✒️ *संविधान साहित्य (?) समजणारा आणि सम्मेलन घेणारा खुरापती कारटं - इ. झेड. खोब्रागडे (Retd. IAS)...!*
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
*सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* ह्या माझ्या संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष - मिलिन्द धनवीज ह्यानी मला दिनांक ३१ मे २०२३ रोजी *भामरागड* जिल्हा गडचिरोली येथे होणा-या *"दुस-या भारतीय संविधान साहित्य सम्मेलन"* कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठविली. कारण नागपुर शहरातील दीक्षाभूमी पावन स्थली दिनांक ८ - ९ जुन २०१९ रोजी झालेल्या *"पहिल्या भारतीय संविधान साहित्य सम्मेलन"* कार्यक्रमाला, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल ह्या संघटनेने तिव्र विरोध केलेला होता. आणि सदर (?) साहित्य सम्मेलनाच्या विरोधात मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ नागपूर येथे *डॉ. मिलिन्द पं. जीवने* विरूध्द *संविधान फाऊंडेशन* नागपूर (इ. झेड. खोब्रागडे एवं रेखा खोब्रागडे) *याचिका क्र. ३९४०/२०१९* दाखल केलेली होती. त्यावेळी *न्या. आर. के. देशपांडे / न्या. विनय जोशी* ह्या विद्वत द्वय न्यायामुर्ती महोदयांनी *"The ground of challange is that the literature can be obscene also, and therefore, there should be prevention on holding such program, is purely hypothetical and imaginary. Apart from this, we do not find any fundamental right in favour of the petitioner or any fundamental duty cast, which can be enforced by way of filling Writ Petition under article 226 of the Constitution of India. Writ petition is, therefore dismissed."* उपरोक्त कारण सांगुन सदर याचिका डिसमिस केली. न्यायामुर्ती द्वयांच्या उपरोक्त कारणामुळे काही प्रश्न (?) उपस्थित होतात.
*Fundamental Rights* (मुलभुत अधिकार) म्हणजे काय ? आणि भारतीय संविधानातील *अनुच्छेद १२ ते ३५ ह्या संदर्भात* विचार करतांना, संविधानाची अवहेलना होत असतांना, आपण भारतीय नागरीकांनी गप्प राहावे काय ? संविधानाचे रक्षण करणे, हे प्रत्येक भारतीय नागरीकांचे कर्तव्य नाही काय ? भारतीय संविधानाची *"प्रास्ताविका"* आपणास काय संदेश देते ? संविधानाच्या प्रास्ताविकेतील *"राष्ट्राची एकता आणि एकात्मता"* ह्याची आपण जोपासणा कशी करावी ? नवी दिल्लीतील *"जंतर मंतर"* येथे खुलेआम *"भारतीय संविधान"* जाळले जात असतांना, तुडविले जात असतांना, दिल्ली पोलिस खामोश उभे होते. नंतर जनतेचा मोठा दबाव वाढल्यावर, *दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल* करण्यात आला. हे समजुन घेणे फार गरजेचे आहे. *"भारतीय संविधान साहित्य सम्मेलन"* घेणे म्हणजे भारतीय संविधानाची गरिमा ही धुळीस मिळविणेचं होय. ह्याचें काही कारणे देता येतील.
सर्व प्रथम *"साहित्य म्हणजे काय ?"* हे समजुन घेणे गरजेचे आहे. ह्या शब्दाबाबत ब-याच मान्यवरांनी आपआपल्या व्याख्या केलेल्या आहेत. *"साहित्य ह्या शब्दाला इंग्रजीमध्ये Literature म्हटलेले आहे. साहित्य म्हणजे लिखित कार्याचा संग्रह. परंतु विशेषत: ते कला रुप - गद्य, पद्य, नाटक इत्यादी विषयाचा अंतर्भाव होतो."* दुस-या भाषेत सांगायचे म्हणजे लेखक वा कवि ह्यांच्या *"कल्पना शक्तीचा अविष्कार"* म्हणजे साहित्य होय. आणि सदर साहित्य पुस्तक रुपाने सादर केले जात असते. आता महत्वाचा प्रश्न हा की, *"भारतीय संविधान"* ह्याचा समावेश, साहित्याच्या परिघात करता येईल काय ? कारण - *भारतीय संविधान हे "कानुनी पुस्तक" (Legal Book) नाही. तर ते - "कानुनी-दस्तावेज" (Legal Documents) आहे."* आणि भारतीय संविधान हे कानुनी दस्तावेज असल्यामुळे, त्याचा अंतर्भाव साहित्य श्रेणीत करता येत नाही. कारण *"भारतीय संविधान"* सर्वोच्च आहे. साहित्य हे अश्लिल / घाणेरडे ही असु शकते. कारण साहित्याला कोणतीही अशी सीमा / बंधने नाहीत. साहित्य स्वैर आहे ! तेव्हा *"भारतीय संविधान"* ह्याला साहित्य म्हणणे म्हणजे संविधानाची गरीमा खंडीत करणे होय. तेव्हा *"संविधानाचा अपमान"* करण्या-याला दंडित करणे / *पोलिसात रितसर तक्रार करणे,* फार गरजेचे आहे.
*इ. झेड. खोब्रागडे* (Retd. IAS) हे तसे प्रमोटी पध्दतीने संचालक ह्या पदावर पोहचलेले आहेत. आणि रिटायर झाल्यावर ही खोब्रागडे ह्यांना आताही ते सेवेमध्ये कार्यरत आहेत, असा भ्रम झालेला दिसतो. अन्य व्यक्तीपेक्षा आपण वेगळे आहोत ? ह्या न्युणगंडाने (?) पछाडलेली ती एक विभुती वाटते. नाही तर, ह्या प्रकारचे *"आंबेडकर द्रोही"* उपद्रव खोब्रागडे ह्यांनी केले नसते. येत्या *३१ मे २०२३* रोजी *भामरागड* जिल्हा गडचिरोली येथे होण्या-या कार्यक्रमाचे ढोल कसे वाजवायचे ? *खोब्रागडे* आणि टीमचे हे उपद्रव कसे थांबवायचे ? ह्याची जबाबदारी आपण सर्व भारतीय नागरीकांची आहे. *मा. उच्च न्यायालय* हे स्वत: दखल घेवुन, ह्या प्रकरणाचा निपटारा करते काय ? हे सुध्दा बघावे लागेल. कारण आता झोपण्याचे सोंग घेणे म्हणजे भारताचे भविष्य *अंधकारमय* करणे होय, असेच म्हणावे लागेल.
* * * * * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक १९ मे २०२३
No comments:
Post a Comment