Friday, 17 February 2023

 ❓ *गंभिर प्रश्न ....!*

        *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

         मो.न. ९३७०९८४१३८


इथं माणसांचे चेहरे असो की

गट तट हे सारखे बदलत असतात

आपला नेहमीचा दोस्ताना

स्वाभिमानाचा सौदा करणे

ही एक फँशनचं झालेली आहे

कुणी आज इथे असेल तर

उद्या तो कुणासोबत असेल

हे भविष्य सांगणे कठिण आहे

आणि रिपब्लिकन बांधिलकी 

बदनाम अशी झालेली आहे. 

प्रामाणिकता ही राहिलेली नाही

शब्दाला जागणे तर फार दुर झाले

वेश्या ही आपला व्यवसाय

चार भिंतीच्या आत करीत असते

परंतु ह्यांचे कारनामे तर

भर रस्त्यावर होत असल्यानें

ह्यांना वेश्या सुध्दा बोलणे

हा वेश्यांचा घोर अपमान होईल

अर्थात ह्यांना काय म्हणावे ?

किंवा ह्याला काय नाव द्यावे ?

हा एक गंभिर प्रश्न आहे

समिक्षक मित्राकरींता...!


* * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment