👌 *फक्त बुध्द विचारातुनचं...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
आयुष्याचा वणवा पेटवणारी आग
शब्दांचा प्रति तिव्र मारा झाल्यामुळें
आणि नफरत भावनेच्या चिंगारीने
ज्वलनशील असा पेट घेतचं असते.
दुधात मीठाचा खडा मिसळावा
अफुच्या नशेपेक्षा ती अति जहाल
अंगुराच्या अरिष्टाला मागे टाकणारी
विषाची ती फार जिगरी मैत्रीण असते.
माणसांच्या दृष्ट सवयींच्या वृत्तीमुळे
माणसांचा दुरावा हा वाढतचं जातो
आणि एकत्र जोडणारा बाभुळी डिंक
हा कधीचं तिथे कामाचा नसतो.
बुध्द प्रेमाचा असणारा ओलावा
आणि मैत्रीची ही कशीश बांधणी
तसेच प्रज्ञा भावनेचे हे किरण रूप
त्रिशरण -पंचशील असणारी वंदना
हे सर्व काही जोडीला असल्यावर
सर्वचं काही शांत होत असते
फक्त बुध्द विचारातुनचं.....!!!
* * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment