👁️ *मृदु लोचनांच्या...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
मृदु लोचनांच्या ह्या दु:ख वेदनेला
बुध्दाचा हवा फुंकर हे माणसाला...
ह्या आकाशाच्या निळ्या पहाटेला
सुर्य अंतरी हा दिसेनासा झाला
ना प्रकाशाचा गंध ह्या माणसाला
कस्तुरी मृग जगा नाहिसा झाला...
प्रेमाची गोड भाषा ह्या लोचनेला
आसवा गंधानी तो न्हावुनी आला
पाझर फुटुनी यावे ह्या दगडाला
सिंदुर फासु नको त्या माणसाला...
फुल गंधा हे निस्सिम प्रेम मनाला
दरवळुन टाकावे ह्या आसमंताला
एक हात जोडुनी हे एका हाताला
महाशक्ती बनवु अशा ह्या विश्वाला...
* * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक १० जुलै २०२३
https://youtu.be/r3cVPYEd_3Q
No comments:
Post a Comment