Saturday, 21 September 2024

 

🌹 *शब्दांची श्रृंखला !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो.न. ९३७०९८४१३८


शब्दांची श्रृंखला

जोडते मानवी मनाला

तर कधी कधी

तोडते मानवी मन

शब्द घायाळ ही करते

आयुष्याचे पर्व

उध्वस्त उगवतीचे

एक वास्तव बनुन...

शब्दांच्या मशाली

पेटवतात मन राने

द्वेषाची बीजे पेरुन

बुध्द हे सत्य आहे 

प्रेम मैत्री बंधुता

प्रज्ञा शील करुणा

असणारा एक धागा 

समस्त जाती मानवतेचा !!!


*******************

नागपूर, दिनांक १४ सप्टेंबर २०२४


https://kutumbapp.page.link/CmUoFHmnuf7bGoVGA

No comments:

Post a Comment