहेब ह्यांना दवाखान्यात दाखल केल्याचा संदर्भ आहे. जर बाबासाहेब दवाखान्यात भरती झाले नसते तर, बाबासाहेब ह्यांचे महापरिनिर्वाण हे १९४८ ला झाले असते. माईसाहेब ह्यांनी तर ह्या विषयाला अलग पध्दतीने मांडलेले दिसुन येते. माईसाहेबांचे *"भारतीय संविधान"* असो वा *"हिंदु कोड बिल"* योगदान (?) संदर्भ असो वा *"धम्म दिक्षा समारोह"* असो वा, विदेशातील *"आंतरराष्ट्रीय परिषद"* असो वा परिवारातील *"संपत्ती विषयक न्यायालय विवाद"* असो वा *"बाबासाहेब ह्यांचा मृत्यू"* ही संपुर्ण विषय विवादीत आवाहने आहेत. ह्या समस्त विषयावर *"संशोधनात्मक अभ्यास"* होणे गरजेचे आहे.
हरिदास बेलेकर लिखित *"मावळत्या सुर्याची सावली"* ह्या पुस्तकाचे शिर्षकचं (?) मनाला खुप झोंबणारे आहे. बाबासाहेब हे मावळणारे व्यक्तिमत्त्व नाही. भारतीय *"समाज नीति - राज नीति - धर्म नीति - अर्थ नीति - न्याय नीति"* पासुन समस्त *"नीति शास्त्राचे रूप प्रतिबिंब"* म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेब आज ही प्रासंगिक आहेत. म्हणुन बाबासाहेब हे ना ही *"मावळते सुर्य"* आहेत, ना ही ते *"उगवता सूर्य"* आहेत. बाबासाहेब हे समस्त विश्वाचे *"क्रांती सूर्य / प्रज्ञा सूर्य / बुद्ध सुर्य"* आहेत. तेव्हा पुढच्या आवृत्तीमध्ये सदर शिर्षकात बेलेकर ह्यांनी बदल करावा असे वाटते. दुसरे म्हणजे डॉ माईसाहेब आंबेडकर लिखित *"डॉ आंबेडकरांच्या सहवासात"* ह्या पुस्तकाच्या अवती भवतीचे हरिदास बेलेकर ह्यांची पुस्तिका एक लहान रुप दिसुन येते. माईसाहेब संदर्भात दोन विचार प्रवाह असणे हे काही नविन नाही. परंतु *"उदात्तीकरण करणे"* हा खुपचं चिंतेचा विषय आहे. माईसाहेबांचे राजकारण (?) ही समजणे इतके सहज नाही. कारण रिपब्लिकन तमाम नेत्यांची (?) *"राजकारणातील दिशा - दशा - अवदशा - वास्तव"* ही समजुन घेणे गरजेचे आहे. माईसाहेब ह्या तर राजकारणातला एक भाग आहे. माईसाहेबांनी लिहिलेल्या पुस्तक संदर्भात सामान्य माणुस हा खुप प्रभावित होवुन जावु शकतो. हा भावनिक विषय आहे. तेव्हा कोणतेही पुस्तक असो, ते *"वाचणे - समजणे - उमगणे - लिहिणे"* ह्याकरीता *"प्रज्ञा चक्षु दृष्टी"* ही तर असायलाचं हवी. कारण माईसाहेब ह्यांना तर बाबासाहेब ह्या नावाचे *"नाम वलय"* आहे. तेव्हा माईसाहेब ह्या केवळ *"माईसाहेबचं"* राहाणार आहेत. *"आईसाहेब"* (रमाई) ही जागा त्यांना कधीच मिळणारी नाही. ही गोष्ट हरिदास बेलेकर असो वा डॉ माईसाहेब ह्यांचे पाठीराखे लेखक असो ह्यांनी समजुन घेणे गरजेचे आहे.
------------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक ६ फेब्रुवारी २०२५
मो. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
No comments:
Post a Comment