Sunday, 14 May 2023

 🧜‍♂️ *ह्या निसर्ग सानिध्यात...!*

*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* 

मो.न. ९३७०९८४१३८


ह्या निसर्ग सानिध्यात रमतांना

राना - वनात दिसणारे सौंदर्य

हिरवेगार झाडांची ती सावली

पक्षांचे असणारे किलबिल गाणे

पहाडाच्या शिखरावर बसुन

प्रेम आस्वाद देणारा फुल गंध

हवेची ती मन शुध्दता

मी आज ही शोधत असतो

ह्या शहरात, ह्या घरात

तो हरवला आहे असे वाटतं

शहरात केलेल्या कृत्रीम बगिच्यात

ह्या झुल्यावर बसुन 

त्या निसर्ग प्रेमाची आठवण करीत 

शब्द ओठावर येतांना

कविता प्रसव करुन जाते

माझ्या अंगणातील बुध्दाला

नित्याचे माझे वंदन असते

आणि मनातील एकचं ईच्छा असते

निसर्गातील तो आनंद

मला पुन्हा पुन्हा मिळु दे...!


* * * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक १४/०५/२०२३

No comments:

Post a Comment