Saturday, 11 January 2025

 👌 *बुद्ध धम्म सार !!!*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो. न. ९३७०९८४१३८


तथागत बुद्ध 

आकाश तत्व नाकारतांना

पृथ्वी आप तेज वायु

केवल ही चार महाभुते

ह्याचे स्वीकार करतांना

निसर्ग आणि चेतना

हे सत्य ही मान्य करतात ...

बुध्द तत्वज्ञान

हे सोप्या भाषेत सांगतांना

रुप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान

ह्यां पदार्थांना पंचस्कंध म्हटले आहे 

ह्या चार महाभुतापासुन 

उत्पन्न पदार्थ म्हणजे रुप स्कंध 

अनुभव करणे म्हणजे वेदना स्कंध 

ओळखणे म्हणजे संज्ञा स्कंध

समजने व दुस-याला तयार करणे

म्हणजे चेतना स्कंध 

जाणुन घेणे म्हणजे विज्ञान होय....

कार्यकारण भाव नियमानुसार

इदं सति इदं होति

इदं असति इदं न होति

अर्थात कारण असल्यावर

कार्य हे घडत असते

कारण नसल्यास कार्य हे घडत नाही 

ह्या अनमोल बुध्द सुत्तामुळे

मला ख-या जीवनाचा अर्थ समजला....

स्कंधाचा नविन समुह म्हणजे जन्म

तथागत बुद्धांनी

आत्म्याचे अस्तित्व नाकारतांना

आत्म्याचे संसरण नाकारले आहे 

संसरणाशिवाय पुनर्जन्म सांगतांना

एका दिव्याच्या ज्योतीपासुन

दुस-या दिव्याची ज्योत पेटविणे

दुसरी पासुन तिसरी ज्योत पेटविणे

यात कसलेही संसरण नाही

चेतना (Vitality) ह्या गुणांमुळे 

माणसाची जिवित क्रिया सुरु असते

चेतना ही शक्ती शरीरातुन गेली तर

माणुस चार महाभुतात विलिन होतो

मृत्युला प्राप्त होत असतो

मन विकाराची मुक्ती म्हणजे निर्वाण 

अर्थात विकारहिन मृत्यु

हे आहे जीवन चक्र चिरकाल सत्य ...

ह्या मानवी शरीरात

केवळ नाम आणि रुप ही जोडी 

एकमेकावर आश्रीत असते

जसे एक दुजे के लिए प्रेम बंधन

ती एकही भंग पावली तर

दुसरी ही भंग पावत असते

अर्थात माणसाचा मृत्यु होतो

जगाचा निरोप घेत असतो...

बुध्द म्हणतात 

चित्तेन नियतो लोको

सृष्टी - संसार ही चित्ताची उपज आहे 

म्हणुन चित्तचं सर्वोपरी आहे

बुध्द कुशल कर्म (कम्म) करण्याचा

माणसाला उपदेश देतात

सब्ब पापस्स अकरणं

अर्थात अकुशल कर्म न करणे

हा अक्रियावाद नाही

जीवनाचे ते खरे सत्य आहे

पाप संदर्भात धम्मपदात गाथा आहे

मधुआ मञ्ञति बालों 

यावं पापं न पच्चति |

यदा च  पच्चति पापं

अथ बालों दुक्खं निगच्छति |

अर्थात पापाचे फळ प्राप्ती पर्यंत

अज्ञ हा पाप हे फार मधु समजतो

पापाचे फळ परिणाम दिसल्यावर 

सदर व्यक्ती हा दु:खाला प्राप्त होतो...

मनात प्रसन्नता निर्माण करणे

म्हणजे श्रध्दा होय

लोभ - स्वार्थ म्हणजे तृष्णा

आणि माणुस त्यामागे धावत असतो

खोटे बोलणे - धोका देणे

फसवणुक करणे मग ते आलेचं

तृष्णा कधीच नष्ट होणारी नाही

हे चिरकाल सत्य असले तरी

असा माणुस हा कधीचं संतुष्ट नसतो

त्याचे अंतर्मन स्वतःला डिवचीत असते

म्हणुन निसर्गात रममाण होतांना

मैत्री करतांना तो खुप आनंदी असतो...

भंतेकडे क्षमायाचना मागतांना

ओकास वंदामि भंते !

द्वारतेन मया कत्तं सब्बं

अच्चयो खमथ में भन्ते !

दुतियम्पि.... ततियम्पि !

भन्ते त्यावर म्हणत असतात 

खमामि - खमामि - खमामि !

अर्थात हे भन्ते ! मला वेळ द्या

मी आपणास वंदन करीत आहे 

काया वाचा मनाद्वारे

माझ्याकडुन काही चुका झाल्यास

त्या चुकांना मला क्षमा करा

दुस-यांदा.... तिस-यांदा !

त्यावर भन्ते उत्तर देत असतात

क्षमा केले - क्षमा केले - क्षमा केले

परंतु केवल अशी क्षमायाचना करणे

ही मानवी चुकांचे उत्तर नसते

चुकांचे परिमार्जन ही गरजेचे आहे 

ह्याशिवाय निर्वाण मिळणार नाही

माणसाला मृत्यु तर हा आहेचं

अर्थात जीवन सम्यक मार्गाचे

सहजपणे उकल ही होवुन जाते

म्हणुन तथागत 

बुध्द धम्म सारं सांगतांना

प्रेम - मैत्री - बंधुता 

शांती - करुणा - अहिंसा 

असा उपदेश ही देत असतात 

पृथ्वीवरील समस्त मानव जातीच्या 

उज्वल भविष्य आणि कल्याणाकरीता

विश्व शांतीकरीता ...!!!


************************

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

मो. न. ९३७०९८४१३८

नागपूर दिनांक १० जानेवारी २०२५

No comments:

Post a Comment