Sunday 5 March 2023

 ✒️ *जळगाव मध्ये २ - ३ एप्रिल रोजी होणा-या बौध्द साहित्य सम्मेलन अध्यक्ष पद प्रा. यशवंत मनोहर ह्यांना देण्याचा निषेध म्हणुन‌ साहित्य सम्मेलन समन्वय अध्यक्षीय पदाचा राजीनामा...!* (भाग २)

    *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर

    माजी अध्यक्ष, बौध्द साहित्य सम्मेलन समन्वय समिती जळगाव

   मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


      जळगाव मध्ये २ - ३ एप्रिल २०२३ रोजी होण्या-या *"बौध्द साहित्य सम्मेलन अध्यक्ष"* ह्या पदावर ईहवादी साहित्यिक (आंबेडकरी - बौध्द साहित्यिक नाही) *प्रा. यशवंत मनोहर* ह्यांची निवड ही *"बौध्द साहित्य सम्मेलन समन्वय समितीच्या"* पदाधिकारी वर्गाची कोणतीही सभा न घेता केलेली असल्यामुळे, आणि *प्रा. यशवंत मनोहर ह्यांच्या घरी गौरी - गणपती ह्याचे बसणे - ती पुजली जात असल्यामुळे,* तसेच त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यक्रमात *"श्रध्दा - अंधश्रध्दा ह्या दोन्ही एकचं आहेत"* असे विधान केल्यामुळे त्या संदर्भात बौध्द धर्माची *"प्रज्ञा प्रणित श्रध्दा"* ह्याबद्दल प्रा.‌ यशवंत मनोहर विरोधात मी लिहिलेला संदर्भ लेख ह्यापुर्वीच मिडियामध्ये प्रकाशित झालेला आहे. तरी पण सदर श्रध्दा विषयावर थोडे भाष्य करणार आहे. ह्याशिवाय यशवंत मनोहर ह्यांची बांधिलकी कधी कार्ल मार्क्स तर कधी केशवसुत ही राहिलेली असल्यामुळे, कट्टर जातियवादी *डॉ. गिरिश गांधी* ह्यांच्या समन्वयातील कार्यक्रमात यशवंत मनोहर ह्यांची भागीदारी जाहिर असल्यामुळे, सदर *"बौध्द साहित्य सम्मेलन समन्वय समितीचा मी स्वत: अध्यक्ष"* असल्यामुळे, आयोजन समितीला तातडीची सभा घेवुन अध्यक्ष म्हणुन *डॉ. यशवंत मनोहर* आणि उदघाटक म्हणुन *आनंदराज आंबेडकर* (बौध्द - आंबेडकरी साहित्यिक नाहीत) ह्या मान्यवरां ऐवजी आपण दुस-या कोणत्याही वरिष्ठ साहित्यिक मान्यवरांना निमंत्रीत करण्यात यावे, सदर संदर्भातील माझा लेख हा मिडियामध्ये २७ फेब्रुवारी २०२३ ला प्रकाशित झालेला आहे. आता काही संदर्भीत महत्वाच्या विषयावर बोलु या.

     सदंर्भीत माझा लेख मिडियात प्रकाशित झाल्यामुळे बौध्द साहित्य सम्मेलन जळगाव आयोजक *प्रा. शुक्राचार्य गायकवाड / प्रा.‌ भरत सिरसाट* उभयतांनी *"बौध्द साहित्य सम्मेलन समन्वय समितीची"* तातडीची पहिलीच ऑनलाइन सभा दिनांक ४ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेली होती. सदर सभा घेतांना प्रोटोकालचे पालन करण्यात आलेले नाही. सभेच्या कोरम (?) संदर्भात नोटीसमध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही. *प्रोटोकाल नुसार त्या समन्वय समितीचे अध्यक्ष हेच सभेचे अध्यक्ष असायला हवे होते.* परंतु सभेची अध्यक्षता मात्र *"बौध्द साहित्य प्रचार संस्था"* अध्यक्ष आणि स्व-आयोजक *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांनी स्वत:च केली. असो, ते ही चालेल...! पदाची असणारी लालसा !!! वा जास्त भिती असावी. *"समन्वय समितीच्या अध्यक्षांनी अलग निर्णय दिला तर...?"* आता आपण *"कोरम"* बाबत बोलु या. संदर्भीत समन्वय समितीच्या व्हाट्सएप ग्रुपवर सदर समन्वय समितीचे *"एकुण ७३ सदस्य संख्या"* आहे. अर्थात नियमानुसार मिटिंगंचा कोरम पुर्ण व्हायला *"२५ सदस्य"* असणे गरजेचे होते. परंतु घेतलेल्या ऑनलाइन मिटिंगला *"फक्त १५ सदस्य"* हजर होते. तेव्हा नियमानुसार सदर सभा ही घेता येत नाही. ठिक आहे, हे ही चालेल...! *प्रा. भारत सिरसाट* ह्यांनी प्रास्ताविक करुन संस्था आणि सम्मेलन घेण्याबाबतची भुमिका मांडली. *"समन्वय समितीचे अधिकार - कार्य काय आहेत ? हे पहिल्यांदाच सदर सभेत मात्र मौखिक त्यांनी सांगितले."* सदर समितीचे अधिकार - कार्य ठरविणारा *"बौध्द साहित्य प्रचार संस्था"* ह्यांनी घेतलेला सदर लेखी ठराव कधीही समन्वय समिती अध्यक्ष - सदस्यांना दिला गेला नाही. सदर ग्रुपवर पोष्ट केला गेलेला नाही. *जर सदर संस्था पदाधिकारी ही "बौध्द साहित्य सम्मेलन" घेण्यास सक्षम होती तर, सदर समन्वय समिती स्थापन करण्याचा उद्देश काय ?* हा मुख्य प्रश्न आहे. जर समन्वय समिती ही स्थापन केली गेलेली आहे आणि संस्थेत कार्यरत सर्वच पदाधिकारी सदर समन्वय समितीचे हे जर सदस्य (असल्यास) आहेत तर, *"बौध्द साहित्य सम्मेलन"* घेण्याची जबाबदारी ही आपसुकचं समन्वय समितीची असणारी आहे. *"सम्मेलनाचे धोरणात्मक निर्णय हे समन्वय समिती द्वारा घेणे, हे गरजेचे झाले आहे."* समन्वय समितीच्या सभा ह्या आयोजकानी नियमित घ्यायला हव्या होत्या. परंतु ह्या नियमाचे ही उल्लंघन झालेले आहे. आणि *सम्मेलनाचे अध्यक्ष / उदघाटक ठरविणे हे सुध्दा आलेचं.* तेव्हा असा कुठलाही निर्णय झालेला नसल्यामुळे *प्रा. यशवंत मनोहर / आनंदराज आंबेडकर* ह्यांना निमंत्रीत केलेला एकतर्फा निर्णय हा अवैध ठरतो. आता ४ मार्च रोजी झालेल्या सभेबाबत बोलु या. एकतर सदर सभा ही कोरम नसल्यामुळे घेता येत नाही. दुसरे म्हणजे सभेत *"धोरणात्मक निर्णय / अध्यक्ष - उदघाटक कुणाला बोलवावे,"* ह्याबाबत मतदान घेण्यात आलेले नाही. *उपस्थित असलेल्या १५ सदस्यापैकी फक्त प्रा.‌गायकवाड / प्रा. सिरसाट / दोन सदस्य* (एकुण ४) ह्यांनीचं फक्त प्रा. यशवंत मनोहर आणि आनंदराज आंबेडकर ह्यांना बोलवावे, असे मत हे प्रदर्शित केले. अन्य उपस्थित ११ सदस्यांनी त्याला पाठिंबा आहे, हे मत प्रदर्शीत केलेले नाही. आता मी सदर सभेत मांडलेल्या विचाराकडे येतो.

      समितीच्या सदर झालेल्या आभासी सभेत (Online) मी माझे विचार स्पष्टपणे मांडतांना म्हणालो की, *"बौध्द साहित्य हे आभासी विचाराचे साहित्य नाही. बौध्द साहित्य हे मानवी विचाराचे, मानव उत्थानाचे, समानतेचा विचार देणारे साहित्य आहे. प्रज्ञा - शील - करुणा, स्वातंत्र - समता - बंधुता विचाराचे साहित्य आहे. आरसा हा आभासी प्रतिबिंबाचे प्रतिक आहे. आम्हाला ह्या आभासी विचारापासुन दुर राहायचे आहे.  बौध्द साहित्य ही सांस्कृतिक चळवळ नाही. तर ती कृतिशील चळवळ आहे."* हे बोलतांना मी प्रा. यशवंत मनोहर / आनंदराज आंबेडकर मान्यवर बौध्द साहित्य सम्मेलनात कां नसावीत, हे सुध्दा बोललो. आपल्याकडे बरीच अशी वरिष्ठ साहित्यिक / विचारवंत आहेत. *डॉ. अरविंद आलोक (दिल्ली) / डॉ. सी. डी. नायक (माजी कुलगुरु, महु) / डॉ. आर. एस. कुरील (माजी कुलगुरु, महु) / प्रेमानंद गज्वी / डॉ. शशीकांत लोखंडे / शिवा इंगोले / ज. वि. पवार / प्रा. आनंद देवडेकर / प्रा. दामोधर मोरे (ही सर्व मुंबई) / ताराचंद्र खांडेकर / इ. मो. नारनवरे / धनराज डाहाट / नाटककार - प्रभाकर दुपारे / नाटककार - दादाकांत धनविजय*  (ही नागपूर) अजुन बरीच वरिष्ठ साहित्यिक आहेत. तुम्ही म्हणाल तर, मी स्वत: येत्या तिन - चार दिवसात ह्या सर्वचं आयोजनाची मदत करतो. अजुन बरेच काही मार्गदर्शन सभेत केले. *शुक्राचार्य गायकवाड ह्यांना त्यांच्याबाबत मला आंबेडकरी बौध्द साहित्यिक (?)* ही पोष्ट आल्याचेही मी सदर सभेत सांगितले. परंतु प्रा. शुक्राचार्य गायकवाड / प्रा. सिरसाट ह्या द्वयांनी मला माझा प्रा. यशवंत मनोहर ह्यांचा विरोध मागे घ्यावा, ही विनंती केली. सदर सम्मेलनात माझा सन्मान होईल, असे ही ती मंडळी मला बोलली. तेव्हा मी माझ्या सामाजिक बांधिलकीसी तडजोड करणार नाही. आणि *"मी स्वत: ह्या बौध्द साहित्य सम्मेलन समन्वय समितीच्या अध्यक्ष पदापासुन बाहेर पडत असल्याचे"* माझा निर्णय दिला. आयोजन समितीने घेतलेला निर्णय हा कायदेशीर अवैध असल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेल्यास अडचणी वाढवणा-या आहेत. तेव्हा ही बाब आयोजकानी समजुन घ्यायला हवी.

      *प्रा. डॉ. यशवंत मनोहर*  हे अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या भाषणात म्हणतात की, *"श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात काहीही फरक नाही. तर्काला मुठमाती दिल्यावर श्रध्दा जन्माला येते. आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रध्दा जन्माला येते. श्रध्दा आणि अंधश्रध्दा ही तर्क, विज्ञान तसेच बुध्दीप्रामाण्यवादाला मानत नाही. त्यामुळे दोन्ही एकचं आहेत...!"* सदर भाषणात प्रा. मनोहरांनी *"मुठमाती आणि हत्या"* ह्या दोन शब्दांचा शब्दच्छल केलेला  दिसुन येतो. प्रश्न इथे आहे की, *मुठ माती* आणि *हत्या* ह्या दोन शब्दात फरक काय?  तसे बघता दोनही शब्द समानार्थी आहेत. यशवंत मनोहर हे प्राध्यापक आहेत म्हणुन ते विद्वान आहेत, ह्या भ्रमात त्यांनी राहु नये. आता *"श्रध्दा"* ह्या विषयावर चर्चा करु या. *सुत्तनिपात* ग्रंथामध्ये *"कसिभारद्वाज सुत्त"* ह्यातील बुध्द आणि कसिभारद्वाज शेतकरी ह्यांच्या संभाषणाकडे मी आपले लक्ष केंद्रीत करतो. प्राचिन मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाळा गावातील ही घटना. कसिभारद्वाज नावाचा एक शेतकरी हा आपल्या शेतात ५०० नांगर चालवुन पिकांची पेरणी करीत होता. अगदी त्यावेळी तथागत हे भिक्षाटनाकरिता जात होते. तेव्हा कसिभारद्वाज नावाचा ब्राम्हण भगवान बुध्दाला म्हणाला, *"हे श्रमण, मी नांगरतो, पेरतो आणि माझा उदारनिर्वाह करीत असतो. त्याप्रमाणें तु सुध्दा शेती करुन उदारनिर्वाह कर. भिक्षा मागण्यात काय अर्थ आहे."*  त्याला उत्तर देतांना बुध्द एक गाथा म्हणतात -

"सध्दा बिजं तपो वुट्ठि, पञ्ञा मे |

हिरि ईसा मनो योत्तं, सति मे फालपाचनं ||

कायगुत्तो वचिगुत्तो, आहारे उदरे यतो | 

सच्चं करोति निद्दानं, सोरच्चं मे पमोचनं ||

विरिय मे धुरधोरय्हं, योगख्खेमाधिवाहनं |

गच्छति अनिवत्तन्त, यत्थ गन्त्वान सोचति ||"

* अर्थ : - *श्रध्दा हे माझे बी आहे. तपश्चर्या ही वृष्टी, प्रज्ञा हा जु आणि नांगर, पाप - लज्जा हा इसाड, चित्त ही दोरी, आणि स्मृती (जागृती) हा फाळ व चाबुक आहे. काय आणि वाचेचे मी सरंक्षण करतो. उदार-निर्वाहाच्या आहारात मी संयमित असतो. सत्य हे माझे निंदण आहे. आणि संतोष ही माझी सुट्टी आहे. तसेच धुरा वाहणारा माझा उत्साह योगक्षेमाभिमुख (निर्वाणाभिमुख) जातो व तेथे गेल्यावर तो परत येत नाही. तो शोकरहित होतो.*

     तसेच *"बुध्द साहित्या"* मध्ये *"श्रध्दा"* संदर्भात अजुन काही गाथा आहेत -

"सध्दा बन्धति पाथेयं |" (सयुंक्त निकाय)

* अर्थ :- *श्रध्दा ह्या गुणामुळे आपसुकचं दुसरे ही गुण हे सोबत येत असतात.*

"सध्दा साधु पतिट्ठिता |" (संयुक्त निकाय)

* अर्थ :- *सुप्रतिष्ठित अशी श्रध्दा ही फार कल्याणकारी आहे.*

" सुखा सध्दा पतिट्ठिता |" (धम्मपद/ना.वग्ग)

* अर्थ :- *स्थिर श्रध्दा ही सुखकारक आहे.*

"सध्दा वित्तं पुरिसस्स सेट्ठं |" (सं. निकाय)

* अर्थ :- *श्रध्दा ह्या लोका (संसार) त पुरुषाचे श्रेष्ठ धन आहे.*

* सध्दा दुतिया पुरिस्स होति | (सं. निकाय)

* अर्थ :- *श्रध्दा हेच दुसरे (मित्र) पुरुषचं आहे.*

* पामोज्जबहुलो भिक्खु पसन्नो बुध्दसासने |

अधिगच्छे पदं सन्तं सख्ङारुपसमं सुखं ||

(धम्मपद)

* अर्थ :- *बुध्द शासनावर श्रध्दा ठेवणारा, प्रसन्नोचित भिक्खु हा सर्व संस्काराचे उपशमन करुन सुखस्वरुप शांत पदाला प्राप्त होतो.*

* सध्दो सीलेन सम्पन्नो यसोभोगसमप्पितो |

यं यं पदेसं भजति तत्थ तत्थेव पुजितो || (धम्मपद)

* अर्थ :- *श्रद्धावान, शीलवान, यशस्वी, सम्पन्न व्यक्ती हा जिथे जिथे जातो, तेव्हा तेव्हा तो सत्कार प्राप्त करतो.*

    बुध्द साहित्य असो की बुध्द कृतीशील भाव असो, त्यामध्ये *"श्रध्दा"* ह्या भावाला अनन्य साधारण महत्व आहे. आणि आता महत्वपुर्ण प्रश्न असा की, *"भगवान बुध्द ह्यांना अभिप्रेत असणारी अशी श्रध्दा कोणती ? "* भगवान बुध्दाला *"प्रज्ञायुक्त श्रध्दा"* अभिप्रेत आहे. प्रज्ञा म्हणजे विशुध्द असे ज्ञान. प्रज्ञेमुळे व्यक्ती हा परिशुध्द होत असतो. प्रज्ञापुर्वक आचरण करणा-यांचे जीवन हे श्रेष्ठ मानले जाते. प्रज्ञेचे श्रृतीमयी, चिंतनमयी आणि भावनामयी हे तिन प्रकार आहेत. प्रज्ञेच्या ह्या तिन प्रकारावर सविस्तर चर्चा पुढे कधी तरी करु या. *"श्रध्दा"* ह्या उदात्त भावाचा संदर्भ देवुन (जरी श्रध्दा ह्या शब्दाचा उल्लेख नसला तरी) *"बुध्द वचन"* संदर्भ देतो. माणसांच्या नित्य असणा-या *"समस्यांचे निवारण"* करण्या संदर्भात बुध्दाला काही प्रश्न विचारण्यात आले. ते प्रश्न -

"अन्तो जटा बहि जटा, जटाय जटिता पजा |

तं तं गोतं च पुच्छामि, को इमं विजटये जटं ||"  (विशुध्दीमग्ग)

* अर्थ :- *ह्या संसारात अंतर्गत आणि  बहिर्गत अश्या समस्यांचे निवारण कोण करु शकतो..?*

     ह्या प्रश्नाला उत्तर देत असतांना तथागत बुध्द म्हणतात - *(कारण ह्यामध्ये श्रध्देचा भाव दिसुन येतो.)*

"सीले पतिट्ठायो, नरो सम्पञ्ञो चित्तं पञ्ञंच भावयं |

आतापि निपको भिक्खु , सो इमं विजटयं जटं ||"   (विशुध्दीमग्ग)

* अर्थ :- *जो व्यक्ती शीलावर प्रतिष्ठीत होतो, संपन्नशील आहे, जो चित्त आणि प्रज्ञेची भावना करतो, असा उद्दोगशील भिक्खु हा त्या सर्व समस्यांचे (संसाराचे / लोकांचे) निवारण करु शकतो...!*

     *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* ह्या मी राष्ट्रिय अध्यक्ष असलेल्या संघटनेच्या वतीने ब-याच *"जागतिक बौध्द परिषदा"* आणि  *"अखिल भारतीय आंबेडकर विचार परिषदा"* चे तसेच *"जागतिक बौध्द महिला परिषद २०१५ / अखिल भारतीय आंबेडकरी विचार महिला परिषद २०२०"* चे आयोजन करण्यात आले.‌ सदर परिषदेत मी कोणत्याही राजकिय नेत्यांना माझ्या आयोजनातील धम्मपीठ / विचारपीठावर स्थान दिलेले नाही. सन २००६ ला *"पहिली जागतिक धम्म परिषद"* मी घेतलेली होती, तेव्हा रिपब्लिकन नेते स्मृतिशेष *रा. सु. गवई साहेबांचा* तसेच ब-याच मोठ्या नेत्यांचा मला फोन आला. सदर परिषदेचे निमंत्रण रिपब्लिकन नेते *रा. सु. गवई / रामदास आठवले* पासुन ब-याच मोठ्या मान्यवरांना दिले. पुरावा हवा असल्यास सदर निमंत्रण दिल्याचे बरीच फोटो माझ्या अल्बममध्ये आहेत. त्या सर्व मान्यवरांना परिषदेत स्वागत आहे, असे मी बोललो. परंतु मी आपणास धम्मपीठावर बसण्यास अनुमती देणार नाही, हे ही स्पष्ट बोललो. मी ब-याच *"विश्व शांती रैलीचे"* ही आयोजन केले आहे. आर्थिक विषयावर बोलायचे झाल्यास कार्यक्रम संपल्यानंतर सुट्टीच्या दिवसी संघटनेच्या सर्व पदाधिकारी वर्गाला (४० - ५० कार्यकर्ते) बोलावुन, आलेल्या खर्चाचा हिशोब देवुन व्हेज / नानव्हेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे. बरेचदा आर्थिक हिशोब *प्राचार्य डॉ. टी. जी. गेडाम* ह्यांनी सर्व पदाधिकारी वर्गासमोर सादर केलेला आहे. सदर माझ्या सफल मिशनचे शिलेदार *प्रा. वंदना जीवने / डॉ. किरण मेश्राम / सुर्यभान शेंडे / प्राचार्य डॉ. टी. जी. गेडाम / प्रा. डॉ. वर्षा चहांदे / डॉ. मनिषा घोष / डॉ. भारती लांजेवार / ममता वरठे / इंजी. माधवी जांभुळकर / डॉ. राजेश नंदेश्वर* इत्यादी बरीच मंडळी आहेत. ज्या काही मंडळींचे योगदान आहे, त्यांना विसरता कामा नये, ह्या विचाराचा मी आहे. अजुन महत्वाचे सांगायचे की, माझ्या आयोजनातील सम्मेलनात वक्तांना भाषण वेळेचे बंधन, प्रोटोकाल ह्याला मी जास्त महत्व देत असतो. ह्याबद्दल आलेल्या सर्व वक्त्यांना / माझ्या तमाम कार्यकर्ते वर्गाला विचारलेले बरे...!

       जळगाव नगरीतील सम्मेलन हे *"बौध्द साहित्य सम्मेलन आहे. बौध्द जन मन सम्मेलन‌ नाही."* तेव्हा समस्त महाराष्ट्रातुन जास्तीत जास्त वरिष्ठ - नवीनतम बौध्द - आंबेडकरी साहित्यिक इथे कसे सहभागी होतील ? हे आपले प्रमुख लक्ष असायला हवे. *"अस्मितादर्श साहित्य सम्मेलन* हे एक उदाहरण घेवुन जायला हवे. अध्यक्ष / उदघाटक / प्रमुख पाहुण्यांची साहित्याच्या प्रती प्रामाणिक बांधिलकी असायला हवी. *बाबासाहेब‌ आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा उल्लंघन करणारा साहित्यिक नसावा.* गावोगावी सभा घेण्याची इथे गरज नाही. हा वेळेचा अपव्यय आहे. मिडिया हे माध्यम गावापर्यंत मेसेज देत असतो. सदर सम्मेलन हे साहित्यिकांचे आहे. सामान्य लोक / शिक्षक वर्गाचे नाही, हे भान ठेवुन वाटचाल करायला हवी. अजुन बरेच काही लिहिता येईल. यशवंत मनोहर / आनंदराज आंबेडकर ह्यांच्या सोबत *धम्मपीठावर / विचारपीठावर* बसणे, हे मला तरी योग्य वाटत नसल्यामुळे मी *"बौध्द साहित्य सम्मेलन समन्वय समितीच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतुन मुक्त होत आहे."* ज्या साहित्यिक मित्रांना तरी ही सहभाग घ्यावयाचा, मिरवायचे आहे ? त्याबद्दल न बोललेले बरे ...!

जय भीम ....! नमो बुध्दाय .....!!!


* * * * * * * * * * * * * * * * * *

(नागपुर दिनांक ५ मार्च २०२३)

No comments:

Post a Comment