Monday, 17 April 2023

 🦋 *निसर्गाने माझ्या मनाचे...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* 

        मो. न. ९३७०९८४१३८


निसर्गाने माझ्या मनाचे हे गीत द्यावे

ह्या गीताला बुध्द साराचे संगित यावे...


फुलांच्या रंगात पुर्ण मिसळुन जावे

ह्या फुल गंधाचा मी एक कण व्हावे

भुंगाच्या फुल प्रेमाला तो नाद यावे

निसर्ग मनाला जीवनाची साद यावे...


फुलपाखरा संगे हे मैत्रीचे बांध यावे

रान गीताने मंजुळ धुनीचे राग व्हावे

हळुवाळ वा-याने हा शंख नाद द्यावे

मानव जीवन संघर्षाचे सारथी व्हावे...


अशांत मना निसर्गाने आधार व्हावे

नदी जल प्राशनी मनाला तृप्ती यावे

पक्षांची किलबिल संघाची याद व्हावे

कारुणिक बुध्दाचे रुप प्रतिबिंब यावे...


* * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment