✍️ *यशोधरा - सावित्री - रमाई*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
सिध्दार्थाची तु गं यशोधरा
त्यागाचे एक प्रतिक आहे
कारुणिक बुध्द घडवणारी
आमची तु एक आई आहे...
ज्योतिबा फुलेची तु गं सावित्री
इतिहासाची तु यशोधरा आहे
सत्यशोधक फुले घडविणारी
समस्त स्त्री वर्गाची आई आहे...
भीमराव बाबांची तु गं रमाई
यशोधराचे एक प्रतिरूप आहे
बोधिसत्व आंबेडकर घडवणारी
आमची दुसरी तु आई आहे...
जगात आई असतील खुप ही
तुमच्या पारड्यात बसणार नाही
महा त्याग - समर्पण - कृती मध्ये
तुमच्या सारखा इतिहास नाही...
* * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment