Saturday, 13 July 2024

 👌 *ह्या अशा बंध गंधात ...!!!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


ह्या अशा बंध गंधात तु धावतांना

भीम बुध्दाचा लई प्रेम साद झाला...


हे सोडला रे साथ तु ह्या जनांचा

जहाल मनांचा तु हे साथी झाला

ना सत्य विवेक ही दिसे तुझ्यात

मिशन वाली तु न कधीचं झाला...


उठला हा जन मन सदा तो-यात

भीम क्रांतीचा तो महा नाद झाला

ही साथ असावी ती सत्य मनाला

शुध्द आयुष्याचा तो पाईक झाला...


हे भीम क्रांतीचे बीजे पेरता आता

बुध्द नादाचा हा सुर्य उदय झाला

चंद्राच्या ह्या शीत किरणात आता

शांतीमय प्रेम करुणेचा बुद्ध आला...


************************

नागपूर, दिनांक १३ जुलै २०२४

No comments:

Post a Comment