Wednesday, 11 September 2024

 .👌 *जीवनातील सत्य !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८


माणसातील हिनत्व भाव

दगाबाजी असत्य बोल

लबाडीचे जाळे

अनैतिकता पांघरुण 

सत्य भावनेचा मृत्यु

दुस-यावर दोषारोपण

अवगुण लपविण्याची वृत्ती

हे सर्वचं काही (?)

ह्या माणुस मनात

सहजत: असते की

पिढीजात परंपरेने 

माणसात ती आलेली असते

प्रश्नाच्या खोलात गेल्यावर 

प्रश्न हा प्रश्नचं असतो

उत्तर सहजा मिळत नाही 

मायेची उब गरज होते

तेव्हा बुध्द छायेत

शांती विसावा घेतल्यावर

निसर्ग भावनेचा बुद्ध 

खुप काही सांगुन जातो

प्रेम मैत्री बंधुता करुणा

आणि जीवनातील सत्य ...!!!


***********************

नागपूर दिनांक ११ सप्टेंबर २०२४

No comments:

Post a Comment