Wednesday, 15 March 2023

 🫀 *हृदया स्पंदन आले...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* 

        मो. न. ९३७०९८४१४८


फुलांच्या गंधात हृदया स्पंदन आले

विश्व शांतीचे युग बुध्द कोरुनी गेले...


भुंग्यानी फुलपाखरा संगे संवाद केले

फुल कणांचा अधिकार सांगुनी आले

मग आपसी विवाद ते विसरुनी गेले

बुध्द न्याय साक्ष आम्हा कळुनी आले...


पंख अश्व शक्तीने नभात प्रयाण केले

हवेच्या झोकानी ढग रे फिरता झाले

नभी तारकांनी हसता हे स्वागत केले

बुध्द प्रेम भाव संगिताचे गायन झाले...


पाखरी थव्यांचे नभी सम्मेलन झाले

थवा उडता आम्हा एकी सांगुन गेले

मुक्या बोलीत चिव‌ चिव ठराव केले

बुध्द संघ शक्तीची जाण करुन आले..


* * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment