👌 *विदेशातील बुद्ध मुर्ती वितरण ते बुध्द अस्थी धातु दर्शन - जागतिक बौद्ध परिषद समारोह : एक आलेख !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
विदेशातील *"बुद्ध मुर्ती वितरण"* संदर्भातील आज चालत असणारा *"व्यापार वा स्मगलिंग"* प्रकार बघुन, माझ्या मनाला खुप वेदना होतात. मला १५ - २० वर्षांपूर्वी, माझ्या माध्यमातून वाटप केलेल्या त्या पावन *"बुध्द मुर्ती वितरण"* कार्यक्रमाची खुपचं आठवण झाली. त्यावेळी माझ्या मनातील उदात्त धम्म कामातुन, मला *"सेमिनरी हिल्स"* येथिल बुध्द विहार कामाला गती मिळालेली होती. सेमिनरी हिल्स येथिल *पहाडी खोदकाम* करीता माझे मित्र एड. बी.बी. रायपुरे ह्यांच्या फक्त एका शब्दाखातीर, मी १५ - २० दिवसाकरीता *"मोफत जेसीबी"* ची व्यवस्था केलेली होती. सदर कारण असे की, *"शब्द"* हा माझ्यासाठी एक प्रमाण आहे. मी *"शब्दाला पुर्ण जागणारा"* व्यक्ती आहे. मग *"कितीही प्रलोभन"* ही दिली तरी, मी *"विचार बदलत"* नसतो. माझ्या ह्या स्वभावाचे *"गंभीर परिणाम ही मला भोगावे"* लागलेले आहेत. *"काही जवळची लोक ही खुपचं दुर गेलेली आहेत."* कधी कधी त्या मंडळींची आठवण ही येते. उर: ही भरुन येतो. तरीही मी आज खुप समाधानी आहे, *माझ्या प्रामाणिक ह्या निष्ठा बांधिलकी विचाराशी !"* कुटील सौदाबाजी मला कधीही जमलीचं नाही. सेमीनरी हिल्स येथील *"लायब्ररी"* सुरू करण्याकरीता, माझ्याकडुनचं धम्म पुस्तके सुरुवातीला देण्यात आली होती. नागपूर शहरातील *उंटखाना / वैशाली नगर / पाचपावली"* पासुन असंख्य *"बौध्द विहाराला ६ फुट उंच बुद्ध मुर्ती"* (२.५ फुट स्टंड + ३.५ फुट बुद्ध मुर्ती) माझ्या शिफारशीमुळे मिळालेल्या आहेत. सदर सर्व विहारांची बुध्द मुर्तीचे विनंती अर्ज आजही माझ्या संग्रही आहेत. *"चंद्रपूर - दीक्षाभूमी "* वरील पहिली बुद्ध मुर्ती ही केवळ *"माझ्या शिफारशीमुळेचं"* मिळालेली आहे. अजुनही चंद्रपुरला काही ठिकाणी बुद्ध मुर्ती ह्या दिलेल्या होत्या. यवतमाळ जिल्ह्यातील *"पांढरकवडा"* येथील बुध्द मुर्ती वितरण सुध्दा. काटोल रोड वरील *"फ्रेंड्स कॉलोनी"* - बुद्ध विहाराला *"बुद्ध मुर्ती / लायब्ररी"* उभारणीस धम्म पुस्तके मी दिलेली आहेत. आणि माझ्या संपर्कातील कुणीही व्यक्ती सांगतीलं की, मी कुणाकडुन ही दहा रुपये सुध्दा घेतलेले नाहीत. माझ्या शिफारसीमुळे बरीच *"बुद्ध विहारे"* उभी झालीत, ह्यांचे मला समाधान आहे. बरीच *"लायब्ररी"* ह्या उभ्या झालेल्या आहेत / ब-याच वाचकांना मी *"धम्म पुस्तके"* उपलब्ध करुन दिलेली आहेत. आणि ह्यांचे मला समाधान आहे. विदेशातील सदर *"धम्म पुस्तके"* जरी मोफत येत असली तरी, *"कस्टम विभागातुन सोडविणे / नागपूर ट्रांसपोर्ट खर्च"* हा मला मुंबई एजंटसह, प्रत्येक वेळेला तेव्हा *"रू ४० - ५० हजार"* असा येत असे. अशा ३ - ४ खेपीचा खर्च मी स्वतःचं वहन केलेला आहे. परंतु कुणाकडुन मी पैशाची मागणी कधी केलेली नाही / ना ही पैसा घेतलेला नाही. *"कुणी माझ्या धम्म कार्यावर काय नावं ठेवायचं, हा ज्याच्या त्यांच्या बुद्धीचा विषय आहे."* मला ह्या विषयावर कोणतीही टिप्पणी ही करायची नाही.
माझ्या जीवनाचा खरा सामाजिक प्रवास हा *"रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन"* (RSF) ह्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष *वि. रा. वाशिमकर* ह्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातुन झालेला आहे. वि रा वाशिमकर ह्यांच्या आंदोलनातुन ब-याच आंबेडकरी मंडळींनी *"सरकारी नोकरी"* ही मिळवुन घेतलेली होती. नंतर ती वाशिमकर ह्यांना विसरुन ही गेली होती. परंतु वाशिमकर हे कफल्लकचं राहिले होते. आर्थिक स्थितीबद्दल न बोललेले बरे ! तत्कालीन आयुक्त मा. सुरडकर साहेब ह्यांच्यामुळे वाशिमकर ह्यांच्या *"पत्नीला मनपा मध्ये नोकरी"* ही मिळालेली होती. घर प्रपंच सावरण्यासाठी मदत झाली. जेव्हा केव्हा वाशिमकर साहेब ह्यांच्यासोबत माझी भेट ही होत असे, तेव्हा ते आपल्या मनातील दु:ख वेदना माझ्याकडे बोलतं असतं. *"मिलिन्द, हा समाज खुप स्वार्थी झाला रे !"* मी त्यांच्या डोळ्यातील आसवें बघितली आहेत. माझी संस्था *"जीवक वेल्फेअर सोसायटी"* तर्फे *"जीवक सामाजिक पुरस्कार"* देण्याचे पत्र *वाशिमकर साहेबांना* मी दिले होते, तेव्हा माझ्या समोर त्यांनी ते पत्र ७ - ८ वेळा वाचले असेल ! नंतर ते मला म्हणाले की, *"मिलिन्द, समाज मला विसरला. पण तु मला विसरला नाहीस.* वाशिमकर साहेबांची ती करुण व्यथा आजही मला कायम आठवण देत आहे. आणि जेव्हा त्यांचे *"निर्वाण"* झाले, ती बातमी मला मिळाल्यावर मी ब-याच नेत्यांना फोन वरुन सुचना दिली. पण कुणीही मोठा नेता हा *"वाशिमकर साहेबांच्या अंत्यसंस्काराला नव्हता."* ती आठवण आजही मी विसरलो नाही. *"निस्वार्थी, प्रामाणिक माणुस"* हा कफल्लकचं असतो. पण तो खुप काही संदेश ही देवुन जातो. बरीचं जुनी मंडळी ही वाशिमकर ह्यांना परिचीत आहेत. परंतु नव्या पिढीच्या माहिती करीता ही आठवण दिली आहे. *कारण वाशिमकर हे एक वाघ होते.*
वंचित आघाडीचे नेते *एड. प्रकाशराव यशवंत आंबेडकर* ह्यांना ३५ - ४० वर्षांपूर्वी समाजाला सर्वप्रथम परिचीत करण्याचा मोठा *"सत्कार कार्यक्रम"* हा *डॉ आनंद जीवने* भाऊ ह्यांच्या अध्यक्षतेखाली, *"धनवटे रंगमंदिरात"* सायं आयोजित करण्यात आला होता. प्रकाश आंबेडकर ह्यांचे स्वागत तेव्हा *मी (डॉ जीवने) स्वतः* केले. तेव्हा सकाळी एड प्रकाशराव य. आंबेडकर ह्यांची *"हत्तीवर बसुन"* बसुन २० - २५ हजार लोकांच्या उपस्थितीत मिरवणुक काढण्यात आली. त्या काळामध्ये *"खोरिप / भारिप"* ही आपली राजकीय पक्ष अस्तित्वात होती. प्रकाश आंबेडकर ह्यांच्याकडुन खुप काही अपेक्षा केल्या गेल्यात. परंतु *"राजकीय परिक्षा फल शुण्य"* हे दिसुन आले. असेचं १२ - १३ वर्षांपूर्वी *एड. प्रकाश आंबेडकर* ह्यांच्यासोबत समता सैनिक दलाचे *विमलसुर्य चिमणकर* / मोरे साऊंड सर्व्हिसचे *आयु. मोरे* आणि मी स्वतः माझ्या कारने चर्चा करण्याकरीता *"रवी भवन"* येथे गेलो. आणि आमची चर्चा सुरू झाली. तेव्हा *प्रा रणजीत मेश्राम / नत्थु नाईक / शंकर मानके / डॉ मिलिन्द माने / राजु लोखंडे / वनमाला उके* सहीत ४० - ५० कार्यकर्ते ही उपस्थित होती. प्रकाश आंबेडकर ह्यांच्या अगदी समोरच्या सोफासेटवर, *मी स्वतः* तर बाजुच्या सोपासेटवर *विमलसुर्य चिमणकर / मोरे* ही बसुन होतो. त्यावेळी मी स्वतः प्रकाश आंबेडकर ह्यांना एक प्रश्न विचारला होता. *"बाळासाहेब, आपल्यामध्ये चांगले वक्तृत्व / संचालन / नियंत्रण / नियोजन / आंबेडकर नाव वलय"* इत्यादी सर्व गुण असतांना, *"प्रकाश आंबेडकर हे राजकारणात नापास कां ?"* माझ्या ह्या प्रश्नावर तिथे सन्नाटा पसरला. प्रकाश आंबेडकर हे *"शांत आणि अबोल"* झाले. दहा मिनिटांनंतर ही सर्व काही अबोल असे वातावरण झाल्यावर, *"मी बाळासाहेब आंबेडकर"* ह्यांना म्हणालो की *"मी ह्याचे उत्तर देवु काय ?"* बाळासाहेब आंबेडकर मला म्हणाले की, *"द्या."* मी सरळपणे बाळासाहेब आंबेडकर ह्यांना म्हणालो की, *"तुम्ही सर्व प्रथम तुमच्या ह्या जमलेल्या घराड्यातुन बाहेर पडा. तुमच्या मध्ये खुप काही अहंकार आहे. तो सोडावा. आणि समाजामध्ये पुर्ण मिसळुन जा. खुप मोठे व्हाल !"* माझ्या ह्या उत्तरावर पुन्हा शांतता पसरली. आणि नंतर बाळासाहेब आंबेडकर हे मुंबईला निघुन गेले. दोन दिवसानंतर *प्रा. रणजीत मेश्राम* ह्यांच्या मला फोन आला. आणि मेश्राम जी मला म्हणाले की, *"धम्म मित्र, बाळासाहेब य. आंबेडकर ह्यांच्यावर तु काय जादु केली ? प्रकाशराव, ही तुझी आठवण करीत आहेत."* त्यानंतर प्रकाश आंबेडकर ह्यांचा प्रवास हा रिपब्लिकन पक्ष, बहुजन महासंघ ते वंचित आघाडी असा हा झालेला आहे.
*"जागतिक बौध्द परिषद २००६"* ही आठवण माझ्या आयुष्यात कधीचं विसरणारी नाही. सदर परिषदेकरीता *संजय जीवने / डी. बी. वानकर / शंकरराव ढेंगरे / प्रा. जयंत जांभुळकर* इत्यादी आम्ही सर्व मंडळीनी दान मिळण्याकरीता, ब-याच नामवंत मोठ्या मंडळी / संघटना ह्यांच्याकडे भेटी दिलेल्या होत्या. काहींनी दान देण्याचे खुप आश्वासन ही दिले होते. परंतु हातामध्ये एक रूपया हा आला नसल्यामुळे सदर परिषद रद्द करावी काय ? हा प्रश्न समोर आला. तेव्हा मी पैशाची चिंता न करता, सदर परिषद यशस्वी करण्यासाठी कामाला लागण्याची सुचना केली. त्यावेळी माझी पत्नी *वंदना* हिच्या जन्म दिवसाला भेट देण्यासाठी *"शेतीचा सौदा"* केला होता. सदर *"शेतीचा सौदा रद्द"* करुन ती सर्व राशी, मी *"जागतिक बौद्ध परिषद"* ही सफल करण्यात लावलेली होती. अर्थात कोषाध्यक्ष ही तेव्हा वंदना होती. परिषदेकरीता सदर राशी खर्च करतांना *"वंदनाच्या डोळ्यातील आसवे मी बघत होतो."* परंतु माझे लक्ष नसल्याचा माझा हा भाव असे. वंदनाला नंतर म्हटले की, पुढे कधी तरी तुला ही जन्म दिवसाची मी भेट देईल. नंतर पुन्हा *"जागतिक बौद्ध परिषद २०१३"* चे आयोजन करण्यात आले. कामठी रोडवरील *"एक फ्लॅट घेण्याबाबत"* पार्टी सोबत चर्चा सुरु होती. काही कारणाने ती बोलणी फिस्कटली. आणि सदर परिषदेत ती सर्व राशी खर्च केली गेली. ह्यावेळी सुध्दा मी *"वंदनाच्या डोळ्यातील आसवे मी बघितली आहेत."* माणसाची ही *"सामाजिक / धार्मिक बांधिलकी"* कधी कधी ध्येयनिष्ठ करीत असते !!! तेव्हा माणसाकडुन मात्र अन्याय हा होत असतो, असा ही अनुभव आहे. कदाचित मी स्वतः *"वंदनाच्या भावनेचा विचार केलेला नाही,"* वा तिचा मी पुर्णतः दोषी आहे, असे ही म्हणता येईल. असो, परंतु माझे वंदनाच्या परिवाराशी कधी सुत हे जमलेचं नाही. हे सुध्दा तितकेचं सत्य आहे. *परंतु मी माझ्या दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे.* हे ही तितकेच खरे आहे.
*"जागतिक बौद्ध परिषद"* ह्याचे सफल आयोजन करणे, हे माझ्याकरीता काही नविन नव्हते. परंतु *"जागतिक बौद्ध परिषद २०१५ / जागतिक बौद्ध महिला परिषद २०१५"* च्या आयोजनातील घटना विसरणे तर शक्य नाही. *"दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया"* चे *चंद्रबोधी पाटील / शंकरराव ढेंगरे* ह्यांच्या इच्छेनुसार *महाठग - नितिन गजभिये* ह्याला आमच्या मिशनमध्ये सहभागी करण्यास मी माझा होकार दिला होता. कारण सदर जागतिक परिषद ही माझी संघटन *"अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन / जीवक वेल्फेअर सोसायटी / सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* ह्या तमाम संघटनेच्या संयुक्त तत्वाधानाने आयोजित होती. सदर कार्यक्रमाची *"संपूर्ण योजना मी स्वतः"* तयार केली. माझ्या घरी होणा-या ४० - ५० कार्यकर्ता ब-याच सभेत मी *महाठग - नितीन गजभिये* विरोधात माझी स्पष्ट भुमिका होती. कारण मी नितीनला आधीपासुन परिचीत होता. नितीन हा माझ्याकडे बरेचदा मदत मागण्यास आलेला होता. *"जागतिक बौद्ध परिषद २०१५"* करीता श्रीलंका देशाचे राष्ट्राध्यक्ष *मैत्रीपाला सिरीसेना* हे येणार होते. श्रीलंका राष्ट्राध्यक्ष ह्यांचा कार्यक्रम ही आम्हाला आला. परंतु भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री ह्यांनी नागपुरात *"धम्म चक्र प्रवर्तन दिन समारोह"* कारण देवुन श्रीलंका राष्ट्राध्यक्ष ह्यांचा नागपुरातील कार्यक्रम रद्द केला. तेव्हा माझे मित्र एवं डॉ आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र चे कुलगुरू *डॉ.आर.एस. कुरील* ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर परिषद सफल केली. तसेच *"जागतिक बौद्ध महिला परिषद २०१५"* ह्या कार्यक्रमास थायलंड देशाची राजकुमारी *मॉम ल्युआंग राजदरबारी जयांकुरा* ही उदघाटक तर *वंदना मिलिंद जीवने* ही त्या परिषदेची अध्यक्षा होती. थायलंड राजकुमारी ही नागपुरात आल्यानंतरही *महाठग नितिन गजभिये* ह्यांनी तिला परिषदेत आणलेले नसल्याने, माझी जर्मनी देशाची मित्र *मिस उर्सुला गोईटिंगर* हिच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तेव्हा व्हिएतनाम / श्रीलंका ह्या देशातील मान्यवर मंडळी *"प्रमुख अतिथी"* होत्या. ह्याशिवाय श्रीलंका देशातुन *"कपिलवस्तु बुद्ध अस्थीधातु"* कस्टोडियन एवं मोठे उद्योगपती *बंडुला विराट वर्दने* हे सुध्दा श्रीलंका देशातील मान्यवर भंन्तेसह, नागपुर विमानतळ येथे आगमन झाले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य केंद्रीय मंत्री *राजकुमार बडोले*/ सांसद *रामदास आठवले* / माजी राज्यमंत्री *एड. सुलेखा कुंभारे* / *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य' / चंद्रबोधी पाटील / शंकरराव ढेंगरे* ह्यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. *"अस्थिधातु रथ"* हा विमानतळावर तयार होता. हजारो लोकांची भीड होती. सदर *"अस्थीधातु रथ"* बनविण्यासाठी मी स्वतः रू. ४०,००० /- महाठग नितिन गजभिये ह्याला दिले. तसेच पुन्हा *"चार लाख रुपये"* हे शंकरराव ढेंगरे ह्यांच्या माध्यमातून मी दिले. परंतु माझी सदर राशी *महाठग - नितिन गजभिये* ह्यांनी कधी परतचं केली नाही. तसेच *"दान स्वरूपात मिळालेली लाखो रुपयांची राशी"* घेवुन महाठग हा अदृश्य झाला. फिल्मी नायक *गगन मलिक* हा तेव्हा आमच्या सोबतचं होता. गगन मलिक ह्याला माझ्या कारने मी रवी भवन येथे आणले. तसेच गगन मलिक हा *"माझ्या घरी"* आला असतांना २५ - ३० महिला वर्गानी गगनचे स्वागत केले. आणि आम्ही सर्व मंडळींनी मग जेवणाचा आस्वाद घेतला. आमच्या ब-याच भेटीमध्ये मी *गगन मलिक* ह्याला सावध राहावे ही सुचना दिलेली होती. परंतु गगन मलिक ह्यांच्या चेह-यावर नितिन गजभिये ह्यांच्या चष्मा होता. विदेशी *"बुध्द मूर्ती प्रकरणात"* महाठग -'नितिन गजभिये ह्यानी *"एक करोड राशीची"* मोठी चपत *"गगन मलिक फाऊंडेशन"* ह्या संस्थेला दिली असल्याचे बोलले जाते. तसाच धोका महाठग नितिन गजभिये ह्यांनी त्याचे गुरू *चंद्रबोधी पाटील* ह्यांना दिली. आणि मी म्हणत असणारे बोल खरे ठरले.
*"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* ह्या माझ्या राष्ट्रिय स्तरावरील संघटनेने *"विश्व शांती रॅली"* (२००७ /२०१८/ २०२०) चे बरेच सफल आयोजन केले आहे. *"अखिल भारतीय आंबेडकरी विचारविद परिषद / अखिल भारतीय आंबेडकरी विचारविद महिला परिषद"* (२०१७/ २०२० /२०२१) ह्या परिषदेचे सफल आयोजन केले गेले आहे. सदर सर्व आयोजनात संघटनेचे *सुर्यभान शेंडे / वंदना जीवने / दिपाली शंभरकर / डॉ. मनिषा घोष / डॉ. किरण मेश्राम / डॉ. भारती लांजेवार / सुरेखा खंडारे / प्रा. वर्षा चहांदे / प्रा. डॉ. टी. जी. गेडाम / इंजी. गौतम हेंदरे / अधिर बागडे / डॉ राजेश नंदेश्वर* इत्यादी असंख्य CRPC च्या मंडळींचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. परंतु *दिपाली शंभरकर* ही आज आमच्यामध्ये नाही, ही मात्र उणिव आजही मला जाणवते. माझे विदेशी भ्रमण हे *"थायलंड / मलेशिया / सिंगापूर / श्रीलंका / नेपाळ / व्हिएतनाम / कोरिया"* ह्या देशात झालेले आहे. परंतु *"श्रीलंका / कोरिया"* ह्या देशातील काही अनुभव हे विसरता येणे शक्य नाही. *कोरिया* ह्या देशात झालेल्या *"विश्व शांती परिषदेत"* मला *HWPL* ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडुन निमंत्रण होते. संघटनेचे अध्यक्ष - *मॅन ही ली* ह्यांचे शांती मिशन मला जवळुन कळुन आले. तसेच *"द्वितीय महायुद्धातील आठवणी"* मला अगदी जवळुन बघता आल्यात. तर *श्रीलंका* ह्या देशातील *"अनुराधापुर"* ह्या शहरात झालेल्या *"धम्म परिषदेचे"* निमंत्रण मला श्रीलंका सरकार अंतर्गत *"सांस्कृतिक मंत्रालया"* कडुन मिळालेले होते. श्रीलंका देशात तर मला *"VVIP"* प्रमाणे सन्मान मिळालेला होता. श्रीलंका ह्या देशात *"ब-याच स्थळांना"* माझ्या भेटी झालेल्या होत्या. परंतु *बोधी वृक्ष / महिंदालय / कैंडीतील बुध्द धातु"* भेट विसरणे सहज नाही. भारतातील आंध्र प्रदेशातील *"अमरावती बौध्द महात्सव"* निमंत्रण मला *आंध्र सरकारचे तत्कालीन* / आताचे मुख्यमंत्री *चंद्राबाबू नायडू* सरकारकडुन होते. तसेच आंध्र प्रदेश सरकारने बौध्द भंतेंना आणण्यासाठी तिन बसेसची जबाबदारी मला दिलेली होती. अमरावती महोत्सवात सर्व शहरात *"मोठे मोठे होर्डिंग्ज"* लावलेले होते. त्यामध्ये *"माझा फोटो"* असल्याची गोष्ट ही माझ्यासोबत आलेल्या मंडळींनी दिलेली होती. तसेच आंध्र प्रदेशातील *"बौध्द स्थळांना भेटीचा कार्यक्रम"* आखण्यात आला. ह्या सर्व आठवणी कायमच्या हृदयात कोरलेल्या आहेत.
*महाठग - नितिन गजभिये* ह्या ग्रुपच्या *"इंडो आशियन मेत्ता फाऊंडेशन"* सौजण्याने आयोजित *"बुद्ध अस्थीधातु कलशयात्रा"* ही फार मोठी धुळफेक आहे. कारण श्रीलंका सरकारच्या पुरातत्त्व विभाग ह्यांनी तर *""बुद्ध अस्थीधातु"* असे असल्याचे कुठलेही प्रमाण दिलेले नाही. *"सारीपुत्त - मोग्गलान"* ह्यांच्या अस्थी धातु ह्या *"महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका"* सांची (म.प्र.) ह्यांचे कडे सुरक्षीत आहेत. ती संस्था अशा पध्दतीचे आयोजन करीत नाही. दर वर्षी *"नोव्हेंबर"* माहच्या शेवटच्या रविवारला फक्त एक दिवस दर्शनार्थ असते. *"डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीधातु"* संदर्भ ही तसाचं आहे. माझ्या ह्या बौध्द मिशन अभियानात माझे संबंध हे - महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका - *मा. बनागल उपतिस्स नायका महाथेरो* / महाबोधी सोसायटी ऑफ लद्दाख - *मा. भदंत संघसेन* / अमेरिका देशातील पिरॅमिड मेडिटेशन - *परम पावन बुद्ध मैत्रेय* / तिबेट संस्कृतीचे *परम पावन ड्रायकंग कैबगान चेटसंग* / *पुज्य भदंत आनंद कौशल्यायन* / *आर्य नागार्जुन सुरेई ससाई जी* / कोरिया की *मदर पार्क चुंग सु* / बोमडिला - *परम पावन सेरींग दोरजे* / व्हिएतनाम - *परम पावन थिंक नैट हैम* समान ब-याच आंतरराष्ट्रीय मान्यवर ह्यांच्या सोबत माझी जवळीक संबंध आहेत. *परम पावन दलाई लामा आणि परम पावन १७ वे - कर्माप्पा लामा* ही मान्यवर माझ्या कार्यालयात आलेली आहेत. आणि ह्यापैकी ब-याच मान्यवरांना माझी संस्था जीवक वेल्फेअर सोसायटी / अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन तर्फे *"शाक्यमुनी बुध्दा आंतरराष्ट्रीय पुरस्कार / प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार"* देण्याचा सन्मान मला मिळालेला आहे. तसेच *प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर* ह्यांच्या सानिध्यात राहिलेले आंबेडकरी लेखक *एल. आर. बाली / एड. भगवानदास जी / आकांत माटे / वामनराव गोडबोले / सदानंद फुलझेले / डॉ पी. जी. ज्योतीकर* इत्यादी अणेक मान्यवर ह्यांच्या सोबत माझे व्यक्तिगत संबंध होते. *"भदंत संघसेन / मदर पार्क चुंग सु / एड. भगवानदास / डॉ ज्योतीकर जी / आष्ट्रेलियाचे भंते बुद्धधातु"* इत्यादी मान्यवर मंडळी माझ्या घरी सुध्दा आलेली आहेत. अर्थात मला मिळालेला ह्या मान्यवरांचा सहवास माझ्या जीवनातील मी मोठी उपलब्धी मानतो.
*"विश्व हिंदु परिषद"* अंतर्गत २००७ साली झालेल्या *"सर्व धर्म सभा परिषदेत"* मला "अध्यक्ष" म्हणुन बोलाविण्यात आले. राष्ट्रिय स्वयं सेवक संघाचे *"डॉ मोहन भागवत "* हे उदघाटक तर विहिपचे *प्रवीण तोगडिया* हे प्रमुख पाहुणे होते. विमान सुटल्यामुळे प्रवीण तोगडिया हे आले नव्हते. माझ्या ह्या सहभागामुळे माझ्यावर *"संघवादी"* असल्याचा आरोप झाला. परंतु त्या सर्व धर्म परिषदेत *"डॉ मोहन भागवत ह्यांनी बौध्द धर्माचा स्विकार करावा. समस्त हिंदु परिषदेचे नामकरण विश्व बौध्द परिषद करावे"* हे मी त्यावेळी खुले आवाहन दिले. बौध्द - हिंदु धर्मातील दुरी वाढण्याचे कारण काय ? ह्याशिवाय *"तिब्बत और गुरुजी"* ह्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम हा माझ्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. संघाचे राष्ट्रीय नेते *इंद्रेश कुमार"* हे उदघाटक होते. माझ्या अध्यक्षीय भाषणात *"गुरुजींचे तिब्बत मुक्ती आंदोलनात योगदान काय ? डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विदेशी धोरणावर / आर्थिक धारणाचे काय मुल्यमापन केले गेले ?"* ह्या माझ्या अध्यक्षीय भाषणाकडे कानाडोळा करुन, मला *"संघवादी असल्याचा आरोप"* झाला. खरे तर *"संघवाद विचार कृतीशील विरोधात"* माझे बरेच काही लिखाण मिडीयात उपलब्ध आहे. आणि असे आरोप होत असतील तर मग डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्वप्नातील *"बौध्दमय भारत"* आही घडवणार कसे ? हा माझा अहं प्रश्न आहे. कधी तरी माझा प्रवेश *"भाजपा / कांग्रेस ह्या राजकारणात"* दिसलेला आहे काय ? हे सुध्दा समजुन घ्यावे लागणार आहे. असे ही नाही की, *आमदार / मंत्री / आयोगाचे अध्यक्ष / वा अन्य काही मी बनु शकलो नसतो ?"* वा माझ्यात ती पात्रता नाही ? वा मला ऑफर मिळालेली नाही ? आपल्या नेत्यांच्या तुलनेत माझी बौध्दीक क्षमता काय कमी आहे ? ब-याच लोकांना मोठे करण्यात माझा काही तरी हातभार आहे नां !!!
कथित बुद्ध अस्थीधातु / सारीपुत्त - मोग्गलान अस्थीधातु / डॉ बाबासाहेब आंबेडकर *"अस्थीधातु यात्रेमध्ये"* सहभागी होण्याच्या निमंत्रण पत्रिकेवर *"भिमराव आंबेडकर / आनंदराज आंबेडकर"* ह्यांचे प्रमुख अतिथी म्हणून नाव होते. आनंदराज आंबेडकर ह्यानी अस्थिकलश यात्रा विचारपीठावर नाचण्यास धन्यता मानली. मुंबई दादरच्या *"डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थापन प्रकरणी"* आनंदराज आंबेडकर *"आयत्या बिळात नागोबा झाला."* वास्तविकत: सदर उभारणीचे श्रेय हे दादरच्या *चंद्रकांत भंडारे* ह्यांचे आहे. कॅम्युनिष्ट चळवळीचे *शैलेश कांबळे* ह्यांनी चंद्रकांत भंडारे ह्यांची बाजु ही तत्कालीन प्रधानमंत्री *व्ही. पी. सिंग* ह्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी सिंहाचा वाटा होता. चंद्रकांत भंडारे हे मला भेटायला माझ्या घरी आलेत. माझ्या मुंबईच्या भेटीमध्ये *"एक खुप वयोवृध्द व्यक्ती"* मला भेटायला आला. आणि तो वयोवृध्द *प्रकाश आंबेडकर* ह्यांची तक्रार करतांना मला म्हणाला की, *"एड. प्रकाश आंबेडकर मते बाबासाहेब आंबेडकर या खेड्डयानी आमच्यासाठी काय केले ?"* अर्थात प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब ह्यांना *"खेड्डा"* असा प्रयोग करतात. म्हणुन तो माझ्यासमोर भावना विवश होवुन रडायला लागला. *राजरत्न आंबेडकर* ह्यांनी तर सर्व मर्यादाचं तोडलेल्या आहेत. बुलडाणा येथिल एका धम्म परिषदेत *"अशोक आंबेडकर / राजरत्न आंबेडकर / मी स्वतः / दिपाली शंभरकर"* आम्ही सोबत रेस्टहाऊस वर बसलो असतांना, मी राजरत्न आंबेडकर ह्याला *"भारतीय बौद्ध महासभा ऐक्य"* संदर्भात एक प्लॉन दिला होता. *अशोक आंबेडकर* ह्यांना तो प्लॉन आवडला. आणि त्यांनी राजरत्न आंबेडकर ह्याला म्हणाले की, *"डॉ जीवने साहेब म्हणतात, तु तसे कर !"* आणि मी राजरत्न आंबेडकर ह्याला नागपुरला भेटायला बोलावले. परंतु राजरत्न आंबेडकर हा खुप भारी प्राणी आहे. ऐकणार तो कसला ? आणि ते ऐक्य राहुन गेले. माझ्या जीवनात अशी बरीच प्रसंग आहेत / आठवणी आहेत / कटु - तिखट - गोड अनुभव आहेत, ते ग्रंथबध्द करावे ही इच्छा आहे. मी खुप काही सुखद / दु:खद अनुभवातुन बाहेर आलेला आहे. बघु या कधी ते सर्व शब्दबद्ध होणार ते !!!
---------------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर, दिनांक २३ सप्टेंबर २०२४
No comments:
Post a Comment