Friday 9 June 2023

 👌 *जीवनातील सत्य...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो.न. ९३७०९८४१३८


जीवनातील सत्य 

प्रेमानी बोललेले दोन शब्द

मैत्री करुन जाते

आणि अति तिथे माती

हे समजुन घेणे 

आपल्याला गरजेचे आहे.

कधी कधी

आपण खुप हुशार आहोत

म्हणुन ती व्यक्ति

मागचा पुढचा विचार न करता

कोणतेही पाऊल उचलते

आणि भविष्यातील

मोठी चुक करून‌ जाते

खुप काही गमावुन‌ बसते.

कधी कधी तर

केलेली एक चुक ही

सुधारणे कठिण होवुन बसते

आणि ती केलेली चुक

कायमचींचं

मनाला भिडलेली असते

ती आठवण राहुन‌ जाते.

पण हे सुध्दा सत्य आहे

अति शहाणपण करणारे

लोकांना फसविणारे

आतल्या गाठीचे

खोटे बोलणारे

अशी माणसे 

कधीच मोठी होत नसतात

ती नामशेष असतात

काळाच्या पडद्याआड जातात

त्यांचा इतिहास नसतो.

कारण इतिहास हा

प्रामाणिक, सत्य बोलणारे

समर्पित, त्यागी 

चांगली कामे करणारे

धम्मनिष्ठ

अश्या लोकांंचाचं

लिहिला जात असतो.

म्हणुन‌ बुध्द हे

सत्याची कास धरायला

आपल्याला सांगतात

खोटे बोलु नये

असा उपदेश‌ देतात

हे उगीचचं नव्हे...!!!


* * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक १० जुन २०२३

No comments:

Post a Comment