👌 *बहुजन हिताय बहुजन सुखाय !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
माणसाचे माणुसपण
हे सहजपणे न्हाहाळतांना
वर वर दिसणारे माणुसी प्रतिबिंब
आणि खोलवर असणारा
हा माणसाचा चारित्र गाभा
जीवन व्यवहार कुशलतेची
जाणिव करुन देत असतो
आणि जीवनातील संघर्षात
तो मैलाचा दगड ठरत असतो...
माणसाचे धावणे
हे उद्दीष्ठ पराकाष्ठा ठेवुन
मित्र म्हणुन सोबत असतो
तो धावतो - थकतो - थांबतो
पण उद्दीष्ठ पराकाष्ठेला
सोडुन ते चालणारे नसते
म्हणुन पुन्हा पुन्हा धावत राहाणे
ही जिद्द जो माणुस धरुन असतो
तो आयुष्यात विजयी होतो...
शाक्य कुमार सिध्दार्थ
संघ नियम स्वीकारतांना
रोहिणी नदी विषय संघर्षात
राजवाड्यातुन बाहेर पडतो
देश त्याग केलेला असतो
आणि बुध्दत्व प्राप्तीतुन
जगाला प्रेम मैत्री करुणा
शांती अहिंसा हा मार्ग देतो
बहुजन हिताय बहुजन सुखाय !!!
---------------------------------------
नागपूर दिनांक १२ फेब्रुवारी २०२५
No comments:
Post a Comment