Thursday 19 May 2022

 🌹 *मी पुष्प वेचितो हे मनाचे...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर

        मो. न. ९३७०९८४१३८


प्रात: काले मी पुष्प वेचितो हे मनाचे

मोगरा गुलाब संगे बुध्दा शरण झाला...


आगीच्या राखेतील हुंकार हे वेदनांचे

शोषण भोगतांना तो पार तुटुनी आला

हे‌ सांत्वन नको रे ह्या मगरी आसवांचे

रोजचा सुर्य ना कधी तो पश्चिमेस आला...


विश्वास कधी हा धोका असेल विश्वाचे

जवळीक आपला गळा छाटत आला

दु:खमय ओझे हे झेलतांना आसवांचे

फक्त बुध्दाचा सागर सोबतीला आला...


अरे जग हे सारे आहे स्व: मतलबाचे

कल्याण मित्र कुणा म्हणावे प्रश्नच आला

ह्या निसर्गा संगे प्रेम हे फुलपाखरांचे

रमतांना सोबत हा दिवस मजेचा झाला...


* * * * * * * * * * * * * * * *

(नागपूर, दिनांक १९ मे २०२२)

No comments:

Post a Comment