Friday, 24 January 2025

 👌 *केवळ बुद्ध आणि बुध्द !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


निसर्ग मनाची

हिरवी गर्द सुंदर वनराई 

उंच पहाडाचे निमंत्रण 

शुध्द हवेची ती मधुर झुळूक

सोबत मित्राचा सहवास

कारमधील बोलका प्रवास

आडमोडी वळण रस्ते

तर कधी वाटा - पळवाटा

तो सागर किनारा

बुध्द विहारातील शांती

बुध्दाला नमन 

मनमोहक बुध्द परिसर

प्राचिन इतिहास भिंतीवर बसुन 

गप्पांची ती गोड बरसात

भविष्यातील योजना बांधणी

मनाला मिळणारा आनंद 

खुप काही जीवन आठवणी

ह्या मनात साठलेल्या असतात

आणि पुढे तर तो दिवस 

भुतकाळ बनुन जातो

भविष्याच्या पाऊलवाटा 

ह्या सहजपणे थांबुन जातात

आणि वर्तमान हा

केवळ कोरा कागद असतो

तेव्हा जीवन आशा 

ह्या पल्लवीत करतांना

तो मनशांती शोधत असतो 

तेव्हा एकचं मार्ग असतो

सम्यक अष्टांग मार्ग

केवळ बुध्द आणि बुद्ध !!!


---------------------------------

नागपूर, दिनांक २३ जानेवारी २०२५

No comments:

Post a Comment