Tuesday 22 March 2022

 .🌎 *जागतिक (?) आंबेडकरी साहित्य महामंडळाचा नागपुरात होणारा खडा जंगी तमाशा २७ मार्च रोजी..!* (भाग - २)

* प्रा. दिपक खोब्रागडे / सुजित मुरमाडे असणार खड्या तमाशाचे जंगी महा-नाचे ! नागपुरच्या दीक्षाभूमीचे नवे व्यापारीकरण ?

   *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*, नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


      *"जागतिक (?) आंबेडकरवादी (?) साहित्य (?) महामंडळ (?)"* ह्या संस्थेची मिडियातील बातमी वाचुन, मी दिनांक १९ मार्च २०२२ रोजी एक लेख लिहिला. सदर माझ्या लेखावर ब-याच मंडळींच्या चांगल्या प्रतिक्रिया ही आलेल्या आहेत. काहींनी तर सदर कार्यक्रम हा *"उ-धळुन"* टाकायलाचं हवा ? अशी क्रोधभाव असणारी प्रतिक्रिया ही दिली. *"दीक्षाभूमी स्मारक समितीने"* सदर कार्यक्रमाला, व्यावसायिक भावनेतुन अनुमती दिली आहे.‌ आणि जागतिक (?) साहित्य महामंडळाने (?) *"जंगी खडा तमाशा"* करण्याचे खुले प्रयोजन केले आहे, तर आपण काय करणारं ? हा प्रश्न मला ही पडला.‌ कारण *"मियां - बिबी राजी तो, क्या करेगा काजी..!"*  इथे मियां कोण ? बिबी कोण ? हा आता अंतर्गत मुद्दा झाला आहे. पण काही गोष्टींचे उकल अजुन ही होणे, हे फार गरजेचे आहे.

     उपरोक्त घटनेने मला *परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर* ह्यांच्या संविधान सभेतील भाषणाची फार आठवण झाली. ‌बाबासाहेबांचे ते शब्द आहेत, *"संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर, ते संविधान वाईट ठरल्याशिवाय राहाणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर, ते संविधान चांगले ठरल्याशिवाय राहाणार नाही."* (संविधान सभा दिल्ली, २५ नोव्हेंबर १९४९) दीक्षाभूमी स्मारक समितीचा विषय हा संविधानासोबत जरी तो निगडीत नसला तरी, *"अमलबजावणी / उद्देश / कर्त्तव्य / बांधिलकी /आंबेडकरी मिशन / निष्ठा"* ह्याच्याशी निगडीत तो नक्कीच आहे. कारण दीक्षाभूमी ही अजुनही आंतरराष्ट्रिय स्तरावर *"प. पु.‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या आचार - विचाराचे प्रसार - प्रचाराचे केंद्र झालेले नाही."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा विचाराचे *"आंतरराष्ट्रिय संशोधन केंद्र"* झालेले नाही. आणि ते ख-या अर्थाने *"व्हिजनरी केंद्र"* झालेले नाही. ठिक आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे नाव *"एकेडमी क्षेत्रामध्ये"* आज अग्रेसर असेल ही, पण ते चिरंतर टिकुन राहाणारचं, ह्याची आपण शाश्वती देवु शकत नाही. हा *"महाविद्यालय स्पर्धात्मक"* असा तो विषय आहे. आणि माझा विषय हा *"मिशनशी संबधित"* / निगडीत नाही.‌ कारण आम्ही दीक्षाभूमी येथुन कुणी साधा *"मिशनरी"* आजपावेतो निर्माण करु शकलो नाही. जसे *"राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने"* (RSS) महाल - रेशीमबाग नागपूर मधुन असंख्य प्रमाणात *"मिशनरी"* घडविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवलेले आहे. आणि त्याकरीता *"कुशल प्रशासक / व्हिजनरी प्रशासक / समर्पित प्रशासक / प्रामाणिक प्रशासक"* असे गुण असणारा, व्यक्ती हा स्मारक समितीमध्ये असायला हवा...! *"आसाराम / गयाराम / मसाराम / आंगलावे / भोगलावे"* अश्या हिन मानसिकतेची जोपासणा होणार असेल तर, त्याबद्दल न बोललेले बरे ...!

     दुसरा महत्वाचा विषय म्हणजे *"ट्रस्टी"* भावना. *"ट्रस्टी"* या शब्दाचा मराठीत अर्थ होतो - *"विश्वस्त."* अर्थात *"विश्वास योग्य व्यक्ती."* आता दीक्षाभूमी स्मारक समिती ने स्वता:चे मुल्यमापन करायले हवे ? कारण दीक्षाभूमी ही कुणाही सदस्यांच्या वडिलांची वडिलोपार्जीत संपत्ती नाही.*"ती समाजाची खरी संपत्ती आहे."* आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रेरणेतुन ती आपल्याला पुर्णत: अर्जीत झालेली आहे. ह्यात आपल्या समाजाचा ही खरा पैसा लागलेला आहे.‌..! *"दीक्षाभूमी समितीमधील किती माजी सदस्यांना, आंबेडकरी समाजाने आपले खरे विश्वस्त मानलेले आहे ?"* हा सुध्दा प्रश्न आहे. आणि किती सदस्यांचे मरण हे फार *"सुखकारक"* राहिलेले आहे ? कारण बुध्दाने *"कुशल कर्माची फलश्रृती"* ही जन - मनाला सांगितलेली आहे. आणि ही गुण भावना कुणीही व्यक्तीने विसरता कामा नये.‌ बुध्दानी *"नाम - रुप"* ह्या जोडीच्या संयोगाने *"जीवन"* आणि त्याच्या वियोगाने *"मृत्यु"* असे म्हटलेले आहे. हा बुध्द भाव आपणास खुप काही सांगुन जातो...!

    आता *"जागतिक (?) आंबेडकरवादी (?) साहित्य (?) महामंडळ (?)"*  ह्या नावे *दिपक खोब्रागडे / सुजित मुरमाडे* ह्यांच्या एकछत्री चाललेल्या खाजगी व्यापारीकरण ह्या विषयावर बोलु या ! असाचं *"धार्मिक भाव"* जोपासुन सिने नाचा - *गगन मलिक* आणि महाठग - *नितिन गजभिये* ह्यांच्या तर्फे बुध्द मुर्तीचे अनैतिक व्यापारीकरण सुरु आहे. महाठग नितिन गजभिये ह्यांनी जरी *"हजारोच्या संख्येने अवैध प्लॉट पाडुन, ते लोकांना विकुन करोडोची फसवणुक केली,"* हा आमचा मुद्दा नाही. त्या विरोधात *"पिडित लोकांचा आवाज"* असायला हवा आहे. आमचा मुख्य मुद्दा हा आहे, महाठग - नितिन गजभिये / सिने नाचा - गगन मलिक ह्यांनी *"शासनाकडुन जे दोन करोड रुपये"* घेवुन जी फसवणुक केली, तो आहे.‌ त्याचे मुख्य कारण असे की, *"शासनाचा पैसा हा जनतेच्या श्रमाचा पैसा आहे."* कारण आपण शासनाला दर वर्षी कर देत असतो.‌ तेव्हा सदर पैशाचा वापर हा योग्य व्हायला हवा. आणि दुसरा मुद्या हा त्या जोडीकडुन *"बुध्द मुर्तीच्या व्यापारीकरणाचा"* ही प्रश्न‌ आहे. *"कारण ह्या जोडींच्या अशा अवैध कामामुळे विदेशात भारतीय बौध्दांची पत खालावली जात आहे."* माझी खरी चिंता ती आहे. आम्हाला विदेशात *"धम्म"* कामाकरीता जावे लागते. तेव्हा आम्हाला ह्यांच्या नालायक कृत्यामुळे आमची मान झुकवावी लागते. *ही मंडळी फार बेशरम आहेत.* आणि प्रा. दिपक खोब्रागडे असो की सुजित मुरमाडे असो, ह्यांची जोडगोळी *"जागतिक साहित्य परिषद / पुरस्कार"* अशा शब्दांच्या नावाने व्यापारीकरण तसेच फसवीकरण करीत आहेत. ह्या अनैतिक कामात समाजाने पायबंद‌ आणला नाही तर, समाज ही अशा *"अनैतिक कामामध्ये दोषी"* हा ठरणार आहे. आणि ह्या अनैतिक जोडींची *"अनैतिकता,"* ही उत्तरोत्तर वाढत जाणार आहेत..!

      आता  *"प्रा. दिपक खोब्रागडे / सुजित मुरमाडे"* ह्या जोडीच्या व्यापारीकरण विषय ह्यावर चर्चा करु या. सुजित मुरमाडे ह्याची एक बहिण प्रा. दिपक खोब्रागडे ह्यांची पत्नी आहे. तर दुसरी बहिण ही अमेरिका निवासी *स्मृतिशेष राजु कांबळे* ह्यांचा एक सहपाठी त्याची पत्नी आहे. राजु कांबळे ह्यांनी धम्म मिशन हे चालविले होते. आणि आज ते ह्या जगात नाहीत.‌ तेव्हा सुजित मुरमाडे आणि त्याच्या दोन्ही जीजाजी वर्गाने *"जागतिक आंबेडकरी साहित्य चळवळ"* ह्या नावाने फसवा व्यवसाय हा सुरू केला. *प्रा दिपक खोब्रागडे* हे फार मोठे वा नामांकित असे *"आंबेडकरी साहित्यिक आहेत काय ?"*  पण जागतिक साहित्य महामंडळाचे ते स्वयं घोषित अध्यक्ष....? आता त्यांचा व्यवसाय बघु या. जर *"पन्नास लोकांना पुरस्कार / परिषदेत सहभाग"* घ्यावयाचा असल्यास, सहभागी लोकांना रु. १०००/- राशी भरून नोंदणी करणे गरजेचे आहे. *(कुल जमा राशी - ५०,०००)* आणि सोबत प्रकाशीत पुस्तकाच्या *"दोन प्रती."* जर लेखकाच्या एका पुस्तकाची अंदाजे किंमत ही रु. ५००/-  असल्यास दोन प्रती पुस्तकाची किंमत रु. १०००/- असणार आहे. अर्थात सदर त्या *दोन ही पुस्तकाचे* पुढे ती मंडळी काय करणार आहेत, हे सांगायला नको. तेव्हा सहभाग घेणा-या अंदाजे सदर *"पन्नास लेखकांकडुन रु. ५०,०००/-"* ही राशी जमा होणार आहे.‌ *(एकंदरीत कुल राशी जमा रु. १ लाख)* आणि *पुरस्कार* स्वरुप देण्यात येणा-या *"मेमेंटो हा अंदाजे रु. ५००/-"* असणार आहे.‌ अर्थात लेखकानी अंदाजे दिले रू. २०००/- आणि सोबत सदर कार्यक्रम घेण्याकरीता *"देणगी स्वरुपात मिळणारी राशी"* ही अलग असणार आहे. जर विदेशात *"जागतिक साहित्य परिषद"* होत असल्यास *"सोने पे सुहागा"* म्हणायला हवे...!  जसे - पासपोर्ट / व्हिसा / ट्रव्हलिंग खर्च / लॉजिंग / बोर्डिंग / इत्यादी. आमचा विरोध हा त्यांच्या व्यापारीकरण विषयाशी कधीच राहिलेला नाही.‌ त्यांनी प्रकाशन व्यवसाय खुशाल करावा. आमचा असली विरोध हा *"आंबेडकरी साहित्य"* नावाने चालविल्या जाणा-या अनैतिक स्वरुपाचा व्यापारीकरण हा आहे. *सिने नाचा - गगन मलिक / महाठग - नितिन गजभिये* ह्या महाशयांनी सुध्दा ह्याच श्रेणीतील अनैतिक व्यापारीकरण चालविले आहे.‌ आणि अशा अनैतिक कामात *"सहकार्य करणा-या अन्य सहभागी नाचे मंडळींच्या"* बुध्दीची कीव‌ ही येते.‌ तेव्हा समस्त मित्रांनो, आपण आमचा *"विरोध भाव"* हा समजुन घ्यावा, एवढेच आमचे म्हणने आहे. बाकी तुमची मर्जी आहे...! जय भीम...!!!


* * * * * * * * * * * * * * * * * *

(नागपूर, दिनांक २२ मार्च २०२२)

No comments:

Post a Comment