Sunday, 19 February 2023

 👌 *बुध्दाची करुणा...!*

        *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* 

         मो.न.‌ ९३७०९८४१३८


ह्या वेदनांना आसवांची करुणा आहे

बुध्दाची करुणा शांतीचे प्रतिक आहे...


अंधा-या काजव्यांना प्रकाश दुर आहे

सुर्य किरण संगिताचा चंद्र साज आहे

तारकांना रात्र ही एक उजळणी आहे

सुर्य चंद्राची मैत्री रे कधी होणार आहे...


ह्या फुलांचे वेली - झाडांवर प्रेम आहे 

कस्तुरी मधु गंधाला फुलांचा नाद आहे

पाखरांना झाडांचा मोठा आधार आहे

दुभंगलेल्या मनाला एक इशारा आहे....


काळोखाची रात्र ही फार भयाण आहे

भीम बाबाचा संदेश मोठा दरारा आहे

बुध्द शांती मार्गाने हे जग जिंकले आहे 

अशोकाचा भारत ही आता गरज आहे...


* * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment