🧜♀️ *प्राचिन बौध्द साहित्यातील सौंदर्यशास्त्र आणि नैतिकवाद !* (मराठी भाषेवरील ब्राम्हणी साहित्य मक्तेदारीला आम्ही शह देणार काय ?)
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
बौध्द धर्मामध्ये सौंदर्यशास्त्र म्हणजे *"जीवनातील आंतरिक मुल्य म्हणून आनंद घेणे होय."* सौंदर्यशास्त्रातुन जीवनाचे मुल्य म्हणून आनंद घेण्याची मुलभुत धारणा योग्य मानली जाते. आणि *"जग आणि जीवन"* ह्यांना आंतरिक मुल्य मानलेले आहे. *"निर्वाण"* म्हणजे जे आहे तसेच आहे, असा साधा आणि सोपा अर्थ दिलेला आहे. बौध्द धर्म हा *"निरिश्वरवादी / अध्यात्मवादी / समतावादी / विज्ञानवादी / मानवतावादी / नैतिकवादी"* असा धर्म आहे. प्राचिन बौध्द काळातील विविध मान्यवरांच्या बौध्द ग्रंथांचा संदर्भ हा देता येतो.आणि त्यामध्ये धर्मग्रंथ / भाष्य / काव्यात्मक भावांचा उल्लेख करता येईल. बुध्दाच्या शिकवणुकीचे जतन करणे मग ते आलेचं. बौध्द साहित्याची उत्पत्ती / वैशिष्ट्ये / प्रमुख कालखंड / महत्वपूर्ण ग्रंथ / विविध सांस्कृतिक आणि बौध्दिक परंपरा / प्रभाव ह्या संदर्भात आपल्याला तपशीलवार अभ्यास करणे हे फार गरजेचे आहे. *"सिंधु घाटी सभ्यता"* ह्या नगरीय सभ्यतेमध्ये पहिला बुध्द *ताण्हणकर बुध्द* पासुन २८ वे बुध्द *शाक्यमुनी बुद्ध* पर्यंतचे सर्व जीवन संदर्भ - लिपी - भाषा साहित्य, ही सौंदर्यशास्त्राचा बोध करुन जातो. निसर्ग मैत्रीचा संदर्भ देतो. सिंधु सभ्यतेतील चित्र असो वा डॉंस करणारी सुंदर स्त्री प्रतिकृती हे सर्व काही सौंदर्यशास्त्र भावनेची अनुभुतीचं आहे नां !
प्राचिन बुध्द साहित्यातील बरीच पात्रे ही सौंदर्यशास्त्र विषयाचे बोध करणारी आहेत. वैशाली राज्याची नगरवधु *"आम्रपाली"* हिच्या जन्मापासुन ते तिचे *"अर्हत"* अवस्थेला जाणे, ह्यामधील कालखंड हा आम्रपालीच्या सौंदर्य भावनेची अनुभुती देतो. आम्रपाली हिचे नगरवधु बनने / मगध राजा *बिंबिसार - आम्रपाली* ह्या दोघांचे निस्सीम प्रेम होणे / मगध द्वारा वैशाली वर आक्रमण / आम्रपाली हिच्यावर असणा-या राजा बिंबिसाराच्या निस्सिम प्रेमामुळे युध्द बंद होणे / आम्रपाली हिला तिचा प्रेमी *"हा मगध देशाचा राजा आहे,"* म्हणुन देशप्रेमातुन दोघांचा वियोग होणे / बिंबिसाराचा पुत्राला आम्रपालीने - विमल कौंडिण्य ह्याला जन्म देणे / रस्त्याने जाणा-या एका युवा बौध्द भिक्खुला आम्रपाली हिने तिच्या महालात चार महिने वर्षावासाला निमंत्रण देणे / चार महिन्यांनंतर युवा बौध्द भिक्खु समवेत आम्रपाली हिने स्वतः भिक्खुचे वस्त्र घालुन बुध्दासमोर दीक्षीत होणे / आम्रपाली द्वारा आपला आलिशान महल - आपले आम्रवन बुध्दाला दान देणे / आम्रपाली हिचे *"अर्हत"* बनने / नंतर आम्रपाली - राजा बिंबिसाराचा मुलगा विमल कौंडिण्य ह्यांचे बौध्द भिक्खु बनने, आम्रपाली हिच्या ह्या समस्त जीवन कार्यात आम्ही *"सौंदर्यशास्त्र"* शोधणार आहोत की नाही ? हा प्रश्न आहे. *कालीदास* ह्याची रचना *"अभिज्ञान शाकुंतलम्"* ह्यामध्ये *"राजा दुष्यंत - शाकुंतला"* ह्यांच्या प्रेमाच्या संबंधातील, शांकुतला हिच्या अंगप्रदर्शनाचे अश्लील वर्णन, हा *"भोगवाद"* संदर्भ देवुन जातो. परंतु बौध्द साहित्यात *"आम्रपाली"* हिच्या निस्सिम प्रेमाच्या संबंधात नैतिकता ही जोपासलेली दिसुन येते. अर्थात बौध्द साहित्यात *"सौंदर्यशास्त्र वर्णनात नैतिकवाद"* जोपासलेला दिसुन येतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.
*"सिंधु घाटी सभ्यता"* कालखंड (पुर्व सिंधु सभ्यता इ. पु. ७५०० - ३३०० / सिंधु सभ्यता इ. पु. ३३०० - २६०० / परिपक्व सिंधु सभ्यता इ. पु. २६०० - १९००) हा नगरीय सभ्यतेचा इतिहास आहे. **ब्राम्हण सभ्यता"* इतिहास हा *"ग्रामिण ऋषी सभ्यतेचा"* इतिहास आहे. परंतु सिंधु घाटी सभ्यतेमध्ये कुठेही (?) *"ग्रामीण ब्राह्मण संस्कृतीचा"* आढळुन आलेला नाही. अर्थात ब्राह्मणी संस्कृतीचा *"शिलालेख / ताम्रपत्र / ताडपत्र"* असा ठोस पुरावा आढळुन आलेला नाही. त्यामुळे *"विदेशी आर्य ब्राह्मण थेअरी"* हा इतिहास एक प्रश्न चिन्ह आहे. *"सिंधु घाटी सभ्यता लिपी"* ही अजुनही वाचली गेलेली नाही. इसा पुर्व सातवी - सहावी शतकातील *शाक्यमुनी बुध्द* ह्या कालखंडातील *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ही वाचली गेलेली आहे. बुध्द कालखंडात बोली भाषा ही *"पाली प्राकृत"* भाषा होती. पुढे पाली भाषेवर संस्कार करण्यात आले. आणि *"हिब्रू संस्कृत"* ह्या भाषेचा जन्म झाला. लिपी मात्र ही *"ब्राम्ही लिपी"* होती. तर सध्याची संस्कृत ही *"क्लासिकल संस्कृत"* भाषा असुन, तिची लिपी ही *"देवनागरी"* आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोकाचे शिलालेख "* ही बौध्द संस्कृतीची साक्ष आहे. प्राचिन काळातील *"बम्हण"* हा शब्द *"ब्राम्हण"* ह्या अर्थी नसुन, बम्हण हा शब्द *"समन / श्रवण / विद्वान"* ह्या अर्थाने प्रयोगात होता. ब्राम्हण संस्कृतीची *"चातुर्वर्ण्य पध्दती"* ही सुध्दा बुध्द कालखंडात अस्तित्वात नव्हती. तर *"वंश पध्दती"* हिच अस्तित्वात होती. जसे - शाक्य वंश / कोलिय वंश / मौर्य वंश / हरयक वंश / कुशाण वंश / नाग वंश / शुंग वंश / शक वंश / गुप्त वंश / पाल वंश.
प्राचिन बुध्द कालखंडात मौर्य वंश / हरयक वंश आदी वंशाची सत्ता होती. पुढे तर बुध्द धर्म हा *"हिनयान - महायान"* हा दोन विचारधारेत विभागला गेला. *"त्रिपिटक ग्रंथ"* (सुत्त पिटक / विनय पिटक / अभिधम्म पिटक) हा हिनयान संप्रदाय संबंधित ग्रंथ मानला जातो. तसेच *"आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ह्या विद्वानांचा बोलबाला दिसुन येतो. महायानी *वसुमित्र* रचित अभिधम्म / प्रकरण पादशास्त्र / धातुकाय पादशास्त्र, *आचार्य कल्याणी पुत्र* रचित दिव्यावदान, *नागार्जुन* रचित मध्यमिका कारिका, शुण्यवाद, *आर्य देव* रचित चतु:शतक, *मैत्रीनाथ* रचित अभिसमयालंकार, *असंग* रचित महायान सुत्रालंकार, *दिग्नाग* रचित न्याय प्रवेश, *धर्म किर्ती* रचित न्यायबिंदु, *आचार्य शांतीदेव* रचित बौध्दाचार्य अवतार, *आचार्य अश्वघोष* रचित बुध्दचरित्रम् / सौदरानंदम् / वज्रसुची / शारीपुत्रप्रकरणम् / उर्वशी वियोग / राष्ट्रपाल ह्या ग्रंथाचे लेखन झालेले दिसुन येते. *हिनयानी ग्रंथ* म्हणुन प्रतित्यसमुत्पाद / निर्वाण प्राप्ती हे प्रमुख ग्रंथ तर *महायानी ग्रंथ* म्हणुन प्रज्ञा पारमिता / सद्धर्म पुण्डरीक / ललीत विस्तार / अट्ठसहस्त्रिका / महावस्तु / लंकावतार सुत्र / दशभुमीश्वर / नागानंदा ह्या ग्रंथाचा उल्लेख करता येईल. *"बुध्द वंस"* ह्या प्राचिन ग्रंथात *"बुद्ध वंशावळी"* दिसुन येते. श्रीलंका देशातील *दीपवंश* (बेटांचा इतिहास) आणि *महावंश* (महान इतिहास) ही ग्रंथ प्राचिन बौध्द साहित्याची साक्ष देतात. *"विशुध्दीमग्ग / जातक कथा"* तसेच *"मिलिंद प्रश्न"* ह्या बौध्द साहित्याचाही विशेष उल्लेख करता येईल. ह्याशिवाय *"गांधार कला आणि मथुरा कला"* ह्या शिल्पकलेचा आविष्कार ही बुध्द धर्माची देणं आहे. अर्थात *"साहित्यातील सौंदर्यशास्त्र असो वा कलेतील सौंदर्यशास्त्र"* हा बुध्द धम्माचा अविष्कार आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
बौध्द साहित्यातील *"प्रेम भाव"* संदर्भात *बोधिसत्त्व अश्वघोष* ह्यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या *"उर्वशी वियोग"* या नाटकाचा संदर्भ देता येईल. अश्वघोष लिखित *"बुध्दचरित्रम्"* हे महाकाव्य बुद्ध जीवनावर आधारित आहे. तर *"सौदरानंदम्"* हे महाकाव्य बुद्धाचा चुलत भाऊ *आनंद* ह्यांच्या बुद्ध धम्माच्या दीक्षित प्रसंगावर आधारित आहे. बोधिसत्व अश्वघोष ह्यांचा जन्म इ. पु. १५० चा आहे. अश्वघोष ह्यांच्या साहित्यात *"सौंदर्यशास्त्र / नीतिशास्त्र / दर्शन शास्त्र / मानवशास्त्र / नैतिक वाद"* ह्या उदात्त भावाची अनुभुती होते. तर *कालिदास* ह्यांनी "अभिज्ञान शाकुंतलम् / विक्रमोर्वशीयम् / कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदुतम् / ऋतुसंहारम्" समान एकुण ४० रचना लिहिल्याचे सांगितले जाते. परंतु *"कालिदास ह्यांचा जन्म कधी - कुठे झाला तसेच त्यांचा मृत्यु कुठे - कधी झाला ???"* हा इतिहास मात्र अनुत्तरित आहे. ह्याशिवाय कालिदास ह्यांच्यावर अश्वघोष ह्यांच्या साहित्याचा प्रभाव दिसुन येतो. तसेच कालिदास ह्यांचे सर्व लिखाण हे *"संस्कृत"* भाषेमध्ये असले तरी काही प्रमाणात *"अपभ्रंश भाषेचा प्रभाव"* हा दिसुन येतो. *"हिब्रू संस्कृत"* भाषा हिच्या नंतर इसवी सहाव्या सातव्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* ही उदयास आली. पुढे इसवी १२ व्या शतकामध्ये *"आदि हिंदी भाषा"* ही उदयाला आली. आणि *"सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदी हिंदी होय."* हे समजून घेणे गरजेचे आहे.
भारतातील लिपीला *"ब्राम्ही लिपी"* द्वारा उगम आधारे *क्षेत्रानुसार दोन भागांमध्ये* विभागता येईल. एक - *उत्तरी धारा* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी. दुसरी - *दक्षिणी धारा* - तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / पश्चिमी लिपी. ह्याशिवाय भारतातील *"खरोष्टी लिपी / चित्र लिपी / शंख लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी"*:ह्या प्राचीन लिपी प्रकाराचा उल्लेख करावा लागेल. *"देवनागरी लिपी"* ही इसवी ११०० मध्ये *"प्रथम प्रारूप"* स्वरुपात उदयास आली. आणि इसवी १७९६ ला देवनागरी लिपी ही व्यवहारात आली. *"उर्दु भाषा"* कालखंड हा इसवी १६४५ आहे. इसवी १८ व्या शतकात *"आधुनिक हिंदी भाषा"* ही उदयास आली. *मराठी भाषा"* हिचा पहिला शिलालेख इसवी ७०५ सालचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे सापडला आहे. दुसरा शिलालेख हा इसवीज १०१२ सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी आढळला. तिसरा शिलालेख इसवी १०१८ सालचा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडला. चवथा शिलालेख इसवी १०३९ सालचा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडलेला आहे. मराठी भाषातज्ज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी मराठीचे मुळ हे *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी सदर विधानाची पुष्टी केली आहे. *दुर्गा भागवत* ह्यांनी राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा जुनी भाषा मानलेली आहे. परंतु सदर संस्कृत ही *"क्लासिकल संस्कृत भाषा"* होय, हे समजणे गरजेचे आहे. तर *प्रा. हरी नरके* ह्यांनी *"मराठी भाषा ही इसवी पुर्वीपासून अहिर माहाराष्ट्री - प्राचीन म-हाटी भाषेपासून शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासुन मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती झाली"* असा जावई शोध लावला. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी/ व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट प्रकार झालेले आहेत. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी *"२००० वर्षांचा इतिहास"* आवश्यक असल्यामुळे *"सातवाहन बौध्द काळातील नाणेघाट शिलालेख"* हा संदर्भ घ्यावा लागलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अशी कसरत करावी लागली, हे समजून घेणे गरजेचे आहे.
महायान बौध्द संप्रदायातुन *"वज्रयान संप्रदाय"* चा उदय झाला. वज्रयान संप्रदायातुन *"तंत्रयान संप्रदाय"* उदयास आला. वज्रयान - तंत्रयान संप्रदायाने *"शैव पंथ/ वैष्णव पंथ/ साक्त पंथ"* ह्यांना जन्माला घातले. इसवी ८५० साली *शंकर* नावाचा व्यक्ति जन्माला येतो. त्याला *"प्रच्छन्न बौध्द "* ही म्हटले जाते. पुढे तो *नवव्या - दहाव्या* शतकात *आदि शंकराचार्य* बनुन चार पीठाचे गठण करतो. उत्तर - ज्योतिर्मय पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) / दक्षिण - ऋंगेरी पीठ, रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) / पुर्व -: गोवर्धन पीठ पुरी ओरिसा (ऋग्वेद) / पश्चिम शारदा पीठ द्वारका गुजरात (सामवेद). इतकेच नाही तर महायान बौध्द संप्रदायाच्या बौध्द मठावर आपले अधिपत्य करतो. *"कागदाचा शोध दहाव्या शतकात चीनमध्ये लागलेला आहे."* अर्थात *"वेद / उपनिषद / रामायण/ महाभारत"* ह्या ग्रंथाची उत्पत्ती ही *"दहाव्या शतकानंतर"* झालेली आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण सदर *"ब्राह्मणी ग्रंथाचे प्राचिन शिलालेख"* प्रमाण उपलब्ध नाहीत. *"ऋग्वेद"* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत *"युनोस्को"* ला इसवी १४६२ साली पाठविण्यात आली. अर्थात *"वैदिक धर्म / ब्राह्मणी धर्म"* हा इसवी नवव्या - दहाव्या शतकातील आहे, हा पुरावा म्हणायला हवा. प्रश्न हा की, मग *"ब्राह्मण वर्ग हा हिंदू धर्मीय कसा झाला ?"* कारण हिंदु धर्म हा *"मुस्लिम / इंग्रज शासन काळात"* उदयास आला, हा इतिहास आहे.
प्राचिन बौद्ध साहित्यापासुन भारतातील समस्त भाषीक साहित्याचा उगम हा झालेला आहे. त्याचा वरील संदर्भ हा पुरावा म्हणायला हवा. *"मराठी भाषा साहित्यावर असणारी ब्राह्मणी मक्तेदारी ही अन्य साहित्य वर्गातील साहित्यिक समाजाची दमन नीति सांगणारी दिसून येते."* प्रश्न हा की, अन्य साहित्यिक वर्गाने ही ब्राह्मणी साहित्य दमनगिरी कुठपर्यंत ती सहन करावी ? की *"कांग्रेसी गवताप्रमाणे"* अन्य साहित्यिक वर्गाने केवल लिखाण करावे आणि ब्राम्हणी साहित्यिक ह्यांच्या ओंजळीने *"गुलामीचे पाणी हे प्राशन"* करावे वा ब्राम्हणी एकाधिकारशाही वर्गाच्या *"बेडवरची शोषित वेश्या"* बनुन जावे, हा राहाणार काय ? हा प्रश्न आहे. आणि साहित्य लिखाणात *"केवल क्रांतीची भाषा"* लिहावी. कृतीशीलता मात्र *"आकाशातील ता-याप्रमाणे दुरवर"* आहे. मराठी भाषा साहित्यातील *"आद्य अग्रणी कवि"* हे शिंपी जातीचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते २/१२/१२९६) / नामदेव महाराज परिवारातील आणि वयाने वरिष्ठ *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०) / महार जातीचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ह्यांच्या लिखाणाला आम्ही न्याय देणार आहोत वा नाही ? की केवळ भिक्षेकरी ब्राह्मणी साहित्यिक वर्गाच्या दरवाजावरील कुत्रे बनुन *मुकुंदराज* (१२ वे शतक) / *संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांना *"आद्य अग्रणी कवि"* म्हणुन स्वीकार करणार आहोत ? ह्याशिवाय सोनार जातीचे *संत नरहरी सोनार* / चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* / वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५०) ही सर्व संत मंडळी पंढरपूरच्या *"विठोबा / बुद्ध"* ह्यांना पुर्णतः शरण गेलेली असल्यामुळे त्यांचा साहित्यातील खरा इतिहास रचला गेला नाही. आम्हाला हा इतिहास नव्याने लिहावा / रचावा लागणार आहे. ब्राम्हण धर्माचे *संत रामदास स्वामी* (१६०६ ते १६८२) ह्यांनी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची कास धरल्यामुळे त्यांचा उदोउदो करण्यात आला. तर संत रामदास स्वामी ह्यांचे दुरचे नातलग आणि वरिष्ठ असलेले *एकनाथ महाराज* मात्र वंचित राहातात. महान *छत्रपती शिवाजी महाराज* हे जगतगुरु *संत तुकाराम महाराज* ह्यांना गुरु मानले असतांना, ब्राह्मणी व्यवस्थेने *संत रामदास स्वामी* ह्यांना गुरु (?) दाखवून खोटा इतिहास लिहिला आहे. आम्हाला हा खोटा इतिहासही मिटवायचा आहे. *ब्राम्हणी व्यवस्थेच्या साहित्यिकांचे साहित्य विश्वातील सौंदर्यशास्त्र कोणते ?* मग *"नैतिक वाद"* हा विषय खुप दुरवरच्या आहे. अर्थात ब्राह्मणी साहित्यिक (?) ही केवळ *"भोगवादाचे प्रतिक"* आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.
जय भीम !!!
----------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक १९ फेब्रुवारी २०२५
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
No comments:
Post a Comment