✒️ *मराठी भाषा - लिपी - साहित्याच्या उगम - वास्तव - अभिजात दर्जा महा विवाद आणि बुध्द संदर्भ विचारवाद प्रभाव : एक गंभीर अवलोकन ...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
मराठी साहित्य - आंबेडकरी साहित्य / बौध्द साहित्य असा सत्तावाद - मानवी मुल्य धारा हा गंभीर विवाद असतांनाच, मराठी भाषा ह्या क्षेत्रातही ब-याच अशा विविध साहित्य प्रकारांचा जन्म झाला. उदाहरणार्थ - *व-हाडी साहित्य, झाडीबोली साहित्य, आदिवासी साहित्य, विद्रोही साहित्य, संत साहित्य* इत्यादी इत्यादी. आणि त्या विविध साहित्य प्रकारावर सविस्तर चर्चा आपण पुढे तरी करु यां. आणि मागिल एका महिन्यांपासून ह्या महत्वपूर्ण विषयावर मी माझे स्पष्ट विचार लिहावे असा माझा मानसही होता. *"कारण मराठी भाषा - लिपी - साहित्य उगम - विकास आणि विवाद ह्या संदर्भात खुप काही लिहिले गेले आहे. आणि काही ब्राह्मणी साहित्यिक - विचारवंतांचे लिखाण हे तर एकांगी अशा स्वरूपात दिसुन आले. परंतु मराठी भाषा - लिपी - साहित्याचा खरा उद्गाता कोण ?"* हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जसा *"प्राचिन भारताचा इतिहास"* हा *"ब्राम्हणी असत्यधारेचा इतिहास"* आहे...! आणि *"संशोधनातुन येणारे सत्य"* हे अलग असणारे आहे. *"सरस्वती"* ही विद्येची देवी ! पण तिचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान काय ? हा अहं प्रश्न आहे. *"आंबेडकरी / बौध्द साहित्यिक - विचारवंतांनी"* मराठी भाषा - लिपी - साहित्य उगम संदर्भात खुप फारसे असे काही संशोधन लिखाण केलेले दिसुन येत नाही. माझे हे स्वत: चे विचार मी खुप मोठा साहित्यिक / समिक्षक आहे म्हणुन नसुन ते *"केवळ आणि केवळ एक अभ्यासक"* म्हणून लिहिले आहेत. तेव्हा तमाम मराठी भाषी नामांकित साहित्यिक मंडळींनी / आंबेडकरी - बौध्द साहित्यिक मंडळींनी हा विषय सहज घ्यावा इतकेचं माझे म्हणणे आहे.
भारतीय भाषा - लिपी असो वा मराठी भाषा - लिपी ह्या विषयाच्या अंतरंगात जाण्याच्या आधी आपल्याला *"प्राचिन भारताचा इतिहास - सिंध घाटी सभ्यता वा हडप्पा संस्कृती"* ह्या विषयाकडे जाणे गरजेचे आहे. *सिंध घाटी आद्य संस्कृतीला* तिन भागांमध्ये विभाजित करावे लागेल. *पुर्व हडप्पा संस्कृती* (कालखंड इ.पु. ७५०० - ३३००) / *हडप्पा संस्कृती* वा पहिले नागरीकरण (कालखंड इ. पु. ३३०० - १५००) / *परिपक्व हडप्पा संस्कृती* (कालखंड इ. पु. २६०० - १९००). तसेच *प्राचिन आद्य तिन युगाकडे* जाणे ही गरजेचे आहे . *पाषाण युग* (पुरा पाषाण युग कालखंड इ. पु. २५००० - १२००० / मध्य पाषाण युग कालखंड इ. पु. १२००० - १००००) / नव पाषाण युग कालखंड इ. पु. १२००० - ३५००) / *कांस्य युग* कालखंड इ. पु. ३३०० - १२०० / *लौह युग* कालखंड इ. पु. १२०० - ५५० ह्या *"प्राचीन कालखंडाचा संदर्भ हा केवळ प्राचिन भारत संदर्भात नसुन तो विश्व इतिहास संदर्भित आहे."* भुवैज्ञानिक *अरुण सोनकिया* ह्यांनी तर मध्य प्रदेश स्थित नर्मदा नदी काठावर (हथनोरा गाव) येथुन *"३ - ५ लाख इसा पुर्व आदी मानवाची खोपडीचा"* शोध लावला. सदर मानव खोपडी ही प्राचीन *"होमो इरेक्टस"* श्रेणी प्रजातींची होती. ती *"अति प्राचिन खोपडी"* मला अति जवळुन बघण्याची आणि हाताने स्पर्श करण्याची ही संधी मिळाली. असो. आता आपल्याला उपरोक्त विषयाच्या अंतरंगात जावे लागेल. *"विदेशी वैदिक आर्य"* ह्यांचे प्राचिन भारतात आगमन *"कालखंड हा इ. पु. १५०० - ६००"* दरम्यान समजला जातो. *बुध्द कालखंड* हा इ. पु. ५६३ - ४६३ आणि *"मौर्य साम्राज्याचा"* कालखंड हा इ. पु. ५४४ - १८५ राहिलेला आहे. *रामायण* ह्याचा कालखंड इ. पु. ८३२३ आणि *महाभारत* कालखंड हा इ. पु. ५२०० असा सांगितला जातो. जर *"विदेशी वैदिक आर्य"* ह्यांचे प्राचीन भारतात आगमन हे *इ. पु. १५०० - ६०० (लौह युगामध्ये)* ह्या दरम्यान इतिहास सांगत असतांना *"रामायण / महाभारत"* ह्या महाकाव्याचे अस्तित्व हे आधी कसे ? हा मुख्य प्रश्न आहे. आणि *"रामायण / महाभारत"* हे केवळ *"महाकाव्य"* (साहित्य) आहेत. ते *"धर्म ग्रंथ"* नाहीत. आणि तेव्हा *"भाषा - लिपीचा"* शोध ही नव्हता. मध्यप्रदेश स्थित *भीमबेटका* (भोपाळ) हे स्थळ *"प्राचिन पाषाण युगाचा"* इतिहास बयाण करतो. *भीमबेटका* ह्या पाषाण युग कालीन प्राचिन भारत स्थळाला *मी माझ्या परिवारासह* अभ्यास भेट दिलेली आहे.
प्राचिन *"बुध्द साहित्य"* लिखाण संदर्भात चर्चा करतांना ब-याच बौध्द साहित्यिक ह्यांच्या लिखाण संदर्भात चर्चा पुन्हा कधी तरी करू या. परंतु *बोधिसत्व अश्वघोष* आणि ब्राह्मण कवि *कालिदास* ह्यांचा कालखंड समजून घेणे गरजेचे आहे. *बोधिसत्व अश्वघोष* (इ. पु. १५०) ह्यांनी प्रथम - द्वितीय शतकात *"बुध्दचरित्रम् / सौदरानंद / वज्रसुचि / सारिपुत्त प्रकरण"* सारख्या रचना लिहिलेल्या आहेत. ते *"बौध्द दार्शनिक / नाटककार / कवि / संगितकार / कुशल वक्ता"* ही होते. आणि अश्वघोष ह्यांच्या साहित्यात *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / दर्शन शास्त्र / नैतिकवाद"* ह्याची अनुभुती दिसुन येते. आणि ते राजा कनिष्क ह्यांच्या दरबारात कवि ही होते. तर *कालिदास* हे *"चतुर्थ शताब्दी"* काळात उज्जयिनी राजा विक्रमादित्य ह्यांच्या दरबारात कवि होते. दुसरे म्हणजे *कालिदास* ह्यांनी *मेघदुतम् / कुमार संभव / ऋतुसंहार / रघुवंश* सह ४० रचना लिहिलेल्या आहेत. आणि कालिदास ह्यांच्या रचना ह्या *"भोगवाद"* भावाची अनुभुती करतांना दिसुन येते. *"साहित्यातील भोगवाद ही ब्राम्हणी धर्माची जननी आहे."* असे ही म्हणता येईल. अर्थात कालिदास ह्यांना *"संस्कृत आद्य कवि"* म्हणने उचित नाही. तर *बोधिसत्व अश्वघोष* हेच केवळ संस्कृत - पाली आद्य कवि आहेत.
मराठी भाषी - *"संत अभंग"* ह्या संदर्भात चर्चा होत असतांना ब्राम्हण धर्मीय - *ज्ञानेश्वर महाराज* (ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी) ह्यांच्या अभंगाना *"मैलाचा दगड"* म्हणून गौरविण्यात येते. कारण शेवटी *ज्ञानेश्वर महाराज* ब्राह्मणी व्यवस्थेला शरण गेलेले असतात. परंतु शिंपी जातीचे असलेले - *नामदेव महाराज* (नामदेव दामा रेळेकर) ह्यांना मात्र दुर्लक्षित केले जाते. *ज्ञानेश्वर महाराज* ह्यांचा जन्म २२ ऑगष्ट १२७५ रोजी आपेगाव - पैठण येथे झाला. *संत नामदेव महाराज* ह्यांचा जन्म संत ज्ञानेश्वर ह्यांंच्या ही आधी २६ आक्टोंबर १२७० रोजी ग्राम नारसी - हिंगोली येथे झाला. आणि त्यांनी २५०० अभंग रचना लिहिलेल्या आहेत. *नामदेव महाराज* हे पंढरीचे पांडुरंग - बुध्दाला आपले खरे आदर्श मानतात. नामदेव महाराज म्हणतात - *"बुध्द अवतारी आम्ही झालो संत | वर्णावया मात नामा म्हणे ||"* आणि त्यांच्या नंतरचे झालेले अन्य संत - महार समाजाचे *संत चोखामेळा* (१३०० - १४००) / वाणी समाजाचे *तुकाराम महाराज* (१६०८ - १६५०) - तुकाराम बेल्होबा अंबिले मोरे / संत तुकाराम महाराज ह्यांचे अभंग कागदावर उतरविणारे त्यांचे तेली समाजातील मित्र *संताजी जगनाडे महाराज* / ब्राह्मण धर्म समाजातील *संत एकनाथ*/ नामदेव महाराज ह्यांच्या परिवारातील *संत जनाबाई* / ब्राह्मण समाजातील *महापति बुवा* / सोनार जातीचे *संत नरहरी सोनार* / महार जातीच्या संत चोखामेळा ह्या परिवारातील *संत सोयराबाई* (पत्नी), *संत निर्मलाताई* (बहिण), तसेच *संत कर्ममेळा* (भाऊ) ही सर्वचं मंडळी नामदेव महाराज ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून *"बुध्द धर्म चळवळ"* त्यांच्या वैचारिक स्तरावर पुढे हाकतांना दिसतात. *"ही संत मंडळी पंढरपुरी विठोबा हे बुध्द असल्याचा बोध करतात."* ह्या संतांनी बुध्दाच्या संदर्भात लिहिलेल्या काही अभंगांची चर्चा पुन्हा कधी तरी करु यां. ब्राह्मण धर्मीय - *रामदास महाराज*(१६०६ - १६६२) ह्यांनी संसाराबद्दल लिहिले कि *"संसार मुळीचा नासका | विवेक करावा नेटका ||"* तरीही मात्र रामदास स्वामींना महान केले जाते. आणि *तुकाराम महाराज* हे जेव्हा बुध्दाच्या संदर्भात म्हणतात - *"बौध्द अवतार माझिया अदृष्टा | मौन्य मुखे निष्ठा धरियली ||"* दुस-या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात - *"नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध ||"* तेव्हा मात्र ब्राह्मणी व्यवस्थेला खुप त्रास होतो. *शिवाजी महाराज* हे संत तुकाराम महाराज ह्यांना आपले गुरू मानतात. *छत्रपती शिवाजी महाराज* हे तर नांदुरकी वृक्षाखाली ध्यानस्थ संत तुकाराम महाराज ह्यांचे आशिर्वाद घेऊन ते कार्याला सुरुवात करतात. ब्राम्हण वर्ग ही गोष्ट मात्र लपवुन ब्राह्मणी संत - *रामदास स्वामी* ह्यांनाचं छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे गुरु म्हणून प्रचार करतात. शके १११० मध्ये (?) *मुकुंदराजांनी* रचलेला *"विवेक सिंधु"* हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे, असे सांगितले जाते. परंतु शिंपी समाजाचे - *नामदेव महाराज"* हे *मराठी भाषी आद्य कवि"* संबोधिले जात नाही. ह्या कारणांचा शोध घेणे फार गरजेचे आहे.
