🌳 *बोधीवृक्षाच्या छायेत...!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न ९३७०९८४१३८
बुध्दगया - दिक्षाभुमी
ह्या पावन स्थळापासुन
श्रीलंकेच्या अनुराधापूर पर्यंत
रुजलेल्या पिंपळ बोधीवृक्षांच्या
सावलीत माझा झालेला विसावा
मनाला प्रेरणा देणारा क्षण
हा माझ्याचं काय तर
समस्त जन मन आयुष्याचा
ह्या संसारमय जगाचा
शांतीचा केंद्रबिंदू झालेला आहे.
बोधीवृक्षाच्या छायेत
मिळणारा प्राणवायु
मनाला मिळणारी प्राण उर्जा
शांतीचा मिळणारा विश्व संदेश
पिंपळ बोधिवृक्षाच्या पानांची
असणारी ती विशेष विविधता
ही जगात कुठेचं दिसणार नाही
म्हणुनचं पृथ्वीतलावरील माणुस
हा जात असतो बुध्द शरणागत
समस्त विश्वाच्या शांतीकरीता ....!
**************************
नागपूर, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४
No comments:
Post a Comment