Wednesday, 19 April 2023

 🦋 *हे सखा फुलपाखरा...!* 

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* 

       मो. न. ९३७०९८४१३८


हे सखा फुलपाखरा हे फुलपाखरा

पावन बुध्द मनाचा साज तुझा हसरा...


हे सखा‌ फुलपाखरा हे फुलपाखरा

माझ्या मनाचा आहेस तु एक आसरा

तुझ्या रे ह्या शुध्दतेचा - निर्मलतेचा

नाही कुणी सखा ह्या जगात दुसरा...


हे सखा फुलपाखरा हे फुलपाखरा

रंग बिरंगी रंगात तु दिसतो रे हसरा

माझ्या प्रेम मनाचा आहेस तु खसरा

ह्या निसर्ग कवेचा झालास रे तु बसेरा...


हे सखा फुलपाखरा हे फुलपाखरा

माणुस उदास वा एकटे असता रे तु

उडुनी येता पुष्पी नाचतो तुझा पसारा

मग एका क्षणी यावा मना हर्ष फवारा...


* * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment