🌞 *हे सखे तु उठवु नको गं...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
हे सखे तु उठवु नको गं मला पहाटेला
स्वप्नात बघतो मी माझ्या भीम बुध्दाला...
आतंकाच्या निद्रेत झोपल्या ह्या मनाला
उठवुन असा फायदा काय ह्या जगाला
हे देणे घेणे वाटेच्या ह्या उथळ जीवाला
लाजेची चिंता ना राहिली ह्या कुसाला...
हा सुर्य कात टाकुनी गेला आता अस्ताला
प्रकाश नाळ जुळली ह्या काळ्या युगाला
अंधा-या रात्री चंद्र गेला ह्या आडोश्याला
दिवस रात्रीचा खेळ झाला तो बाधिताला...
ह्या फुलांनी मैत्री जोडली रे प्रेम निसर्गाला
घोरपड पकड शक्ती नसे ह्या माणसाला
बोथट क्रांतीची धारा पेटणार ह्या उद्याला
यशाची गाणे गावु या भारताच्या समतेला...
* * * * * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक ११ जुलै २०२३
https://youtu.be/S8g0Ssee3X0
No comments:
Post a Comment