✍️ *ईहवादी / भोगवादी / ललितवादी / अभिजनवादी / विद्रोही (?) वादींचे वर्धा नगरीतील मराठी साहित्य / विद्रोही (?) साहित्य सम्मेलन आणि नाटकिय प्रेम गळाभेट एवं सांस्कृतिक संघर्ष (?)*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
मो.न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२
दिनांक ३ - ४ - ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सेवाग्राम / वर्धा ह्या गांधीवादाच्या नगरीत *"६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन"* हे *न्या. नरेन्द्र चपळगावकर* ह्यांच्या अध्यक्षतेत, तर दुसरीकडे *"विद्रोही साहित्य सम्मेलन"* हे *चंद्रकांत वानखेडे* ह्यांच्या अध्यक्षतेत पार पडलेले असुन, न्या. नरेन्द्र चपळगावकर - चंद्रकांत वानखेडे ह्यांच्या प्रेम गळाभेटीने (?) ते बरेच चर्चीत आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती नाही. जेव्हा जेव्हा कुठेही "अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे" आयोजन होते, तेव्हा तेव्हा दुसरीकडे "विद्रोही साहित्य सम्मेलन" ह्याचे अलग आयोजन होणे, ह्या स्पर्धात्मक घटनेला आपण सांस्कृतिक विरोध म्हणावा वा वैचारिक विरोध ? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी *उदगीर* ह्या नगरीत असेच "६५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन" ह्याचे उदघाटन राजकिय नेते *शरदचंद्र पवार* हृयांनी आणि अध्यक्षता *भारत सासणे* ह्यांनी केली होती. तर दुसरीकडे *गणेश विसपुते* ह्यांच्या अध्यक्षतेत असेच "विद्रोही साहित्य सम्मेलनाचे" आयोजन झाले होते. ह्या दोन्ही परस्पर विरोधी साहित्य सम्मेलन आयोजनातील काही (?) विषयावर मी एक समिक्षात्मक लेख लिहिलेला होता. आताही पार पडलेल्या ह्या दोन्ही साहित्य सम्मेलन आयोजनावर सुध्दा काही प्रश्न सुध्दा निर्माण झालेले आहेत. आता त्या काही महत्वपुर्ण प्रश्नार्थक विषयावर चर्चा करु या...!
ईहवादी / भोगवादी / ललितवादी / अभिजनवादी / विद्रोही (?) वादी / बहुजनवादी / सर्वजनवादी इत्यादी सर्वच्या सर्व साहित्यिकांना *"बुध्द - आंबेडकरी साहित्य"* ह्याबद्दल द्वेष वा भिती कां ? असा महत्वपुर्ण प्रश्न आहे. *कालीदासाच्या लिखाणातील भोगवाद* हा सौंदर्यशास्त्राचा विषय होवु शकतो काय ? *भदंत अश्वघोष* ह्या मानवतावादी / महान बौध्द साहित्यिक - नाटककाराला *"आद्य साहित्यिक"* म्हणुन आपण स्विकार करणार काय ? तथाकथित सर्वच्या सर्व विद्रोहीवाद्यांची *"विद्रोही ह्या शब्दाची वैज्ञानिक परिभाषा"* काय आहे ? ईहवादी / भोगवादी / ललितवादी / अभिजनवादी / विद्रोह (?) वादी / बहुजनवादी / सर्वजनवादी इत्यादी सर्वच्या सर्व साहित्यिकांच्या लिखाणातील *"भारत राष्ट्रवाद / मानवतावाद / नैतिकवाद / सौंदर्यशास्त्र"* इत्यादी विषयाचे आकलन सुत्र काय आहे ? *बुध्द - आंबेडकरी साहित्यातील* "मानवतावाद / नैतिकवाद / राष्ट्रवाद / सौंदर्यशास्त्र / दर्शनशास्त्र / प्रज्ञावाद / न्यायवाद / शीलवाद / करुणावाद / समतावाद / स्वातंत्रवाद / बंधुतावाद / लोकशाही" इत्यादी विषयामध्ये आपली बांधिलकी कुठे आणि काय आहे ? *विद्येची देवी - सरस्वती* हिच्या बद्दलचा आपला ऐतिहासिक / वैज्ञानिक गमक आधार काय आहे ? बुध्द - आंबेडकरी साहित्यातील विद्रोह हा सकारात्मक असुन नकारात्मक नाही, ह्या मताशी आपण सहमत आहात काय ? अशी असंख्य प्रश्न आहेत. आणि ह्या प्रश्नाच्या उत्तराची प्रतिक्षा आहे.
सेवाग्राम (वर्धा) नगरीतील "अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन" अध्यक्षीय पदाच्या समारोपीय भाषणात *न्या. नरेंद्र चपळगावकर* ह्यांनी आपल्या स्व: - वेदना मांडतांना म्हटले आहे की, *"सरकारचा पैसा घेण्याऐवजी लोकबळावर ही सम्मेलने आयोजित करावे."* ह्या सुचनेला उपस्थित मंडळींचा मिळालेला भरघोस पाठिंबा, खुप काही बोलुन जात आहे. सम्मेलन अध्यक्षांनी त्यांच्या उदघाटन भाषणात हा विचार कां बरे मांडलेला नाही, हे महत्वपुर्ण आहे. कारण मुख्यमंत्री *एकनाथ शिंदे*, उपमुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस*, केंद्रीयमंत्री *नितिन गडकरी* ही मान्यवर साहित्य सम्मेलनात आल्यानंतर, सम्मेलन अध्यक्ष *न्या. नरेन्द्र चपळगावकर* ह्यांना ही सम्मेलनात प्रवेश घेतांना पोलिसांनी अडविणे, हा अपमान वाटला. आणि समारोपीय भाषणात सदर उल्लेख, हे बोलणे मोठे कारण झाले. नाही तर साहित्य सम्मेलन आयोजक हे *"साहित्य सम्मेलन"* आयोजित करतांना, राजकारणी मंडळीकडे सम्मेलनाला पैसा मिळावा म्हणून अक्षरशः लोटांगण घालित असतात. आणि मग मात्र राजकारणी लोकांना आयोजित सम्मेलनात निमंत्रण देणे, हे आलेच..! प्रश्न आहे, तुम्ही आपल्या स्वबळावर सम्मेलने कां घेत नाहीत ? मग राजकारणी लोकांना निमंत्रित करण्याची कोणतीही गरज पडणार नाही. राजकारणी लोकांची साहित्याप्रति बांधिलकी काय आहे ? हा मोठा प्रश्न आहे. *"राजकारणी लोकांची औकात नसतांना मंचावर त्यांना नाचविणे ?"* हा प्रकार साहित्यिकांची बौध्दीक दिवाळखोरी म्हणता येईल. दुसरे म्हणजे ह्या राजकारणी लोकांनी ही आपली बौध्दीक पातळी ही तपासायला हवी. त्यांची साहित्यातील पात्रता काय ? *राजकारणी मंडळींना कोणत्याही मंचावर नाचण्याची ईच्छा असल्यास त्यांनी मग हातामध्ये बांगड्या आणि साडी नेसुन गेल्यास, उपस्थित लोकांची फार चांगली करमणुक होईल.* जसे तमाश्यात नाचा हा हे सर्व प्रकार करीत असतो.
मराठी ही केवळ प्रादेशिक भाषा आहे. मराठी भाषा हा विचार नाही. मग *"अखिल भारतीय मराठी साहित्य"* असे विशेषण लावण्याचा अट्टाहास कां आहे ? ही तर मुर्खताचं म्हणायला हवी. *"दुसरे म्हणजे कोणत्याही भाषेला विशेष साहित्याच्या परिघामध्ये अडकविणे,"* (जसे - मराठी साहित्य, हिंदी साहित्य, उर्दु साहित्य इत्यादी) ह्यावर संशोधन होणे फार गरजेचे आहे. सदर सम्मेलनाविषयी अजुन बरेच काही लिहिता येईल. प्रश्न आहे की, *"सदर होणा-या / झालेल्या साहित्य सम्मेलनाचे आऊट पुट काय आहे ?"* काय मराठी भाषा ह्या तथाकथित पांढरपेशी मंडळींनी जिवंत ठेवली आहे काय ! खरे तर मराठी भाषा ही ग्रामिण तसेच साधारण वर्गातील लोकांनी जिवंत ठेवलेली आहे. ह्या तमाम पांढरपेशा वर्गातील पिढी वंशावळ नेहमी इंग्रजी / हिंदी भाषेचा प्रयोग करणारी दिसुन येईल...! ह्या पांढरपेशा वर्गाचे मराठी भाषा प्रसार - प्रचार योगदानाचे मोजमापन होणे, गरजेचे झाले आहे.
आता *"अखिल भारतीय विद्रोही साहित्य सम्मेलन"* संदर्भात लिहिणे, हे फार गरजेचे झाले आहे. महत्वाचा प्रश्न आहे की, ह्या साहित्यिक मंडळीचा विद्रोह हा काय आहे ? *"काय ह्या विद्रोही साहित्यिकांचा विद्रोह हा सकारात्मक आहे ?"* काय ह्या विद्रोही साहित्यिकांनी परंपरावादी विचार नाकारले आहेत ? कुठल्याही गोष्टीचा नकारात्मक विद्रोह ठेवुन चालणार नाही. *"बुध्द - फुले - आंबेडकर ह्यांचा विद्रोह हा नकारात्मक विद्रोह नव्हता,"* हे समजुन घेणे फार गरजेचे आहे. ह्या विद्रोहीवाद्यांनी उदगीर नगरीच्या १६ व्या विद्रोही साहित्य सम्मेलनात *"जातीव्यवस्थेच्या उतरंडीचे प्रतिक म्हणुन मडकी फोडुन सम्मेलनाचे उदघाटन केले."* आता वर्धा नगरीतील १७ व्या विद्रोही साहित्य सम्मेलनाचे *"भेदाभेद मानसिकता असलेल्या प्रतिकात्मक कुलुपबंद मेंदुचे कुलुप उघडुन उदघाटन केले."* इतकेच नाही तर "अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन" आयोजकांनी *"ग्रंथ दिंडी"* काढुन आणि डोक्यावर *"शेंदरी टोप्या"* घालुन धर्मांधी विचाराची कास धरलेली होती. अगदी त्याचप्रमाणे *"अखिल भारतीय विद्रोही साहित्य सम्मेलन"* घेण्या-या तमाम आयोजकांनी *"विचार यात्रा"* काढुन आणि डोक्यावर *"पांढ-या गांधी टोप्या"* घालुन गांधीवादाची कास धरलेली होती. मोहनदास गांधी हे *"मानवता - समानता - विषमता"* ह्या विचारांच्या विद्रोहाचे खरे प्रतिक आहेत काय ? मग मराठी साहित्यिक / विद्रोही साहित्यिक ह्यांच्यातील वैचारिक भेद आपण काय समजायला हवा ? हा अगदी फार मोठा प्रश्न आहे. विद्रोही साहित्यवांद्याचा मराठी साहित्य सम्मेलनाला फक्त नाटकिय विरोध दाखवुन, स्वत:च्या नावे प्रसिद्धीची पोळी शेकणे, असा हा प्रकार वाटतो. सदर विद्रोही सम्मेलनात ईहवादी साहित्यिक *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांच्या ही नावाचा निमंत्रित पाहुण्यात उल्लेख होता. तसे बघता यशवंत मनोहर हे फार *"अफलातुन प्राणी"* आहेत. कट्टर जातीयवादी *गिरिश गांधी* ह्यांच्या समन्वयातुन त्यांचा प्रवास होत आला आहे. मराठी साहित्य सम्मेलनात *गिरिश गांधी* ह्यांनी सल्लागार म्हणुन सक्रिय भुमिका पार पाडलेली आहे. तसे बघता गिरिश गांधी हृयांची भुमिका ही मात्र *"सांस्कृतिक डॉन"* म्हणुन दिसुन येते. विद्रोही साहित्यिकांना *"बुध्द - फुले - आंबेडकर - संविधान"* मान्य आहे काय ? जर मान्य असेल तर, जुनाट परंपरा सोडुन ते संविधानाची कास धरणार काय ? *"बुध्दाचा मानवतावादी धम्म हा स्विकार करणार काय ?"* हा सुध्दा प्रश्न आहे. हे जर मान्य नसल्यास तमाम तथाकथित विद्रोहीवाद्यांनी *"विद्रोही विचार"* भुमिका ही सोडलेली बरी...!!!
ईहवादी / भोगवादी /ललितवादी / अभिजनवादी / तथाकथित विद्रोहवादी / सर्वजनवादी इत्यादी प्रकारात वावरणारे साहित्यिक न्या. नरेन्द्र चपळगावकर / श्रीपाल सबनीस / भारत सासणे / कौतुकराव ठाले पाटील / प्रा.उषा तांबे / उज्वला मेहेंदळे / प्रकाश पागे / प्रदिप दाते / प्रा. मिलिन्द जोशी / डॉ. स्मिता वानखेडे / डॉ. रविंद्र शोभणे / दामोधर मावजो ही साहित्यिक असो वा तथाकथित विद्रोही साहित्यिक चंद्रकांत वानखेडे / गणेश विसपुते / रसिका आगाशे - अय्युब / डॉ. अजिज नदाफ / डॉ. प्रल्हाद लुलेकर इत्यादी तमाम साहित्यिकांनी *बुध्द - आंबेडकरी साहित्य"* संदर्भात आपला दृष्टिकोण स्पष्ट करणे, हे गरजेचे आहे. मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष *न्या. नरेंद्र चपळगावकर* ह्यांनी विद्रोही साहित्य सम्मेलनाला भेट देणे / विद्रोही साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष *चंद्रकांत वानखेडे* ह्यांनी आपल्या जागेवरुन उठुन, न्या. नरेंद्र चपळगावकर ह्यांचे स्वागत करुन प्रेम गळाभेट घेणे, आणि मिडियाने ती बातमी फोकस केली. अर्थात नरेंद्र चपळगावकर हे आपला प्रभाव पाडुन गेले आणि आपल्या समारोपीय भाषणात सिनेमा लेखक / निर्देशक *नागनाथ मंजुळे* ह्यांचा उल्लेख करुन, विद्रोह वादी साहित्यिक संदर्भात त्यांनी *"आपसातील मतभेदांच्या भिंती आपोआप वितळु द्या"* हे शब्द ते बोलुन गेले. प्रश्न हा आहे की, विद्रोही साहित्य सम्मेलन अध्यक्ष *चंद्रकांत वानखेडे* हे जर अचानक *"मराठी साहित्य सम्मेलनात"* गेले असते तर, वानखेडे ह्यांना तसा सन्मान मिळाला असता काय ? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, *"तथाकथित पांढरपेशी वर्ग हा मराठी साहित्यातील आपली मक्तेदारी सोडणार आहेत काय ?"* मराठी ईहवादी / भोगवादी / ललित साहित्यिक हे ईहवादी - *डॉ. यशवंत मनोहर* (बुध्द - आंबेडकरी साहित्यिक नाही) ह्यांना आपला वर्गश्रेणीचे स्विकारतात काय ? तसे बघता *प्रा. यशवंत मनोहर* हे तमाश्यातील साडी घातलेल्या नाच्याप्रमाणे, कुठल्याही मंचावर नाचतांना दिसुन येतात. बुध्द - आंबेडकरी साहित्यिक नसणारे / माजी सनदी अधिकारी *इ. झेड. खोब्रागडे* हे सुध्दा तमाशातील नाच्याप्रमाणे कोणत्याही मंचावर नाचतांना दिसतात. प्रश्न असा की, तुमची बांधिलकी काय आहे ?
अलिकडे *"बुध्द - आंबेडकरी साहित्य"* क्षेत्रातील काही मंडळींना, *"तमाशातील साडी घातलेल्या नाच्या"* प्रमाणे विविध मंचावर नाचण्याच्या व्याधीने ग्रासल्याची काही लक्षणे दिसुन येत आहे. प्रज्ञा दृष्टीचा अभाव दिसुन येत आहे. आपण आपल्या आयोजित सम्मेलनात कुणाला बोलावतो, ही प्रज्ञा दृष्टी पुर्णत: लोप झाल्यामुळे, *बुध्द - आंबेडकरी साहित्य"* संदर्भात आपल्याला नव्याने *"विचार आणि समिक्षा"* ही करावी लागणार आहे. जर आपण ह्या संदर्भात सखोल विचार आणि समिक्षा केली नाही तर, भविष्यात बुध्द - आंबेडकरी साहित्य हे एका वेगळ्याचं वळणावर जाण्याची जास्त संभावना आहे. बुध्द - आंबेडकरी साहित्य क्षेत्राला तो धोका आहे, असे ही म्हटल्यास ती अतिशयोक्ती नाही. गांधी विचारवादी साहित्यिक - *रावसाहेब कसबे / प्रा. हरी नरके* / दलित साहित्यिक *शरणकुमार लिंबाळे* / वादीहिन कवि *लोकनाथ यशवंत* / समाजशास्त्र प्राध्यापक आणि माझा जिवलग मित्र *डॉ. प्रदिप आगलावे* (आंबेडकरी साहित्यिक म्हणावे काय ? कारण त्याचे समाजशास्त्रीय लिखाण हे कट आणि पेस्ट पध्दतीचे असल्याने) ह्यांच्या विचार आणि कृती संदर्भात नव्याने विचार करणे, हे गरजेचे आहे.
* * * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment