👌 *हे विश्व शांतीचा ...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
हे विश्व शांतीचा निसर्ग बुध्द तु
भीमाला क्रांतीचा नाद दिला हे...
मना ह्या कोमजु नको असे हे
सदा सर्वदा उमल हा हवा तो
निसर्ग राजे ह्या यौन सौंदर्याने
जीवनात आनंद सदा मिळे हे...
हिरव्या मनाच्या ह्या वनराई तु
सौंदर्य खुले हे रंगी फुलात ह्या
प्रेमाचा संदर्भ हे गुलाबात आले
आनंद जीवना प्रिय सखा रे हे...
क्षुप कुशीत तुझ्या असतांना हे
हळुवार मनाचे गोंजरवाणे आले
निसर्ग वा-याच्या मधुर झाकेत तु
जीवन संदर्भ संगिताचे आधार हे...
निसर्ग साथ तो हसरा दिखावा हे
गगन वृक्ष छायेच्या छटा असा हा
हिरव्या वेलीच्या मित्र आलिंगना रे
प्रेमाचा आल्हाद ह्या जगी असा हे...
संसार करुणेचा सागर किनारा हे
पिंपळ बोधिवृक्षा हे बुद्धत्व आले
पक्षी राजाच्या चीव चीवी गुंजना
सम्यक संबुध्द बोध जगी झाले हे...
**************************
नागपूर, दिनांक २९ ऑगस्ट २०२४
No comments:
Post a Comment