Friday 1 February 2019

⛓ *मी बंधमुक्त झालो....!*
        *डॉ. मिलिन्द जीवने "शाक्य'*
         मो. न. ९३७०९८४१३८

ह्या भीम सादेतुन, आम्ही धन्य झालो
संविधानाने ह्या, मी बंधमुक्त झालो...

जंजीरी सत्तेच्या, आम्ही गुलाम झालो
पायाच्या बेड्यांनी, लई बेजार झालो
ह्या ईच्छा मनाला, आम्ही सोडुनी आलो
बामनी काव्याचा, असा शिकार झालो...

दाव इज्जतीचा, आम्ही गहाण झालो
ना सोडवे नं आता, हे बेकार झालो
कुत्र्यांच्या जातीचे, आम्ही माणुसे झालो
शक्ती हिनतेचे, असे प्रतिक झालो...

बुध्द सुवर्ण युग, हे विसर झालो
अशोक चक्र गतीचे, बाधक झालो
शाहु फुलें ह्यांचे, ना ही आधार झालो
गुलामी लादुनी, असे बेघर झालो...

* * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment