Friday, 8 March 2024

 👌 *सत्यपथ त्याग भावनेचा...!*

        *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८


मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील 

कारने असणारा हा प्रवास

सह्याद्रीच्या असणा-या पर्वत रांगा

आणि सह्याद्री डोंगर फोडुन

निसर्गाच्या सुंदर सौंदर्य सान्निध्यात

मानवी मनाचा निर्मित बोगदा

द्रुतगती मार्गावर उभ्या असणाऱ्या

उंच उंच गगनभेदी इमारती

रंगी बिरंगी फुलांची झुडपराजी

मनाला मोहक करणारे वातावरण

हिरवीगार भावनेची सुंदर उतरण

वळण घेणा-या घाट रस्त्यावरुन जातांना 

प्रेमाचे गीत शब्द हे बाहेर पडलेतं

जंगलातुन फिरतांना मिळणारे प्रेम

हृदयात कायमचे कोरले जात असतांना

जीवन प्रेमिकेच्या शब्द शिल्पाची

फारचं आठवण मनाला होवुन गेली

आणि एका वेगळ्याचं शब्द विश्वात

पुर्णतः रममान‌ होवुन जातांना

इतिहासाच्या प्राचिर भींतीच्या आठवणी

मनात शब्दबध्द करीत होत्या

द्रुतगती मार्गावरील बुध्द विहार

बुध्द विहारातील बुध्द स्मित बघुन

प्रेम मैत्री करुणा भावनेचे

बुध्दधारेवरील काषाय वस्त्र रंग

जंबुद्वीपाला एक अलग संदेश देतांना

मानसी चेतनेला तो आवाहन देत होता

सत्यपथ त्याग भावनेचा !

सत्यपथ त्याग भावनेचा !!

सत्यपथ त्याग भावनेचा...!!!


************************

मुंबई - पुणे प्रवास, दिनांक ६ मार्च २०२४

No comments:

Post a Comment