Friday, 28 July 2023

 🌾 *हे मोगरा गंधाचा...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपुर

        मो.न. ९३७०९८४१३८


हे मोगरा गंधाचा आसमंत हा निळा होवु दे

बुध्द पथाचे गुलाब मन ह्या जगात वसु दे...


दु:ख‌ वेदना वेलीला सुखाची भावना कळु दे

खोट्यांच्या जगाला सत्याचा प्रकाश मिळु दे

अज्ञानी ह्या मनाला सृष्टीची दृष्टी ही कळु दे

सत्याच्या मार्गाने निसर्ग चक्र जगी फिरु दे...


हे झोपलेल्या माणसाला आता जागे करू दे

ही वै-याची रात्र आहे हा त्यांना बोध होवु दे

दगा चोरी खुप झाली आता तरी बंद होवु दे

उद्याचा सुर्य हा आपल्या हक्काचा असु दे...


तुटलेल्या जीवाला आता आम्हा धीर देवु दे

माणसाला माणुसकीची रे खरी जाण होवु दे

तुफान वादळा रोकण्याची ही शक्ती मिळु दे

प्रेम मैत्री करुणेचा रे पंचशील रंग फुलवु दे...


* * * * * * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक २३ जुलै २०२३

No comments:

Post a Comment