👌 *जळगाव मध्ये २ - ३ एप्रिल रोजी होणा-या बौध्द साहित्य सम्मेलन अध्यक्ष पद प्रा. यशवंत मनोहर ह्यांना देण्याचा विवाद एवं आयोजन...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर
अध्यक्ष, बौध्द साहित्य सम्मेलन समन्वय समिती जळगाव
मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
बौध्द साहित्य प्रचार संस्था अंतर्गत दिनांक २ - ३ एप्रिल २०२३ रोजी *"तिसरे राज्य स्तरीय बौध्द साहित्य सम्मेलन"* जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे. सम्मेलनाचे उदघाटन रिपब्लिकन सेना (?) सरसेनापती *आनंदराज आंबेडकर* हे करणार असुन, ईहवादी साहित्यिक *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* (ते आंबेडकरी - बौध्द साहित्यिक नाही) ह्यांची अध्यक्षता राहाणार आहे. सदर बातमीची पोष्ट दोन महिण्यापुर्वी *बौध्द साहित्य सम्मेलन समन्वय समिती* ह्या व्हाट्सएप ग्रुपवर प्रकाशित झाली. मी स्वत: (डॉ. जीवने) सदर समन्वय समितीचा अध्यक्ष असतांना आणि समन्वय समितीची कोणतीही *"ऑफ लाईन / ऑन लाइन मिटिंग"* झालेली नसतांना सदर धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे, मी बौध्द साहित्य प्रचार संस्थेचे अध्यक्ष *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* आणि सचिव *प्रा. भरत सिरसाट* ह्यांना फोन करुन तसेच व्हाट्सएप वर मेसेज ही करुन, सदर घेतलेल्या निर्णयाबद्दल माझी नाराजी सांगितली. तेव्हा बातमीमध्ये अध्यक्ष म्हणुन प्रा. डॉ. यशवंत मनोहर ह्यांचे नाव होते. आनंदराज आंबेडकर ह्यांचा उल्लेख नव्हता. प्रा गायकवाड तेव्हा गोव्याला असुन ह्या विषयावर प्रा सिरसाट ह्यांच्यासोबत बोलणार असल्याचे ते मला म्हणाले. तसेच उभयतांना मी *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* हे आंबेडकरी - बौध्द साहित्यिक नाहीत. प्रा. डॉ. यशवंत मनोहर ह्यांच्या घरी *" गौरी - गणपती"* बसली जात असते, ह्याबद्दलची माहिती दिली. तसेच प्रा यशवंत मनोहर संदर्भात मी लिहिलेले आणि मिडियात प्रकाशित झालेले लेख ही पोष्ट केले. परंतु मागिल दोन महिन्यापासुन *"बौध्द साहित्य समन्वय समितीची"* कोणतीही मिटिंग ही आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणताही धोरणात्मक निर्णय हा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / आनंदराज आंबेडकर* ह्यांना देण्यात आलेले निमंत्रण हे पुर्ण बेकायदेशीर आहे, हे म्हणायला हरकत नाही. *"ह्याला न्यायालयात आवाहन दिल्यास आपल्या आंबेडकरी - बौध्द समाजात हा चुकीचा संदेश जावु शकतो."* तेव्हा आयोजन समितीने ह्या संदर्भात विचार करणे, हे फार गरजेचे आहे. आता आपण या मान्यवरांच्या विरोधाबाबत बोलु यां...!
निश्चितचं *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* हे नामांकित ईहवादी साहित्यिक आहेत. त्यांनी कार्ल मार्क्स / केसवसुत / डॉ. बाबासाहेब आंबेडकर / महात्मा ज्योतिबा फुले इत्यांदी मान्यवरांवर लिखाण ही केलेले आहे. परंतु मनोहरांची बांधिलकी कधी कार्ल मार्क्स आहे तर, कधी केशवसुत ही. तेव्हा यशवंत मनोहर हे पुर्णत: / शुध्दपणे व्यवसायी साहित्यिक आहेत, असे ही आपल्याला म्हणता येईल. त्यांनी *"विद्रोही साहित्य सम्मेलनाची"* अध्यक्षता भुषविली आहे. सदर समस्त विद्रोही साहित्यिक मंडळींचा प्रस्थापित *"मराठी साहित्य सम्मेलन"* ह्याला असणारा विरोध हा बेगडी स्वरुपाचा आहे. त्या विद्रोही साहित्यिकांनी परंपरावादी विचार - संस्कृती ही कुठे नाकारलेली नाही ? सविस्तर विराधावर चर्चा ही पुढे कधीतरी ! प्रा. यशवंत मनोहर हे *"अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या"* मंचावर त्यांची स्तुती करुन गेले. अंधश्रध्दा मंडळींनी ही रुढी - परंपरा विचार - संस्कृती - देव हा नाकारलेला नाही. प्रा.डॉ. यशवंत मनोहर ह्यांच्या घरी *"गौरी - गणपती"* बसली जात असते. सदर घटनेची साक्ष ही बरीच मंडळी / भंते सुध्दा देतील. प्रा. डॉ. यशवंत मनोहर ह्यांच्या घरी *"गौरी - गणपती"* बसलेली असतांना, अचानकपणे मी स्वत: (डॉ. जीवने) आणि माझा परम मित्र *अमर रामटेके* (नामांकित नाटककार / आकाशवाणी अधिकारी) आम्ही दोघे ही प्रा. डॉ. यशवंत मनोहर ह्यांना सहज भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे एक भंते ही बसलेले होते. तेव्हा प्रा. यशवंत मनोहर ह्या संदर्भात आपल्या नाटकीय भाषेत म्हणाले की, *"मिसेसच्या मैत्रीणी आणि ती ही करीत असते. हे चालायचं."* प्रा. डॉ. यशवंत मनोहर ह्यांचा प्रवास कट्टर जातियवादी / भाजप नेते - *गिरिश गांधी* (सांस्कृतिक डॉन) ह्यांच्या सोबत राहिलेला आहे. अजुन बरेच काही लिहिता येईल. गौरी - गणपती हे बसविणे असो, वा भाजप नेते गिरिश गांधी ह्यांची मित्रता इत्यादी हे विषय प्रा. यशवंत मनोहर ह्यांचे व्यक्तिगत विषय असल्याने ह्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. प्रश्न येथे *"बौध्द साहित्य सम्मेलन अध्यक्ष पदाच्या सन्मानाचा आहे."* आणि म्हणुनच माझा प्रा. यशवंत मनोहर ह्यांना तिस-या बौध्द साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष करण्याला विरोध आहे. *"वरुन मी स्वत: ह्या बौध्द साहित्य सम्मेलनाच्या समन्वय समितीचा अध्यक्ष आहे."* मी ही महा चुक कां बरे करावी? जर यशवंत मनोहर हे सत्य नाकारत असतील तर त्यांना बौध्द विचारक म्हणावे काय ? हा प्रश्न आहे.
रिपब्लिकन सेना निर्मित संघटनेचे सरसेनापती *आनंदराज आंबेडकर* ह्यांना सदर बौध्द साहित्य सम्मेलनाच्या उदघाटक विरोधाचा आहे. *एड. प्रकाश आंबेडकर / भिमराव आंबेडकर / किंवा आनंदराज आंबेडकर* ही तिन ही मान्यवर आपला एकमेव आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या परिवाराचा घटक आहेत. तेव्हा त्यांचा सन्मान करणे, हे काही ही गैर नाही. परंतु ती मान्यवर केवळ डॉ. बाबासाहेबांच्या परिवारातील आहेत म्हणून आपण त्यांच्या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करावे, हा विषय पचनीय नाही. *आनंदराज आंबेडकर* ह्यांनी एड. प्रकाश आंबेडकर ह्यांच्या माध्यमातुन मुंबईच्या चैत्यभुमीवरील *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लढा हा अनैतिक पध्दतीने हायजॅक केला."* वास्तविकत: ह्या लढ्याचे श्रेय हे पोष्ट खात्यातील एक तृतीय वर्ग कर्मचारी *चंद्रकांत भंडारे* ह्यांचे आहे. दुसरे कारण आनंदराज आंबेडकर हे आंबेडकरी बौध्द साहित्यिक नाहीत. *"तेव्हा बौध्द साहित्य सम्मेलनाचे उदघाटन हे कुण्या एखाद्या योग्य नामांकित वरिष्ठ आंबेडकरी - बौध्द साहित्यिकाकडुन व्हायला हवे."* ह्या सन्मानाचा अधिकारी ती व्यक्ति असायला हवी. प्रकाश आंबेडकर ह्यांनी ही *"बाबासाहेबांच्या रिपब्लिकन नावाला छेद देवुन बहुजन महासंघ ते वंचित आघाडी असे नामकरण केलेले आहे."* करोना तिव्र काळात *"हिंदु मंदिर उघडण्याचे आंदोलन"* त्यांनी केलेले होते. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा *"काळाराम मंदिर सत्याग्रह"* हा देवदर्शनाचा लढा भाव नव्हता. तर तो समतेचा मानवी लढा होता. राजगृहावर *"बाबासाहेबांच्या जन्मदिनी काळे झेंडे"* लावलेले होते. तसे बघितले तर एड. प्रकाश आंबेडकर ह्यांना पहिल्यांदा समाजकारणात स्मृतिशेष *डॉ. आनंद जीवने* ह्यांनी आणुन त्यांचा जंगी सत्कार धनवटे रंगमंदिरात केला गेला. तेव्हा मी स्वत: प्रकाश आंबेडकर ह्यांचा सत्कार केलेला होता. स्मृतिशेष *अशोक आंबेडकर* ह्यांचे *"दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया"* ही बाबासाहेबांनी स्थापित संस्थेची सुधारीत स्कीम लिहिण्यात काही योगदान नाही. सदर स्कीमची चर्चा माझ्या स्टडी रुममध्ये बरेचदा तत्कालिन कार्यकारीणी सदस्य स्मृतिशेष - *हरिश मजगौरी / डॉ. स. वि. रामटेके* ह्यांनी केलेली होती. आणि स्मृतिशेष - *हरिश मजगौरी* (माझ्या आईचे आत्ये भाऊ - त्यांना मी मोठे बाबा म्हणत असे) ह्यांनी तो स्कीम ड्राफ्ट लिहिलेला होता, ह्याचा मी साक्ष आहे. सांगायचे विशेष असे की, आम्हाला सदर पद देतांना योग्य अशा मान्यवराला तो सन्मान द्यायला हवा.
*"तृतीय बौध्द साहित्य सम्मेलन"* ह्या विचाराला विरोध असण्याचे कारण नाही. *"साहित्य हा विचाराचा आरसा कधीही नसावा. आणि विशेषत: बौध्द साहित्य हे माणसाच्या जीवनाला आकार देणारे, साकारणारे एक सशक्त माध्यम आहे. आरसा हा आभासी प्रतिबिंबाचे प्रतिक आहे. तेव्हा आपल्याला ह्या आभासी प्रतिबिंबातुन बाहेर पडायला हवे."* म्हणुन आयोजकांनी आता तरी झालेली महा चुक ही दुरुस्त करायला हवी. अजुन ही सदर चुक दुरुस्त करायला बराच वेळ आहे. एक महिना शेष आहे. आणि समन्वय समितीची तातडीची सभा घेता येवु शकते. *"प्रा. डॉ. यशवंत मनोहर / आनंदराज आंबेडकर ह्यांच्याबद्दल योग्य निर्णय घेवुन, त्यांची दिलगिरी व्यक्त करुन त्यांना आदरपूर्वक सदर सम्मेलनात निमंत्रित न करण्याचे पत्र पाठविले जावु शकते."* वेळ कमी वाटत असल्यास सदर सम्मेलन अजुन १५ - २० दिवस पुढे ढकलता येवु शकते. नविन अध्यक्ष / उदघाटक निवडता येईल. प्रश्न हा आता फक्त ईच्छाशक्तीचा आहे. मी समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणुन माझी भुमिका ही स्पष्ट विषद केलेली आहे. मी अशा चुकीच्या मिशनमध्ये कधी ही सहभागी होणार नाही. बाकी निर्णय हा आपला आयोजक म्हणुन राहाणार आहे.
* * * * * * * * * * * * * * * * *
(नागपूर दिनांक २७ फेब्रुवारी २०२३)
No comments:
Post a Comment