Thursday 12 July 2018

✍ *आंबेडकरवादाला गांधी - मार्क्सवादाच्या तुतारीचे औचित्य (?) आणि भटी चाटुकता !*
          *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
          मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

     यशवंतराव चव्हाण महोत्सवाचे आयोजन गोगावादी (गोळवलकर - गांधीवादी) डॉ. गिरीश गांधी ह्यांच्या छत्रछायेखाली नुकतेच नागपुरच्या धनवटे सभागृहात झाले. आणि सदर महोत्सवात "दलित पँथरचे उत्तरार्ध" या गंभिर, चिंतनशील व महत्वपुर्ण अशा विषयावरील परिसंवादात अध्यक्ष पदावरून बोलतांना दलित साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, *"मार्क्स, गांधी आणि आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर केवल चर्चा करीत बसु नका. तर या तत्वज्ञानाला मानणारी माणसे ही एकत्र आणा. सर्वहारांना एकत्र बांधणारी वर्गीय बांधणी केल्याशिवाय आपल्या ह्या राजकिय वाटचालीला भविष्य नाही."* पुढे डॉ. मनोहर म्हणतात, *"आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता काँंग्रेसकडे गेला तर तो भांडवलदाराचा गुलाम होईल आणि तो भाजपकडे गेला तर सरंजामदार आणि हिंदु राष्ट्रवादाचा गुलाम होईल. सध्याच्या काळात लोकशाहीची आणि संविधानाची कबर बांधणे सुरु आहे. अशा परिस्थितीत सर्वहारामध्ये वर्गभान निर्माण करणे गरजेचे आहे. हेवेदावे आणि अंहकाराने दलित पँथर फुटली गेली. तर रिपब्लिकन पक्षाला पोटजातीपर्यंत तोडले गेले. हे टाळून ४० प्रतिशत मतदाराला एकत्र आणने गरजेचे आहे."*
      प्रा. डॉ. यशवंत मनोहरांचे उपरोक्त शब्दबोल वाचुन मी फारचं स्तब्ध झालो. ह्याशिवाय सदर महोत्सवात सामिल झालेल्या अन्य वक्ता वर्गाच्या विचारांची आपण दखल घ्यावी काय ? हाही एक प्रश्न उभा झाला. *आंबेडकरवादी असो वा कुणी दलित विचारवादी असो, ह्या सर्व मान्यवरांनी गोगावादी (गोळवलकर - गांधी) व्यासपीठावर जावे वा नाही...?* असा प्रश्न विचारणे खरे तर औचित्याला धरुन आहे काय ? हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण असे प्रश्न विचारण्याचा अलिकडे एक भाव झालेला दिसुन येतो. आम्ही प्रश्नांच्या आत न शिरता, सदर व्यासपीठावर आपण काय बोलतो आहोत, हा विचार जास्त महत्वपुर्ण आहे. *"आम्ही गोगावादाची री ओढतो किंवा त्या विचाराच्या प्रतिकुल भावाशी जावुन आम्ही आपले विचार स्पष्टपणे मांडतो...!"* ह्याचा ही विचार होणे गरजेचे आहे.
     डॉ. मनोहरांनी बोललेल्या विचारातील काही शब्दांच्या औचित्यतेबद्दल आता चर्चा करु या...! *"मार्क्स, गांधी व आंबेडकर या तत्वज्ञानाला मानणारी माणसे ही एकत्र आणा. सर्वहारांना एकत्र बांधणारी वर्गीय बांधणी केल्याशिवाय आपल्या ह्या राजकीय वाटचालीला भविष्य नाही ...! "* ह्या विषयाच्या आत जातांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो हा की, ह्या सर्वांना एकत्र आणण्याकरिता कुणा नेत्यांनी पुढाकार घ्यावा..? अर्थात *आंबेडकरवाद्यांनी वा, दलितवाद्यांनी वा, गांधीवाद्यांनी वा मार्क्सवाद्यांनी ...?* दुसरा अजुन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, हे एकीकरण केवल राजकिय भावातुन असल्यास, सामाजिक - धार्मिक - सांस्कृतिक - आर्थिक आदी विषमतेचे काय ...? आंबेडकरी - दलित समुहावर होणा-या अत्याचार - बलात्कार कृत्याचे काय ? *ह्या हिन - दीन मानसिक विकृती परिवर्तानाचा ब्लु प्रिंट कसा आणि काय असणार आहे...?* अजुन सर्वात महत्वाचा मुद्दा असा की, ह्या राजकिय एकीकरणाचा फायदा हा आजपर्यंत आंबेडकरी राजकारणाला हवा तसा झालेला नाही. कारण आजपर्यंतच्या झालेल्या निवडणुकीत आंबेडकरी नेत्यांचे मत मार्जिन ही अन्य जाती समुहाच्या तुलनेत फारच कमी राहिलेली आहे, त्याचे काय ?
      दुस--या भावाने मार्क्स - गांधी - आंबेडकर वादाचा विचार करु या...! कारण तिन्ही वादांचे स्वरूप हे पुर्णत: परस्पर विरोधी राहिलेले आहे. मग एक सामुहिक एकीकरण केंद्रबिंदु कोणता असणार आहे ? आणि त्या एकीकरण केंद्रबिंदुची प्रामाणिकता कसोटी कशी ठरवावी...? मध्यंतरी दलित साहित्यिक (आंबेडकरी नाही) रावसाहेब कसबे ह्यांनी गांधीवाद्यांनी नागपुरला घेतलेल्या परिषदेत *"आंबेडकरवाद्यांनी मोहनदास गांधी समजुन घेण्याचा सल्ला"* दिला होता. आणि डॉ. यशवंत मनोहर हे *"आंबेडकरवाद्यांनी मार्क्स समजुन घेण्याचा सल्ला"* देत आहेत...! कांग्रेस - भाजपा ह्यापासुन दुर राहाण्याचा विचार देतांना त्यांनी आता सोबत गांधी ही जोडलेला आहे, ह्या भावाचे काय ? *महत्वाचा विषय हा की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लिखाणात ना भारतीय मार्क्सवादाची कास धरलेली आहे वा गांधीवादाचे समर्थन...!* आंबेडकरवाद हा पुर्णत: परीपुर्ण विचार आहे. कारण त्या विचाराला बुध्दभावाचा मोठा आधार आहे. आणि बुध्द हे जगमान्य सत्य आहे...!!!
     आम्हाला आंबेडकरी विचारसरणीचे आदर्श राजकारण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजने - उमगने गरजेचे आहे. त्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिनांक २५ नोव्हेंबर १९४९ ला दिलेले भाषण हे आपला ब्लु प्रिंट असणार आहे. तर आदर्श समाज रचना निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रंगुन (बर्मा) येथे भरलेल्या "आंतरराष्ट्रिय बौध्द परिषदे"तील ४ डिसेंबर १९५४ चे भाषण हे ब्लु प्रिंट आहे. प्रा. डॉ. यशवंत मनोहरांनी त्यांच्या सदर महोत्सवातील भाषणात *"सर्वहारा - वर्गीय बांधणी - वर्गभान"* ह्या तिन शब्दाचा केलेला वापर हा केवल आंबेडकरी समुहालाचं धोका नसुन, भारतीय एकात्मतेलाही गंभिर धोका आहे. बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाला "समान नागरी कायदा" ह्याची आवश्यकता प्रतिपादन करतात. "जातीविहिन समाज रचना" ह्या देशात नांदावी असा विचार देतात. म्हणुनचं *"बुध्दमय भारत"* हे स्वप्न त्यांनी पाहिलेले होते. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते. भारत राष्ट्रवादी होते. डॉ. मनोहरांनी अशा आंबेडकरी विरोधी - देश विरोधी विचाराची री ओढु नये...! तुर्त एवढेच ...!!!

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
        (भारत राष्ट्रवाद समर्थक)
* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो.न. ९३७०९७४१३८, ९२२५२२६९२२

No comments:

Post a Comment