🌹 *जीवन यश शिखरावर !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
माणुस मन चक्र
फिरत असते निरंतर
चेतना ही सोबत असते
तीच सर्वस्व उर्जा आहे
माणुस अस्तित्वाची
प्रेम मैत्री बंधुता
प्रज्ञा शील करुणा
ही अनुभूती देणारी
बुध्द तत्वज्ञान गुरुकिल्ली...
अंधा-या भयाण रात्री
माणसाचा प्रवास
विसावा थांबा घेतो
परंतु थंडीच्या आडोसात
चंद्राच्या शीतल छायेत
लुकलुकणारे काजवे
ह्या हळुवार मनाला
सुखद आनंद देतांना
कधीचं सौदेबाजी नसते...
सुर्योदयाची पहाट
प्रकाश किरण असते
नव्या आशा आकांशेची
माणुस हा चालत जातो
नविन उम्मीद घेवुन
तेव्हा कधीचं थांबत नसतो
सारखा चालत असतो
एक ध्येयवेडा होवुन
जीवन यश शिखरावर...
**********************
नागपूर, दिनांक १३/०९/२०२४
No comments:
Post a Comment