🌹 *फुलाचा गंधाचा तु...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
फुलाच्या गंधाचा तु आसमंत हो
हे बुध्दाच्या वारसाचा तु भीम हो...
आकाशाच्या रंगाचा तु ध्वज हो
तुझे मन अशोक गतीचे चक्र हो
प्रेम मैत्री करुणेचा तुझा नाद हो
अशांत जीवाला शांतीचा बुध्द हो...
सदाफुली फुलाचा तुझा साज हो
मोगरा मनाचा तुझा फुल गंध हो
ह्या गुलाब राजाचे तुझे सौंदर्य हो
सुटलेल्या गंधाचा रे तु सावन हो...
हे लव्ह बर्डचे तुझे निष्पाप रुप हो
कोयल आवाजी तुझे मधुर गीत हो
मयुर मनाचा तुझा असा पिसारा हो
हंस शुभ्रतेचा तुझा हा आवाज हो...
* * * * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक १६ जुलै २०२३
https://youtu.be/VOPfUWpbYyE
No comments:
Post a Comment