Friday, 29 September 2023

 👌 *बुध्द शब्द...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो.न.‌९३७०९८४१३८


सर्वांग स्पर्शातून मिळणारी उर्जा

ही क्षणिक आनंददायी आहे

आणि दुरत्वाचे असणारे दु:ख

वेदनाकारक असणारे आहे

कायिक - वाचिक - मानसिक कर्माच्या

सचेतन क्षणाची मन:स्थिती

तो एक हेतु असल्यामुळें 

कर्म एक मन:स्थिती निर्माण करते

कुशलधर्मी वा अकुशलधर्मी

असणारा हा भेदाभेद 

मानसिक शक्ती आहे काय ?

त्या परस्पर एकत्र येतात काय ?

हा एक अहं प्रश्न आहे....

बुध्द म्हणतात‌-

"चित्तेन नियतो लोको"

अर्थात सृष्टी, संसार ही

चित्ताची उपज आहे

म्हणुन चित्तच सर्वोपरी आहे.

भगवान बुध्दाने 

सृष्टीतील तिन वस्तुचे

अस्तित्व नाकारलेले आहे

सृष्टीमध्ये अजय - अमर -

सचेतन‌ - अचेतन‌ काहीही नाही

संस्कार नित्य - नाश न पावणारे नाही

आत्मा अशी वस्तु अस्तित्वात नाही.

तथागत बुध्दाच्या

कार्यकारणभाव सिद्धांतानुसार 

इदं सति इदं होति

इदं असती इदं न होति

अर्थात कारण असेल‌ तर

कार्य होत असते

जर कारण नसेल तर

कार्य होत नाही

हे बुध्द शब्दचं

आपल्याला नविन अशी उर्जा आहे....


* * * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक २९/०९/२०२३

No comments:

Post a Comment