Monday, 6 March 2023

 🌹 *हे सखी तु...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* 

        मो.‌ न.‌ ९३७०९८४१३८


हे सखी तु कुठे लपली गं आता

चलं बुध्द विहारा जावु या आपण...


हे ओथंबलेल्या मधु ओठांना ह्या 

फुल गंधाचा सुख आस्वाद देवु या

ह्या उंच पहाडी शिखरी सौंदर्याला

आनंद जिवना मित्र करु या आपण...


ह्या जगी पाण्यातील दृष्ट मगरीला 

आभासी चकव्यांचा मारा देवु या

सुंदर अशा फुल झाडांच्या संगतीने

मधु संगिताचे गीत गावु या आपण...


रानातील कस्तुरी मृगी धावण्याचा

आपला मनोरा इतिहास घडवु या

हे आम्र वनाच्या त्या आम्रपालीला

देशभक्ती मना नाद सांगु या आपण...


* * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment