Saturday 14 March 2020

✍️ *आंबेडकरवादी (?) साहित्य संमेलनाच्या आयोजनात गोगावादी (गोळवलकर - गांधी) राजकिय नटांचा खडा जंगी तमाशा...???*
        * *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर
* राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो.न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

        *"जागतिक आंबेडकरवादी (?) साहित्य महामंडळ"* (सरकारी महामंडळ अजिबात नव्हे !) अशा ह्या खाजगी-मय जागतिक (?) स्तरावरील मंडळींच्या कंपुने *"द्वितिय अखिल भारतीय आंबेडकरवादी (?) साहित्य सम्मेलनाचे"* आयोजन नागपुरला दिनांक ११ - १२ एप्रिल २०२० ला केल्यामुळे आणि त्या कंपुची स्वत:च्या पायावर सदर साहित्य सम्मेलन घेण्याची आर्थिक दॄष्ट्या कुवत नसल्याने, त्यांनी *"विदर्भ गौरव प्रतिष्ठान"* नावाच्या कुणा तरी संघटनेला सोबतीला घेवुन *"आंबेडकरवादी (?) साहित्याची"* दुकानदारी जाहिर केली. त्या प्रतिष्ठानाचा सर्वेसर्वा कोण आहे...? हा पुन्हा प्रश्न आहे. सदर परिषदेचे स्वागताध्यक्ष पदावर - नागपूर किर्तीमान महामानव (?) *डॉ. गिरिश गांधी* (ज्यांनी "आंबेडकरी समाजातील आपली मुलगी त्यांच्या गांधी परिवारात सुन म्हणुन गेलेली असतांना, तिला *धेडी, तेरी औकात कैसे हुयी हमारे घर घुसने की...!* असे म्हणुन तिला सामानासह बाहेर हाकलले. आणि तिला उध्वस्त केले.) ह्यांची निवड केल्यामुळे *"तसेच आमच्या ह्या आंबेडकरी समाजात विद्वान मान्यवर मंडळी वा साहित्यिकाची फारचं वाणवा आहे, असा दाखविण्याचा प्रताप आयोजकांनी केल्यामुळे...!"* मी त्या विरोधात  *"आंबेडकरवादी (?) साहित्य संमेलनाच्या गांधी लोटांगणात आंबेडकरी विचारवाद्यांची अ-नैतिक अपात्रता....???"* हा लेख विभिन्न मिडिया वर पोस्ट केला. तसेच सदर आयोजक कंपुत असलेला निर्लज्जपणा / बेशरमपणा हा चव्हाट्यावर आणला. तरी सुध्दा सदर परिषदेचे स्वागताध्यक्ष - नीतिमान (?) *डॉ. गिरिश गांधी* नावाच्या महामानवाला (?) स्वागताध्यक्ष ह्या पदावरुन दुर न करता *प्रा. डॉ. भाऊ लोखंडे* ह्यांची निर्लज्जपणे सम्मेलनाचे अध्यक्ष म्हणुन नाव घोषित केले. *तसेही आमचे डॉ. भाऊ लोखंडे अशा पदाची आतुरतेने वाट बघत असतात...! मग त्यामध्ये नैतिकता असो वा नसो...???* असो, आता आपण ह्या आंबेडकरी साहित्य सम्मेलनाच्या दुस-या भागाकडे वळु यां !
     जागतिक महा(?)मंडळाच्या आयोजकांनी प्रायोजित केलेल्या *"आंबेडकरवादी साहित्य सम्मेलनाचे"* उटघाटक म्हणून आमचे मित्र महाराष्ट्राचे उर्जा मंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री *डॉ. नितिन राऊत* ह्यांना निमंत्रित केलेले असुन, प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रिय मंत्री *मा. नितिन गडकरी* तसेच महाराष्ट्राचे गॄहमंत्री *मा. अनिल देशमुख*, महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री *मा. सुनिल केदार*, महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री *मा. धनंजय मुंडे* ह्यांना बोलाविले असल्याची माहिती सदर आयोजक मंडळीनी काल पत्रकार परिषदेत दिली. *आणि सदर हेव्हीवेट मंत्री महाशयांनी ह्या सम्मेलनात हजेरी लावण्याला हिरवी झेंडी दिली काय...?* हा प्रश्न तसा बघावा तर गुलदस्त्यात असणारा म्हणावा लागेल...!!! *"कारण जागतिक करोना व्हायरस प्रकोप."* आणि देशभर करोना व्हायरस वर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध कार्यक्रमावर / सम्मेलनावर / गर्दी जमविण्यावर बंदी आणल्याची घोषणा शासन स्तरावरुन झाली आहे. तसेच सिनेमागृहे / नाट्यगृहे / तरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांनी जाहिर केला आहे. परंतु / कदाचित ही *"सुपर मंत्री"* एखादा नव अविष्कारीत *"हनुमान चालिसा"* (?)  वाचुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांना *"करोना प्रतिबंधात्मक उपायाची"* नागपुरी अविष्कार भेट देण्याचा हा प्रयोग करीत असतील...! कारण *"देववादात"* अशा बाबी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेही नागपुरातील *"दोन नितीन > नीति + न > नीति = Morality , न = नाही > नैतिकता नसणे "* (नितिन गडकरी आणि नितीन राऊत) ही शक्तीशाली राजकीय नेता आहेत. आणि अन्य मंत्री मंडळी सुध्दा...! तेव्हा त्यांच्या नावाचा गैर-वापर करुन आम्हा आंबेडकरी मंडळींना दाबण्याचा प्रयोग *डॉ. गिरीश गांधी आणि आयोजक कंपु"* करीत असतील, ती त्यांची मुर्खता म्हणावी लागेल...! कारण *डॉ. गिरिश गांधी आणि आयोजक कंपु ही माझ्याकरिता पाळण्यातील बाळ आहेत."*
     आता आंबेडकरी (?) साहित्य सम्मेलन आयोजकाच्या तिस-या भागावर चर्चा करू या...! जर *"अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन"* उदघाटनाला राजकिय मंत्री मंडळींनाचं बोलवायचे प्रयोजन होते तर ह्या सम्मेलनाला *"आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन"* असे नाव देण्याचा आपला अट्टाहास कां...??? त्या सम्मेलनाचे नाव *"अखिल भारतीय आंबेडकरवादी (?) राजकीय सम्मेलन"* असे दिले असते तर आणि त्या सम्मेलनात कोणत्याही राजकीय नेत्यांना / मंत्र्यांना / आणि गिरीश गांधी ह्यांनाही बोलावले असते तर कदाचित त्याला आमचा विरोध करण्याचे कारण नसते. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय महापुरुष आहेत. ते केवळ आमच्या आंबेडकरी समाजा सिमित नाहीत..! परंतु *"आंबेडकरवादी / आंबेडकरी साहित्य"* हा विषय भाव अलग आहे. उपस्थित राजकीय मंडळींचे आंबेडकरी साहित्याशी काय देणे - घेणे आहे. *"तुम्ही सत्तेच्या अनैतिक बाजारात तुम्हाला प्रिय असलेल्या भागांना विका...! आम्ही काही बोलणार नाही. परंतु आंबेडकरी...!!! ह्या शब्द भावाला विकणे कदापीही सहन केले जाणार नाही...!!!"*
       आंबेडकरी सांस्कृतिक - सामाजिक - साहित्यिक क्षेत्रामध्ये जातीयवाद जोपासणा-या नागपूर किर्तीमान (?) *डॉ. गिरिश गांधी* ह्यांचा धुसघुस हा आंबेडकरी चळवळीला घातक ठरणारा आहे. भाजप नेते डॉ. गिरीश गांधी ह्यांनी कांग्रेस प्रणित डॉ. नितिन राऊत ह्यांना सोबत घेवुन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ मान्यवर आणि साहित्यिक  *डॉ. भाऊ लोखंडे / डॉ. यशवंत मनोहर* ह्यांचा जन्म दिवस गोगावाद (गोळवलकर - गांधी) अर्थ भागातुन साजरा करणे, हा *"आंबेडकरी अर्थनीतिचा"* कलंकीत दिवस होता. माजी सनदी अधिकारी आणि भारतीय संविधानावर भाष्य करणारे *इ. झेड. खोब्रागडे* ह्यांनी सुद्धा गोगावादी अर्थ नीतिचा स-आधार घेवून परिषदेचे केलेले आयोजन हे आंबेडकरी अर्थवादी / उद्योगवादीं ह्यांच्याकरीता शरमेचा विषय आहे. तसेच *इ. झेड. खोब्रागडे* ह्यांनी विधानसभा २०१४ च्या निवडणुकीत भाजपा तर्फे *नितिन गडकरी* ह्यांच्या वाड्यावर जावुन *"उमरेड मतदार संघातुन"* तिकिट मागणे आणि वाड्यावरून मटणाचा ताव मारून येणे ही सुध्दा आंबेडकरी चळवळीकरीता चिंतेचा भाग आहे‌. इतकेच नाही तर डॉ. गिरिश गांधी प्रणित एक लाख रकमेच्या *'डॉ. आंबेडकर पुरस्कार"* मिळण्याकरिता आंबेडकरी (?) म्हणविणाऱ्या मान्यवरांनी शरणागत होणे, ही आंबेडकरी चळवळीकरीता विचार करणारा विषय म्हणावा लागेल. डॉ. गिरिश गांधी द्वारा आयोजित सम्मेलनात *डॉ. भालचंद्र मुणगेकर / डॉ. नरेंद्र जाधव / प्रा. डॉ. भाऊ लोखंडे / प्रा. डॉ. यशवंत मनोहर / प्रा. प्रकाश खरात / इ. झेड. खोब्रागडे* ह्या मान्यवर मंडळीनी हजेरी लावणे ह्याला काय म्हणावे. ही मंडळी बौद्ध धर्म प्रचारक नाहीत. आणि बौध्द धर्म प्रचारक हा धम्म प्रसार - प्रचार करण्यासाठी कुठे ही जावु शकतो.  बौध्द प्रचारक हा मुक्त रूपाने धम्माचे कार्य करण्यास स्वतंत्र आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्वप्नातील *"बौध्दमय भारत"* आपल्याला घडवायचा आहे.
       शेवटी आपणास एकचं सांगावयचे आहे की, "आंबेडकरी (?) साहित्य सम्मेलन" आयोजकांनी मंत्र्यांना कार्यक्रमात अतिथी बोलावले, म्हणुन ते फार शक्तीशाली झाले ह्या भ्रमात त्यांनी राहु नये. मंत्री असो वा राजकीय नेते ही औत घटका असलेली मंडळी आहे. *"अति तेथे माती"* ह्या उक्तीप्रमाणे त्यांना त्यांची जागा ही जनता दाखवुन देते. इकडे *डॉ. नितिन गडकरी* हे ABVP मध्ये कार्यरत असताना आणि *डॉ. श्रीकांत जिचकार* हे NSUI चे नेते होते. तर आम्ही मंडळी  *"विद्यार्थी संसद"* ह्या नावाने नागपूर विद्यापीठात निवडणुका लढवित होता. तेव्हाचे आमचे मित्र *अशोक मेंढे* ह्यांना ABVP ने "विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची" उम्मेदवारी दिलेली नव्हती. तर इकडे *मुकुल वासनिक* आमची मदत मागायला आल्यानंतर त्याला NSUI कडुन "विद्यार्थी संघाच्या सचिव" पदावर निवडुन आणणारे आम्ही त्या काळचे विद्यार्थी नेते होतो. त्यावेळी कांग्रेस - भाजपा असा आज दिसणारा भाव नव्हता. *डॉ. नितिन राऊत* हे नाव तेव्हा चर्चेत नव्हते. नंतर राजकारणात आले. त्यावेळी नागपूर विद्यापीठात आमचा एक दरारा होता. *प्रा. रणजीत मेश्राम* हे तेव्हा दैनिक लोकमत मध्ये आमच्या बातमीचे रकामेच्या रकामे लिहायचे. रणजीत मेश्राम हे पत्रकारीतेत एक फार मोठे नाव होते. त्यांनतर *स्मॄतिशेष सिध्दार्थ सोनटक्के, स. सो. खंडाळकर, प्रभाकर दुपारे, भुपेंद्र गणवीर* ही मित्रमंडळी लोकमतमध्ये जुळली. नंतर दैनिक जनवाद सुरू झाला. तिथे पत्रकार *मिलिन्द फुलझेले* आमच्या बातम्या विशेष रूपाने छापत होते. आम्ही विद्यार्थी मंडळी ती भयाण आग होतो. ह्याची साक्ष ती आमची आंबेडकरी बाण्याचे पत्रकार मंडळी देतील...! शेवटी सांगायचे असे की, *"आंबेडकरी (?) साहित्य संमेलनात मंत्री येणार असल्याचा रोब आम्हाला दाखविता कामा नये."* ती मान्यवर नेते मंडळी आमच्या नावाने सुपरिचित आहेत. आपण फक्त *"अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन"* आयोजन करतांना *"आंबेडकरी नैतिकता - एकनिष्ठता - प्रामाणिकता"* जोपासावी. ऐवढेचं सांगणे आहे...!

* * * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment