Wednesday, 5 July 2023

 🔥 *पाण्याच्या आगीतुन...!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर

       मो.न. ९३७०९८४१३८


पाण्याच्या आगीतुन घायाळ माणसाला

बुध्दाच्या गार झ-यातुन हा मार्ग जाहला...


तुटलेल्या तारकांच्या ह्या वेदना शक्तीला

रात‌ काजव्यांचा छोटा प्रकाश रे जाहला

हे उंच उडणा-या तिक्ष्ण दृष्टीच्या घारीला

पृथ्वी भ्रमणाचा हळुवार हा वेग बाधिला...


नभी चांदण्याच्या कोमल शीतल मनाला

सुर्य किरणांचा हा उष्ण प्रकाश दाहला

हे हसणा-या निष्पाप जीव फुलपाखराला

भुंग्याचा आवाजी हा विषाक्त दंश लागला...


विशाल निसर्ग चक्राच्या ह्या सत्य मनाला 

बुध्द विचाराचा हा क्रांती किनारा लाभला

मुक्त हवेत फिरणा-या ह्या सजिव नादाला

हे मधु प्रेम चंद्राचा सुखद ओलावा लागला...


* * * * * * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक ४ जुलै २०२३


https://youtu.be/5HBUYfCrtQ8

No comments:

Post a Comment