🦋 *एक आस....!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
मानव जीवन जगण्याचे संदर्भ
स्वभाव आणि प्रवृत्तीनुसार
नेहमीचं बदलले जात असतात
कुणी स्वार्थात आंधळे होतांना
पैसा हेच सर्वस्व असा विचार घेवुन
तर कुणी आध्यात्मिक मार्गाकडे...!
बुध्दाची सुखाची - प्रेमाची परिभाषा
ही अलग असा संदर्भ देवुन जाते
त्रिशरण - पंचशील - अष्टांग मार्ग सांगताना
सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा
सचित्तपरियोदपनं एतं बुध्दान सासनं
हा दोन ओळीचा सांगितलेला धम्म सार
खुप काही संदेश देवुन जातो.
फुलपाखराचं जीवन हे खरचं निर्मळ आहे
गुलाब - मोगरा - चाफा ह्यांच्या सहवासात
सुखाची - प्रेमाची खरी परिभाषा ऐकतांना
भुंग्यांनी फुल कणाचा घेणारा आस्वाद असो
वा पक्षांचे झाडावर बसुन मौज गीत गाणे
खरचं पक्षी राजाच्या सुखी जीवनाचा
खुप असा हेवा वाटायला लागतो
मला वाटते मी सुध्दा राजा आहे
कधी वाटते की फुलपाखरू - पक्षी होवुन
त्यांच्या सारखे आकाशात स्वतंत्र विहारावे
माणसांच्या जातीपासुन खुप दुर जावे
ह्या निसर्गाच्या सानिध्यात राहावे
निर्मळ - शांत - आनंदी - सुखी जगात
आणि ह्या सु-मधुर एकातांत
मनसोक्त त्यांचे प्रेम गीत - संगित ऐकावे
बसं, उद्या तो दिवस कधी येईल
ही फक्त एक आस धरुन....!
* * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment