Monday 13 May 2019

*  *भारतीय संविधान साहित्य सम्मेलनाचे आयोजन घोषित केल्यामुळे नोटीस* *

प्रेषक : -
*डॉ. मिलिन्द पं. जीवने*
५८४, जीवक सोसायटी परिसर
नवा नकाशा, स्वास्तिक शाळेसमोर
लष्करीबाग, नागपूर ४४००१७
मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२
दिनांक - १४ मे २०१९

प्रती,
*संविधान फाउंडेशन* मार्फत
१. *ई. झेड. खोब्रागडे* (एक्स आय. ए. एस.)
     प्रमुख आयोजक
२. *मिसेस रेखा खोब्रागडे,* स्वागताध्यक्ष
पत्ता : ४०२, गिरी गौरव हाऊसिंग सोसायटी
सी - ९, अंबाझरी हिल टॉप, रामनगर,
नागपूर ४४००३३ म. रा.
मो. न. ९९२३०५६९००

*विषय : भारतीय संविधान साहित्य सम्मेलनाचे आयोजन दिनांक ८ - ९ जुन २०१९ घेण्याविषयी वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित करुन, भारतीय संविधान आणि कायद्याची अवहेलना केल्यामुळे तसेच जन मनाच्या भावना दुखावल्या मुळे नोटीस.*

      आपणास उपरोक्त संदर्भित विषयान्वये सदर नोटीस देण्यात येत आहे.

१. *"भारतीय संविधान - The Constitution of India "* हा समस्त भारतीयांचा *"कायदा ग्रंथ"* असुन, भारताची समस्त व्यवस्था ही सदर ग्रंथा अंतर्गत चालत असते. इतकेच नाही तर सदर संविधानाच्या अंतर्गत भारतामध्ये *हिंदु पर्सनल अॅक्ट, मुस्लिम पर्सनल अॅक्ट,  सिविल पिनल कोड अॅक्ट, क्रिमिनल पर्सनल कोड अॅक्ट*" आदी अनेक कायदे अस्तित्वात असुन, देशातील न्याय व्यवस्था असो की, कार्यकारी व्यवस्था असो की, किंवा अन्य कोणतीही व्यवस्था असो, ही सदर "कायदे ग्रंथाला" बांधिल आहे. सदर कायद्याचे उल्लंघन करने हा तर गंभिर गुन्हा असुन, सदर ग्रंथाचे पालन करणे - कायद्याचा सन्मान करणे, हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. महत्त्वाचे म्हणजे ह्या कायद्यातून प्रत्यक्ष देशाचे मा. राष्ट्रपति, प्रधानमंत्री,  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असो आदी सर्वोच्च मान्यवरांना ही सुट मिळालेली नाही.

२. अर्थात *"भारताचे संविधान "* हे सर्वोच्च स्थानी असुन, कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ हे सुध्दा सदर कायद्याला परस्पर पुरक असे मानता येत नाहीत. प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथात काहीही विदित असले तरी, संविधानाच्या अनुषंगाने आचरण करने गरजेचे आहे.

३. असे असतांना आमच्या असे लक्षात आले की, आपण *" संविधान फाऊंडेशन"* ह्या आपल्या संघटनेच्या बॅनरखाली दिनांक ८ - ९ जुन २०१९ ला बौध्दांचे पवित्र स्थान *"दीक्षाभूमी, नागपूर "* येथील ऑडीटोरीयम मध्ये दोन दिवसीय *" भारतीय संविधान साहित्य सम्मेलन "* घेणार असल्याची जाहीर बातमी वर्तमानपत्रात दिलेली आहे. सदर बातमी असंख्य भारतीयांच्या भावना दुखावल्या असुन, आपण *" भारतीय संविधानाला" साहित्याच्या चौकटीत बसवुन, भारतीय संविधानाची अवहेलना केलेली आहे.* महत्वाचे म्हणजे कायदा आणि साहित्य हे कधीच परस्पर पुरक नसुन, भिन्न असे विषय आहेत. *"कायदा हा माणसाला शिस्त देणारा चाबुक असुन साहित्य हे माणसाच्या जिवनाचे रेखांकन करणारा आरसा आहे."* खेदाची गोष्ट अशी की, सदर नियोजित साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून मा. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किशोर रोही ह्यांनी संमती द्यावी....! एकवेळ उच्च वर्ग समुहातील डॉ. अभय बंग ह्यांनी उदघाटक म्हणून स्वीकृती देने, हे कदाचित त्यांचे अज्ञान समजु शकतो...! परंतु कायदा तज्ञ - संविधान तज्ञ म्हणवल्या जाणा-या माजी न्यायाधीशा कडुन अशी गंभीर चुक होने म्हणजे मेरीटचाच प्रश्न म्हणावा लागेल...! अन्य सहभागी होणा-या मान्यवराबद्दल काही लिहिणे योग्य होणार नाही. कारण साहित्याची जाण त्यापैकी किती मान्यवरांना आहे? असा मोठा प्रश्न आहे. परंतु आपण आयोजक असल्याने ही जबाबदारी आपल्यावर जास्त आहे.

४. आपण आपल्या द्वारे स्थापित केलेल्या संघटनेचे नाव *"संविधान फाऊंडेशन "* ठेवणे, हे ही कुठे तरी " भारतीय संविधान" ला पुरक दिसत असुन, आपण ह्यापूर्वी स्थापन केलेल्या *"महाराष्ट्र ऑफिसर फोरम"* ही संस्था महाराष्ट्रातील मागास - बौद्ध अधिका-याची संघटना सांगित असतांना सदर ऑफिसर्स संघटनेचे नाव *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑफिसर्स फोरम"* असे न ठेवणे, ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रती आपला काही आकस तर नाही नां...! असा संदेह निर्माण होतो. कारण आंबेडकरी समाजातील इंजिनिअर, डॉक्टर आदींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर अनेक संघटनेची बांधणी केलेली आहे. जसे की - *डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडीकोज असोशिएशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर असोशिएशन, डॉ. आंबेडकर डॉक्टर्स असोशिएशन, डॉ. आंबेडकर टीचर असोशिएशन, डॉ. आंबेडकर पोष्ट ग्रेजुएट स्टुडंट असोशिएशन, डॉ. आंबेडकर अग्रीकोज असोशिएशन आदी...!*

४. सदर आपल्या संविधान विरोधी कृत्यामुळे भारतीय समाज आणि विशेषतः बौद्ध - आंबेडकरी समाज - साहित्यिक मंडळी ही आहत झालेली असुन, आपल्या ह्या कृत्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तेव्हा आपणास ही नोटीस देण्यात येते की, आपण सदर साहित्य सम्मेलन रद्द करुन, समस्त जनतेची जाहीर माफी मागावी. जर आपण सदर आचरण आणि कृती केली नाही तर आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करुन भारतीय संविधानाची अवहेलना केल्यामुळे आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. ह्याची नोंद घ्यावी.

आपलाच,
*डॉ. मिलिन्द पं. जीवने*

No comments:

Post a Comment