Thursday, 2 March 2023

 🌹 *हे चाफां तु फुलला...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* 

        मो.न. ९३७०९८४१३८


हे चाफां तु फुलला नि मनात बसला

बुध्द निसर्गी रोमा रोमात रे तु शिरला...


मोगरा सुंगधा संगे राजा गुलाब फुलला

चाफां हसुनी जास्वंदा तो हळुच वदला

उंच उडानाच्या ह्या गुलमोहरी मनाला

असु द्या लहान जरी दु:ख नसे मजला...


सदाफुलीच्या ह्या श्वेत जामुनी रंगाला

छटा रंगाचा गुलाब मित्र पण जाहला

आसवे देण्या-या संत्रा मनाच्या सालेला

प्रेम देणारा हा फुलांचा वादीचा फुलला...


रात-राणी वेलीच्या ह्या सुंगंधीत मनाला

निशीगंधा - आम्र बहरांचा साद लाभला

प्रात: आर्त देणा-या कोंबड्यांचा नादाला

मोर पिसारांचा माझा विश्वास हा जागला...


* * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment