Sunday 22 August 2021

 ‌✍️ *चळवळीने (???) दलित तरुणांना वेगळी स्वप्न दाखवावीत : शरणकुमार लिंबाळे 'दलित'...!* प्रश्न आहे आपण स्वप्ने बघावीत की कृतीशीलतेत रहावे....?

  *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

  राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

    मो. ९३७०९८४१३८/९२२५२२६९२२


     मुंबई शहरातील दलित साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे *'दलित'* ह्यांनी १९ ऑगष्ट २०२१ रोजी *"बिर्ला फाऊंडेशन "* द्वारा दिला जाणारा *" सरस्वती पुरस्कार २०२१"* प्राप्त झाल्याबद्दल, ब्राम्हण वर्चस्व असलेल्या *"विदर्भ साहित्य संघ"* ह्यांच्या वतीने नागपुरात सत्कार करण्यात आला. आणि शरणकुमार लिंबाळे *'दलित'* ह्यांनी "सरस्वती" ह्या काल्पनिक हिंदु देवीच्या नावे पुरस्कार स्विकारल्यामुळे समस्त आंबेडकरी चळवळीकारांनी, लिंबाळेनी सदर पुरस्कार स्विकारु नये, ह्या संदर्भात विरोध सुरु केला. परंतु लिंबाळेनी आबेंडकरी लोकांचा विरोध नाकारुन, सदर पुरस्कार स्विकारला. आणि त्याप्रसंगी शरणकुमार लिंबाळे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, *"चळवळीने दलित तरूणांना फक्त मोर्चेकरी बनविले. रिपब्लीकन ऐक्य, विद्यापीठ नामांतर अशा भावनिक प्रश्नावर त्यांना लढविले गेले. त्यावेळी ते आवश्यकही होते. पण आता चळवळीने दलित तरुणांना नविन स्वप्ने दाखवावीत. "* अशी अपेक्षा व्यक्त केली.

     दया पवार ह्यांनी लिहिलेल्या *"बलुत"* असो वा, डॉ. शरणकुमार लिंबाळे ह्यांनी लिहिलेल्या *"अक्करमाशी"* ह्या आत्मचरित्र लिखाणाने, आंबेडकरी समाजाने त्यांना आपल्या डोक्यावर बसवले होते. आणि सदर आत्मचरित्रे आंबेडकरी समाज मोठ्या आवडीने वाचतही असे. तसे बघितले तर, *"आत्मचरित्रे लिहिणारी लेखक मंडळींचे लिखाण वास्तव हे आपण पुर्णपणे सत्य मानावे किंवा नाही, हा तर संशोधनाचा विषय आहे."* दु:ख, शोषण, वेदना, संघर्ष हा जरी शोषित/ पिडित/ त्रासित समाजाचा प्रत्यक्ष अनुभव असला तरी, त्या लिखाणात अतिशयोक्ती भाव नसेलचं, हे तरी आपण कोणत्या आधारे मानावे....? शरणकुमार लिंबाळे ह्यांनी त्याप्रसंगी *"दलित साहित्य / आंबेडकरी साहित्य"* हा विवाद निरर्थक  बोलणे...! ह्याला काय म्हणावे? पुढे लिंबाळे म्हणतात *"दलित म्हणजे गुलामीविरुध्द बंड करणारा...! मात्र तोच शब्द बाद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दलित लेखक फक्त जातीव्यवस्थेचाच विचार करतो. तो जागतिकीकरण, काश्मिर, तालिबानकडे लक्ष देत नाही. आम्ही परिघात अडकलो आहोत. पण दलितांचे प्रश्न हे संपुर्ण भारतीयांचे प्रश्न आहेत. माणसाकडे माणुस म्हणुन पाहाण्याची गरज असतांना फक्त जात मिरविणे, बंद व्हायला हवे."* अशी मोठी शेखी मारण्यास *शरणकुमार लिंबाळे 'दलित' महाराज* विसरले नाहीत...!!! शरणकुमार लिंबाळेचे असे हे *"दलित लिखाण / विचार"* बघुन, मी त्यांच्या नावाच्या मागे त्यांना फार अशी शोभणारी *'दलित"* ही उपाधी दिलेली आहे.

       डॉ. शरणकुमार लिंबाळे *'दलित'* महारांजानी अजुन आपल्या अकलेचे तारे, नागपुरातील एका दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तोडले. त्याप्रसंगी लिंबाळे 'दलित' म्हणतात *"सरस्वती हे काल्पनिक प्रतिक आहे. सरस्वती नाकारणे म्हणजे तिचे अस्तित्व आपण मान्य करणे आहे. 'सरस्वती सन्मान पुरस्कार' स्विकारतांना मी सरस्वतीला स्विकारलेले नाही. तर राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार स्विकारत आहे. यात पुरस्काराचे नाव हे महत्वाचे नाही......! "* शरणकुमार लिंबाळें ह्यांचे हे दलित विचार वाचल्यावर, *"सनातन"* ह्या लिंबाळे 'दलित' लिखित कांदबरीची डाक्टरी चिकित्सा करणे, हे गरजेचे झाले आहे. तसे लिंबाळे 'दलित' महाराज हे बरेच काही असे बोलुन गेले. अकल सांगुन गेले. आणि आता लिंबाळे 'दलित' महाराजांच्या लिखाण वा विचारांची चिरफाड करु या...!!!

      शरणकुमार लिंबाळे 'दलित' महाराज ह्यांच्या लिखाणाची / विचाराची चिरफाड ही *"चळवळीने तरुणांना फक्त मोर्चेकरी बनविले..... आता चळवळीने दलित तरुणांना नविन स्वप्ने दाखवावीत....!"* ह्यापासुन करु या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपले अधिकार कसे घ्यायला हवे ? हे सांगितले आहे. *त्याकरिता आपण काय करायला हवे, लिंबाळे 'दलित' महाराज?*  आणि दलित तरुणांना स्वप्ने दाखवावीत, हे ही आपण बोलुन गेलेत. *अहो लिंबाळे 'दलित' महाराज, आम्ही स्वप्नाच्या जगात अजुन किती वर्षे जगायचे हो...?* आता आम्हाला स्वप्नाच्या जगात राहायचे नाही, तर कृतीशील जगात काम करायचे आहे. आणि ती उडाण आम्ही कधीचीच घेतलेली आहे. *"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत ज्या शोषित / पिडित वर्गांनी, १४ आक्टोंबर १९५६ रोजी बुध्दाचा हात धरलेला होता, त्या शोषित समाजाने ह्या ७४ वर्षाच्या अल्पश्या काळामध्ये शोषक वर्गासमक्ष केलेली वैचारिक प्रगती ही जगाचा एक क्रांती इतिहास झालेला आहे."* आणि शरणकुमार, अजुन तुम्ही दलित राहिलात...! बौध्द धम्माची दीक्षा घेतलेली नाही. त्याला आम्ही तरी काय करणार...? तुमचे वैचारिक अधिष्ठान ही *"दलित"* अर्थात *"दलींदर...!"*

     आता *"दलित म्हणजे गुलामीविरुध्द बंड करणारा ! तोच शब्द बाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...... जातीव्यवस्था / जागतिकीकरण / काश्मिर / तालिबान / आंतरराष्ट्रिय प्रश्न / जात मिरविणे बंद करायला हवे...!"* ह्या विषयासंदर्भात मी माझे लिखाण नेहमीच मिडियावर मांडत आलो आहे. आपण सदर लिखाण वाचलेले दिसत नाही, हा आपला दोष आहे. आणि *"अन्यायाविरोधात पहिला लढा देणारे बुध्द हे जगातील पहिले महामानव होते!"* त्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक झालेत, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले झालेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर झालेत...! आणि तुम्ही काय दलित साहित्याचा / चळवळीचा बुजगावणे घेवुन बसलात..! *"बौध्द साहित्य हे जगातील अर्वाचिन साहित्य आहे...!"* भदंत अश्वघोष हे बौध्द  साहित्याचे आदि लेखक. ह्या तुमच्या अज्ञानाला आम्ही काय म्हणावे...??? *"बौध्द साहित्य असो वा अलिकडचे आंबेडकरी साहित्य असो, ह्या साहित्यामध्ये विद्रोह आहे, नकार आहे, हुंकार आहे, नैतिकवाद आहे, मानवता आहे, सामाजिक भाव आहे, निसर्ग आहे, आणि सौंदर्यशास्त्र ही आहे...!"* आता शरणकुमार लिंबाळे 'दलित' महाराज, तुम्ही त्या मराठी भाषा धार्जिण्या साहित्यिकांना कालीदासाच्या लिखाणावर प्रश्न करणार आहात काय...? किंवा मराठी भोगवादी साहित्य लिखाणाचे काय...??? ह्या विषयांवरही आपले थोडे तोंड खोला. नाही तर कुत्रेपणाची तुमची ही वटवट बंद करा...!!!

     लिंबाळें *'दलित'* महाराज, आता आपण मुलाखतीचे शब्द *"'सरस्वती हे काल्पनिक प्रतिक आहे...... यात पुरस्काराचे नाव हे महत्वाचे नाही.!* ह्या विषयावर बोलु या...! सरस्वतीचे नाव असलेला पुरस्कार हा आता तुमच्या *"ड्राईंग रुमच्या कपाटात"* असणार आहे. अर्थात सरस्वतीच्या नावाचे दर्शन हे तुम्हाला रोज होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपण त्रासित समाजाला मानसिक मुक्तीच्या ह्या *"बाविस प्रतिज्ञा"* दिलेल्या आहेत. त्यामधील सरस्वतीं ही एक हिंदु देवता आहे. आपल्याला गुलामीची झळ देणारी ती एक अवतारणी आहे. देववाद / धर्मांधवादाची ती आमच्याकरीता एक काळी चेटकिण आहे. वरुन तुम्ही बेशरमपणाने म्हणत आहात की, तुम्हाला *"पुरस्काराचे असणारे नाव हे  काही महत्वाचे नाही..!"* मग तुम्ही आम्ही दिलेला आणि त्यामध्ये तुमचा अर्धनग्न फोटो लावलेला, *"लिंबाळें 'दलित' नग्नराज आंतरराष्ट्रिय पुरस्कार "* असा हा पुरस्कार, आपण स्विकारणार आहात काय...? कारण तुम्हाला पुरस्काराचे नाव हे फार महत्वाचे वाटत नसुन, *"दिलेला पुरस्कार"* हा महत्वाचा वाटतो आहे. जर तुम्हाला पुरस्काराचा इतका मोठा हाव आहे तर, तुम्ही मला एकदा बोलायला हवे होते. मी तुम्हाला साहित्याचा *"राष्ट्रीय पुरस्कार"* दिलेला असता. आंतरराष्ट्रिय स्तरावर तुमचे नाव, मी अजुन मोठे केले असते. पण ही अनैतिकता / अगतिकता / आततायीपणा / हावरेपणा हा आपण पुर्णत: टाळायला हवा नां, शरणकुमार लिंबाळे *'दलित'* साहेब...?

    आता चर्चा *"जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ"* ह्या उथाळ बुजगावणे मंडळाबद्दलही करु या...! ह्या बुजगावणे मधिल एक पात्र हा *"आंबेडकरी नामांकित साहित्यिक वगैरे काही नसुन, तो केवळ एक पुस्तक प्रकाशक"* आहे. अमेरिका येथे असणारे आमचे मित्र स्मृतिशेष *राजु कांबळे* हे त्यांच्या एन.जी.ओ. द्वारे ते काही देशात *"आंतरराष्ट्रिय बौध्द परिषदेत"* घेत असत. आणि पुस्तक प्रकाशन करणारा तो पात्र हा, आमचे मित्र स्मृतिशेष राजु कांबळे ह्यांचे नागपुरमध्ये काम करणारा एक साधारण कार्यकर्ता. माझ्याकडेही तो कधी कधी येत असायचा. दोन - तिन वर्षापुर्वी राजु कांबळे हे नागपुरला आले होते. आमच्या त्या भेटीत आम्ही आंबेडकरी चळवळ आणि बौध्द परिषदे संदर्भात दोन तास बरीच चर्चा केली. कधी कधी फोनवर आमचे बोलणे होत असे. आमच्या त्या मित्राचे ह्या जगातुन अचानक निघुन जाणे, आणि स्मृतिशेष राजु कांबळे ह्यांच्या संघटनेच्या काही देशात कार्यरत पदाधिकारी वर्गांसोबत त्या पुस्तक प्रकाशक पात्राने सलगी वाढविली. आणि *"डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये"* त्याचे जवळचे रिस्तेदार असणा-या प्राध्यापकाला पकडुन, घरेलु *"जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ "* हे बुजगावणे उभे केले. "आयत्या बिळावर नागोबा" सारखा हा प्रकार होय. मग *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / गिरिश गांधी* ह्यां दोन लोकांना हाताशी धरुन, नागपुरात तेव्हा *"पहिली जागतिक आंबेडकरवादी साहित्य परिषद"* घेण्याचा कार्यक्रम घोषित केला. परंतु सदर परिषद आयोजनात घाणेरडी अशी राजनीति दुर्गंधी दिसल्यामुळे, मी त्या परिषदेचा तिव्र विरोध केला. तसेच अन्य आबेंडकरी साहित्यिक ‌वर्गांनीही त्या आयोजनाला तिव्र विरोध केल्यामुळें, सदर जागतिक परिषद ही त्यांना रद्द करावी लागली. आणि मग काय त्या प्राध्यापकाने चार पाच लोकांनां हाताशी धरुन *"जागतिक"* शब्दधारी बुजगावण्याची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला. महत्वाचे म्हणजे‌ सदर प्राध्यापक हा, खुप मोठा *"नामांकित आंबेडकरी साहित्यिक‌"* नाही. आणि डॉ. यशवंत मनोहर हे सुध्दा आबेंडकरी / बौध्द विचारधारेचे साहित्यिक नाहीत. *डाॅ. गिरीश गांधी हे सुध्दा आपले प्रतिनिधी नाहीत.* आता त्या तथाकथित जागतिक (?) कलदारांनी, डॉ. शरणकुमार लिंबाळे 'दलित' ह्यांचा नागपुरच्या पवित्र दिक्षाभुमीवर सत्कार / भेटीची मोठी बातमी टाकुन, त्यांनी *"आंबेडकरी समाजाचा चालविलेला द्रोह,"* हा आपल्याला मोडणे फार गरजेचे आहे. नाही तर, ही बुजगावणे समाजाची / चळवळीची / आंबेडकरी - बौध्द साहित्याची वाट लावण्याची शक्यता फार जास्त आहे.

      दलित असो वा दलितत्व हा शब्द *"हिन भावनेचे प्रतिक आहे."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ ला आम्हाला बुध्द दिला. *'बौध्द साहित्य हे जगातील सर्वात प्राचिन असे साहित्य आहे...!"* बौध्द साहित्यामध्ये विद्रोह, हुंकार, मानवतावाद, नीतिवाद, निसर्गवाद, समाजवाद आणि सौंदर्यशास्त्र सामावलेले आहे. *ते साहित्य आदर्श व्यक्ती, आदर्श‌ समाज आणि आदर्श राष्ट्र जडण - घडण करण्याचे माध्यम आहे.* स्वप्नाळुपणा ह्या साहित्यामध्ये नाही. बौध्द साहित्य हे कृतीशीलता जोपासणारी कडी आहे. प्रज्ञा सांगणारा नाद आहे. समता, न्याय, बंधुता ह्या त्रयीचा संगम आहे. आंबेडकरी साहित्य हे बुध्दाकडे घेवुन जाणारे वाहक आहे. तेव्हा डॉ. शरणकुमार लिंबाळे 'दलित' ह्यांनी आता तरी बौध्द साहित्याची कास धरावी, एवढेचं आवाहन आहे. सरस्वती सन्मान पुरस्कार ह्याचे विसर्जन करुन....!!!


* * * * * * * * * * * * * * * * * *




No comments:

Post a Comment