मराठी भाषेचा उगम उत्तरेकडुन (सातपुडा रांगापासुन कावेरीच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेस दमणपासुन दक्षिणेस गोव्यापर्यंत विस्तार) असे सांगतांना तिला *"आर्यांची भाषा"* कां म्हटलेले आहे ? हा प्रश्न आहे. कारण मराठी भाषा ही *"पुर्व वैदिक / वैदिक / संस्कृत / पाली / प्राकृत"* अशा अपभ्रंश टप्पातुन उत्क्रांत होत गेल्याचेही म्हटलेले आहे. मराठी भाषेतील पहिले वाक्य हे - *"श्री चामुण्डेराये करविले"* इ. स. १०३९ शके ९०५ मध्ये अंकित असुन ते कर्नाटक ह्या राज्यातील *"श्रवणबेळगोळ शिलालेख"* येथिल असल्याचे म्हटलेले आहे. तर दुसरीकडे सोलापूर शहराजवळील *"हत्तरसंग कुडल"* ह्या गावी इ.स. १०१८ शके ९४० साली मराठी भाषेचा *"पहिला शिलालेख "* सापडल्याचे विषद केले आहे. ह्या शिलालेखात *"स्वस्ति श्री शके ९४० कालायुक्त सवंत्सरे माघ कधतुळिकाळ छेळा"* ही अक्षरे अंकित असल्याचा दावा केला आहे. ह्या विवादात पुन्हा भर म्हणून *रायगड जिल्ह्यातील* अलिबाग तालुका स्थित *अक्षी* ह्या गावात इ. स. १०१२ साली कोरलेला *"पहिला मराठी शिलालेख"* सापडल्याचे विषद आहे. तेव्हा *"मराठी भाषेचा पहिला शिलालेख "* खरा कोणता ? आणि कोणत्या कालखंडात मराठी भाषेचा उगम झाला आहे ? हा नेहमीच विवादाचा विषय राहिलेला आहे. सोबतचं तो संशोधनाचाही विषय आहे. तेव्हा सदर शिलालेखातील मराठी लिपीचा अर्थ भाव पुढे कधी तरी चर्चा करु या. अर्थात मराठी ह्या लिपीवर *"ब्राह्मण अधिपत्य"* असा विचार आपण मान्य करावे काय ? आता खरा प्रश्न आहे. आणि *"शिलालेख संकल्पना"* ही तर *"बौध्द काळाची देणं"* आहे. शिलालेख ह्या नंतर उदयास आलेला *"ताम्रपट"* ही जरी महत्वाची साक्ष असला तरी, हा *महान चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांच्या शिलालेखाचा प्रभाव तो सांगुन जातो. इतकेच नाही तर ब्राह्मण धर्मीय - *मुकुंदराज / ज्ञानेश्वर महाराज* ह्यांना मराठी भाषी आद्य कवि संबोधिले आहे. आणि शिंपी समाजाचे *नामदेव महाराज* ह्यांना इतिहासाचा विसर होतो. अखंड प्राचिन भारताच्या इतिहासात *"शिलालेखाचे खरे जनक"* हे *चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य* ह्यांना मानलेले जाते. आणि *"मौर्य साम्राज्याचा कालखंड हा इ. पु. ५४४ - १८५"* असा राहिलेला आहे. जेव्हा आपण *"शिवाजी महाराज कालखंडातील शिलालेख "* (इ.स. १६७४ - १६८०) ह्याकडे वळत असतो, तेव्हा शिलालेखात *"मराठी ऐवजी संस्कृत"* भाषेचा उल्लेख दिसुन येतो. तेव्हा मात्र शिवाजी महाराज ह्यांच्या काळातील *"ब्राह्मणी प्रभाव"* हा समजुन घ्यावा लागणार आहे.
आता भारतातील तमाम *"प्राचिन लिपी"* ह्या विषयावर आपण चर्चा करु या. *"पहिली लिपी म्हणुन ब्राम्ही लिपी"* (इ. पु. पाचवी सदी ते इ. पु. ३५०) बोध हा चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांच्या शिलालेख अध्ययनातुन तो दिसुन येतो. ब्राम्ही लिपी नंतर ती दोन भागात विभागल्या गेली - *"उत्तरी धारा / दक्षिणी धारा."* उत्तरी धारामध्ये *"गुप्त लिपी / कुटिल लिपी / शारदा लिपी / देवनागरी लिपी* ह्या लिपीचा समावेश होतो. तर दक्षिणी लिपीमध्ये *"तेलगु / कन्नड / तामिल / कलिंग / ग्रंथ / मध्य देशी / पश्मिमी लिपी"* ह्या लिपीचा समावेश होतो. *ब्राम्ही लिपी ही डावीकडून उजवीकडे* लिहिली जात असे. त्यांनंतर आलेली *"खरोष्टी लिपी."* ही पश्चिमोत्तर क्षेत्रात आढळुन येणारी आणि *"उजवीकडुन डावीकडे"* लिहिली जात असे. आणि ह्या लिपीला विदेशी लिपी सुध्दा बोलल्या जातांना दिसते. ह्यानंतर चर्चा करु या - *"कुटिल लिपी."* ह्या लिपीमध्ये प्रतिक चिन्हांचा प्रयोग दिसुन येतो. *"भीमबेटका शीलालेख"* (भोपाल) ह्याची ती साक्ष आहे. *"देवनागरी लिपी"* - (आठवी शताब्दी) ही *"डावीकडून उजवीकडे"* लिहिली जाणारी ती एक लिपी आहे. आणि *"वैज्ञानिक लिपी ध्वनी / अक्षरांचे उत्कृष्ट समन्वय"* ह्यात असल्याने *"भारतीय संविधानाने"* ह्या लिपीला संविधानिक मान्यता मिळालेली आहे. *"शारदा लिपी"* - (आठवी शताब्दी) ही कश्मीर प्रांतात सिध्द मातृका लिपीपासुन विकसित झाल्याचे हे बोलल्या जाते. *"गुरुमुखी लिपी"* - शिखांचे दुसरे गुरु अंगद ह्यांनी पंजाबी भाषेतुन *"गुरु ग्रंथ साहिबाचे"* संकलन केल्याचे विदित आहे. *"ग्रंथ लिपी"* - दक्षिण भारतात (तामिळनाडू) पल्लव / पांड्य / चोल ह्या शासका वर्गानी ह्या लिपीला विकसित केल्याचे सांगितले जात आहे. *"तेलगु आणि कन्नड लिपी"*- ह्या लिपीचा उगमस्थान एकचं असुन चालुक्य कालिन शिलालेख (हले बिड) ह्याची ती साक्ष देतो. *"शाहमुखी लिपी"* - सुफी लोकाकडुन ती प्रयोगात आलेली इराणी लिपीचे ते पंजाबी संस्करण आहे. *"मोडी लिपी"*- यदुवंशी लोकांनी हिचा उगम केल्याचे बोलल्या जाते. सदर लिपीच्या उगम संदर्भात मतभेदही असु शकतात. परंतु भारतातील सदर लिपीच्या अध्ययनातुन *"मराठी लिपीचा उगम"* निष्कर्ष काढणे शक्य आहे काय ??? हा सुध्दा आपल्या समोर एक प्रश्न आहे.
*"ब्राह्मण / उपनिषद"* हे संस्कृत भाषेतील पद्य इ. पु. १५०० - १००० काळातील सांगुन इ. पु. सातवी शताब्दी पर्यंत त्या पद्याचा फैलाव होता, ह्या संदर्भात पुरावा काय ? कारण लिपीचे अस्तित्व हा मुख्य प्रश्न आहे. *"ब्राम्ही लिपीच्या आधी पाली, प्राकृत, संस्कृत ही केवळ बोली भाषा म्हणून अस्तित्वात होती.आणि ती केवळ मौखिक आधारावर प्रयोगात होती"* असे केवळ एक अनुमान काढता येईल. परंतु *"संस्कृत भाषा ही भारताची मुळ भाषा आहे आणि ती सर्व भाषेची जननी"* आहे, ह्या संदर्भात कुठलाही पुरावा असा उपलब्ध नाही. ब्राह्मणी विचाराने मात्र तो प्रभाव लादण्याचा प्रयत्न केला. भारतात २२ भाषांना अधिकारीक भाषा म्हणून मान्यता आहे. परंतु त्यात *"मराठी भाषेचा"* समावेश नाही. आणि मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळावा म्हणुन राज्य सरकार समितीकडुन संघर्ष ही सुरू आहे. आणि मराठी भाषेची प्राचिनता सिध्द करण्यासाठी सातवाहन काळातील *"नाणेघाट शिलालेख"* ह्याचा दाखला दिला जात आहे. *"पाली / प्राकृत / संस्कृत / वैशाली / मागधी भाषेचा"* प्रभाव हा मराठी भाषेवर दिसुन येतो. म्हणून *"मराठी भाषा ही अनेक अशा स्थित्यंतरातुन उदयास आली,"* हे सत्य मानावे लागेल. आणि *"ब्राम्ही लिपी"* हिला सर्व लिपीची जननी मानण्यास काय हरकत आहे ? हा तर मुख्य प्रश्न आहे. *प्रा हरी नरके* ह्यांनी तर इसवी सनाच्या पुर्वीपासूनचं मराठी भाषा ही अस्तित्वात होती. *"माहाराष्ट्री - प्राचिन म-हाठी"* हिच्या पासुन *"शौरसेनी ही भाषा"* निघाली. आणि शौरसेनी भाषेपासुन कालांतराने *"मागधी / पैशाची"* ह्या दोन भाषा निघाल्यात. अर्थात त्या दोन भाषा मराठीचे नातेवंडे आहेत, असा नविनचं अफलातून शोध *प्रा .हरी नरके* ह्यांचा दिसुन येतो. मराठी भाषेतील *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / व-हाडी मराठी / मालवणी मराठी / कोल्हापूरी मराठी"* ह्या सर्व पोट- प्रकाराबद्दल पुन्हा कधी तरी चर्चा करु या. शिवाजी महाराज कालखंडात *"मराठी भाषेवर फारशी भाषेचा प्रभाव"* होता, असे म्हटले जाते. मराठी भाषा - लिपी उगम संदर्भात विवाद बरीच आहेत. *ब्राह्मण मराठी वाद्यांच्या* मक्तेगिरीत *ग्रेस* - (प्रा. माणिक गोडघाटे) ह्या मागासवर्गीय महा कविंचा विसर झालेला दिसतो. ग्रेस ह्यानी आंबेडकरी निष्ठा कधी जोपासली नाही आणि ब्राह्मण मराठीं वाद्यांनी त्या दुर्मिळ महा कविला कधी स्वीकारले काय ? हा प्रश्न आहे. ह्यातचं *"आंबेडकरी - बुध्द साहित्याचे वेगळेपण"* हे मराठी ब्राह्मण साहित्यीकांना शल्य देणारे आहे. शेवटी *संत कबिर* जी ह्यांच्या शब्द सुमनांनी मी माझ्या लिखाणाला विराम देतो.*"गांडु भडवे रण चढे, मर्दो के हो बेहाल | पतिव्रता भुखी मरे, पेढे खाये छिनाल ||"*
*******************************
▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर, दिनांक २० जुलै २०२४
No comments:
Post a Comment