Tuesday 24 May 2022

 ✍️ *समरसता साहित्य परिषद बनाम समता साहित्य परिषद : एक चिंतनशील आणि संशोधनशील मराठी प्रश्न ???*

   *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

   मो.न. ९३७०९८४१३८

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल


         अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष *डॉ. अक्षयकुमार काळे* ह्यांची येत्या दिनांक ०२ / ०३ जुलै २०२२ रोजी नागपुरात होणा-या *"१९व्या समरसता साहित्य परिषदेच्या"* अध्यक्ष ह्या पदावर निवड झाल्याची एक बातमी मिडियाकडुन वाचायला मिळाली. सदर परिषदे संदर्भात काय बोलावे / लिहावे, हा जटिल प्रश्न नजरेसमोर आला. *"समता / समरसता"* ही दोन शब्द एक समानार्थी आहेत ? सम-समान आहेत ? परस्पर पुरक आहेत ? परस्पर विरोधी आहेत ? व्यवहार सामजस्य आहेत ? किंवा सदर दोन शब्दाचे प्रत्यक्ष नाते काय ? अशी ती प्रश्न आहेत.‌ मग इंग्रजी शब्दकोषात दोन्ही शब्दाचे अर्थ शोधायला लागलो. डोके अक्षरश: गरगर फिरायला लागले.‌ चला, सदर इंग्रजी अर्थ प्रत्यनां ! तुमच्या समोरचं ठेवतो. *"समता = Equality"* हा अर्थ विवादाचा नाही.‌ तो अर्थ हा सर्व मान्य आहे. मग समरसता ह्या शब्दाचा सर्वमान्य अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. प्राचिन काळाचाही शोध घेतला. परंतु मनाला पटेल असा योग्यता अर्थ सापडे नां ! इंग्रजीमध्ये *"समरसता = Harmony / Equable / Equanimity / Equate / Equipoise"* ह्या शब्दापैकी कोणता‌ शब्द उचित असेल ? हा विचार मनात आला.

     *"भारताचे संविधान"* ह्या कायदेशीर दस्तावेजातही शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुनश्च प्रश्न उभे होते.‌ *"समता = Equality"* हा सर्वमान्य / यथायोग्य शब्द अस्तित्वात असतांना *"समरसता"* ह्या *"भ्रामक शब्द"* निर्मितीची गरज कां भासली ? हा इतिहास समजुन घेणे गरजेचे आहे. भारताचा वैदिक इतिहास / ब्राम्हणी इतिहास / पुढे आलेला हिंदु इतिहास हा कधीच समतावादी नव्हता. आणि ह्या भारतीय इतिहासानी *"समता"* ही पुढे नाकारलेली आहे. *"बुध्दाचा काळ आणि बुध्द प्रभावाचा काळ"* हा पुर्णत: समाताधिष्टीत असल्याचे प्राचिन इतिहास सांगतो. तेव्हा "समता" हा उदात्त भाव नाकारायचा असल्यामुळे *"समरसता"* ह्या भ्रामक शब्दाची गरज *"मरु व्यवस्थेला"* पडल्याचे जाणवायला लागते. आणि ही दोषवादी *"मरु व्यवस्था"* ही *"राजाश्रय वादी"* असल्याने, तो शब्द जनमनात रूढ करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसुन येते.

    *"अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद / जागतिक मराठी साहित्य परिषद"* ह्या परिषदेतील *"जागतिक / अखिल भारतीय"* ह्या शब्द नामवलीची मराठी / ब्राम्हणी साहित्यिकांना गरज कां पडली ? हा सुध्दा चिंतनाचा / संशोधनाचा एक विषय आहे. *"काय मराठी भाषा ही अखिल भारतीय / जागतिक स्तरावरील भाषा आहे ?"* हा पुनश्च महत्वाचा प्रश्न आहे. ही मराठी भाषा फक्त महाराष्ट्र सिमित आहे. आणि *"महाराष्ट्र राज्यातही ह्या मराठीला मरण आहे.‌"* मराठी शाळा बंद झालेल्या आहेत. मराठी साहित्यिकांची पिढी ही विदेशी शाळेत आहेत. आणि *"विदेशी भाषा अभ्यास"* हा उच्च / प्रतिष्ठा देणारी भावना त्यांनी जोपासलेली आहे. *"मराठी भाषा जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ह्या मराठी गरिब माणसानी.‌ ह्या ग्रामिण माणसानी...!"* काय ही मराठी / ब्राम्हणी साहित्यिक त्या समस्त गरिब / ग्रामिण वर्गाचे प्रतिनिधि आहेत काय ? असा प्रश्नांचा कल्लोळ उभा आहे. तेव्हा मराठी / ब्राम्हणी साहित्यिकांना ह्या *"वेगवेगळ्या साहित्य नावाची नामावली"* शोधण्याचे खरे इंगित समजणे हे गरजेचे आहे.

   *"बुध्द साहित्य / आंबेडकरी साहित्य"* ह्या साहित्याचा व्याप अखिल भारतीय आहे. जागतिक आहे. कारण तो जगमान्य प्रखर विचार आहे. *"म्हणुन सदर साहित्य भाषा ह्या सिमेत बंदिस्त नाही."* मराठी साहित्य हा विचार नाही. ती भाषा आहे. तेव्हा बुद्ध साहित्य / आंबेडकर साहित्य ह्या जगमान्य साहित्यावर कुरघोडी करण्याचा हा *"मराठी वाद्यांचा तो फसवा प्रयत्न"* आहे. आणि हे समजुन घेणे गरजेचे आहे. मराठी साहित्य / ब्राम्हणी साहित्याला *"राजाश्रय"* असल्याने मराठी साहित्यिकाची *"सत्तेवर मक्तेदारी"* असल्याने, *"मराठी सरकारच्या दयेवर"* ह्या साहित्यिकांची मौजमस्ती सुरु आहे. तेव्हा ही *"सरकारी दया"* मराठी साहित्य वाढीच्या नावाने असलेला प्रकार बंद होणे, हे गरजेचे आहे.

     *"रामायण / महाभारत"* ह्या संदर्भात स्पष्ट बोलायचे झाल्यास त्या लिखाणाला साहित्याचा कोणत्या प्रकारात मोडायला हवे ? *"कालिदास"* हा आद्य साहित्यिक आहे काय ? कालिदासाच्या साहित्यातील नैतिकवाद / सौंदर्यशास्त्र / भोगवाद ह्याचे आकलन आम्ही कसे करणार आहोत. मग आद्य साहित्यिक / संगितकार / नाटककार *भदंत अश्वघोष* ह्यांच्या तमाम साहित्य अविष्काराचे मुल्यमापन करतांना, त्याला न्याय दिला गेेला काय ? नैतिकवाद / नीतिवाद / सौंदर्यशास्त्र / मानवतावाद / भौतिकवाद / करुणावाद / मित्रवाद / बंधुवाद / समतावाद / स्वातंत्रवाद / प्रज्ञावाद / शीलवाद / न्यायवाद इत्यादी सर्व भावात कालिदास साहित्य असो की मराठी साहित्य असो, कुठे बसत आहे ? ह्याचे संशोधन / चिंतनशील अभ्यास होणे, हे गरजेचे आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांच्या कालखंडात कोरले गेलेले शिलालेख ह्या संदर्भात ही साहित्य संशोधन होणे, हे गरजेचे आहे.

     मराठी भोगवाद नामांकित साहित्यिक *डॉ. अक्षयकुमार काळे / डॉ. श्रीपाल सबनीस* पासुन ईहवादी साहित्यिक *डॉ. यंशवंत मनोहर* असो वा, गांधी विचार पुरस्कृत *"प्रा. रावसाहेब कसबे* असो वा, दलित साहित्यिक *"शरणकुमार लिंबाळे* असो वा बिनबाप वादी विचार साहित्यिक *लोकनाथ यशवंत* असो‌, ह्या तमाम साहित्यिक वर्गाने  (?) *"बुद्ध / आंबेडकरी साहित्याला"* न्याय दिला आहे काय ? मराठी साहित्याची सम्यक समिक्षा केली आहे काय ? हा माझा खुला प्रश्न आहे. आम्ही ह्या तमाम साहित्यिकांना फार मोठे केले.‌ समाजाने आपल्या डोक्यावर घेतले. जर आऊटपुट नसेल तर, काय करावे ? हा महत्वाचा प्रश्न पुन्हा सामोरा आहे. तुमच्या सम्यक विचाराकरिता...! कारण ह्या देशात आंगलावे / भोगलावे प्रवृती / विकृतीच्या पिकांचा उपदव्याप सुरु आहे.


* * * * * * * * * * * * * * * *

(नागपूर, दिनांक २५ मे २०२२)

No comments:

Post a Comment